माझी भटकंती वाचक प्रतिक्रिया
💫☘️💫☘️💫☘️💫
कृतज्ञता
🙏🏻धन्यवाद व आभार 🙏🏻
मित्रहो, आपण सर्वांनी माझी भटकंती या लेखमालिकेचे सलग शतक झाले त्याबद्दल माझ्या लेखनाचं कौतुक फोन संपर्क, फेसबुक,व्हाटसअप ग्रुपवर लेखांकन (अभिप्राय, प्रतिक्रिया) करुन आपलेपणाने सदिच्छा आणि शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल आदरणीय शिक्षकमित्र,
वाचक वृंद आणि स्नेहीजणांचे मनपूर्वक धन्यवाद! आभार!
विशेषतः लेखनकलेतील मार्गदर्शक शब्दप्रभू आदरणीय आप्पा श्रीमान सुनील शेडगे पत्रकार शिक्षक मित्राने "मुसाफिर" हा भटकंतीचा लेख प्रसिद्ध केला. समर्पक शब्दांची साखरपेरणी करुन भ्रमंतीच्या विविधांगी पैलूंची ओळख सजगतेने करुन दिली.निसर्गाचे सौंदर्य कसं पहावं आणि भटकंतीतून काय मिळतं याची महती करुन दिली.श्रीमान गणेश तांबे सर अध्यक्ष आई प्रतिष्ठान वाठार फलटण यांनी माझी भटकंती शतक या लेखमालिकेचा समर्पक शब्दातील कौतुकास्पद लेख फलटण टुडे या मिडीयात प्रसिध्द करुन सुखद आनंद दिला.
भटकंती लेखनासाठी प्रेरणा आणि आत्मबळ श्री दीपक चिकणे सर,श्री दीपक मगर सर,श्री शिवाजी निकम सर श्री गणेश तांबे सर ,श्री दीपक भुजबळ सर,श्री शरद पोतदार सर,श्री शशिकांत कदम सर ,श्री राजेन्द्र वाकडे सर ,श्री राजेन्द्र बोबडे सर ,श्री महादेव भोकरे सर ,श्री भास्कर पोतदार सर ,श्री अमित कारंडे सर,श्री संतोष ढेबे सर, श्री राजेन्द्र क्षीरसागर ,श्री शिवाजी चव्हाण ,श्री शिवाजी फरांदे सर,श्री प्रशांत वाडकर,श्री अमोल माने,श्री राहुल हावरे सर,श्री सुनील जाधव सर,श्री उद्धव निकम सर,सौ स्मिता जाधव मॅडम, सौ नलिनी जाधव मॅडम,श्री विकास शिंदे रायडर ,श्री प्रमोद निंबाळकरया मित्रांनी दिले.तसेच अनेक पर्यटन प्रेमी शिक्षकमित्र आणि शब्दप्रभुंनी अक्षरलेण्यातून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या! सर्वांनी अभिनंदन केले .कौतुक करुन सन्मान केला.
त्याबद्दल सर्व शिक्षकमित्रांचे,स्नेहीजणांचे,बंधूभगिनींचे आणि भटकंतीतील सर्व मित्र परिवाराचे कृतज्ञतापूर्वक आभार
🙏🏻🌹🙏🏻🌹
भटकंती लेखनासाठी प्रेरणा आणि आत्मबळ श्री दीपक चिकणे सर,श्री दीपक मगर सर,श्री शिवाजी निकम सर श्री गणेश तांबे सर ,श्री दीपक भुजबळ सर,श्री शरद पोतदार सर,श्री शशिकांत कदम सर ,श्री राजेन्द्र वाकडे सर ,श्री राजेन्द्र बोबडे सर ,श्री महादेव भोकरे सर ,श्री भास्कर पोतदार सर ,श्री अमित कारंडे सर,श्री संतोष ढेबे सर, श्री राजेन्द्र क्षीरसागर ,श्री शिवाजी चव्हाण ,श्री शिवाजी फरांदे सर,श्री प्रशांत वाडकर,श्री अमोल माने,श्री राहुल हावरे सर,श्री सुनील जाधव सर,श्री उद्धव निकम सर,सौ स्मिता जाधव मॅडम, सौ नलिनी जाधव मॅडम,श्री विकास शिंदे रायडर ,श्री प्रमोद निंबाळकरया मित्रांनी दिले.तसेच अनेक पर्यटन प्रेमी शिक्षकमित्र आणि शब्दप्रभुंनी अक्षरलेण्यातून कौतुक करुन शुभेच्छा दिल्या! सर्वांनी अभिनंदन केले .कौतुक करुन सन्मान केला.
त्याबद्दल सर्व शिक्षकमित्रांचे,स्नेहीजणांचे,बंधूभगिनींचे आणि भटकंतीतील सर्व मित्र परिवाराचे कृतज्ञतापूर्वक आभार
🙏🏻🌹🙏🏻🌹
*आदरणीय गुरूवर्य रविंद्र सर..*
*भटकंती लेखमालेच्या १०० व्या भागाबद्दल अभिनंदन, अभिवादन..
*कोणत्याही लिखाणाची १०० भागांची झेप ही वाटते तेवढी सोपी नाही..*त्याला अभ्यास लागतो, ध्यास लागतो, चिकाटी, संयम, विजिगुषी वृत्ती, कमालीचे धैर्य लागते ते तुमच्या व्यक्तिमत्वात ओतप्रोत भरलेले आहेत..!**म्हणूनच तुम्ही वाचकांची तृष्णा करू शकला आहात. तुमचे लेख वाचताना नकळतपणे तुम्ही त्या परिसराची बारकाव्यांनिशी आम्हाला भटकंती करून आणता. तुमच्या नजरेने आम्ही तो सगळा भाग पालथा घालत असतो..!*
*जनसेवेचा वसा सांगावा लागत नाही आतून येतो तोच खरा असतो..!*
*प्रत्त्येक ठिकाणी तुम्ही अनुभवांची अफलातून पेरणी केली आहे. मजा वाटते वाचताना..!*
*असेच उत्तमोत्तम लिहित रहा..*
*आम्ही वाचत राहू..*
*तुमच्या लेखमालेला मनःपूर्वक शुभेच्छा*💐💐👍
*पुढील वाटचालीसाठी आम्ही तुमच्यासोबत सदैव आहोतच..*
*राजेंद्र बोबडे, सातारा.*
*9823916788
💐हार्दिक शुभेच्छा💐
उद्या दि.23 जुलै 2020 रोजी श्रीमान रविंद्रकुमार (दादा)लटिंगे सर🌹यांच्या
🎯*भटकंती*🎯या लेखाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. एक अफलातून प्रवासवर्णने सरांनी आपल्या सिद्धहस्तलेखणीतून साकारले आहेत.सरांच्या सातत्य व जिद्दीला सलाम.तसेच भेटी दिलेल्या सर्व स्थळांची तपशीलवार माहिती वाचणे म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणीच आहे. सरांचे हे सर्व लेख पुस्तक स्वरूपात वाचायला मिळावे अशी आशा व्यक्त करतो . पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो.
💐💐💐💐💐
शुभेच्छूक=
श्री शिवाजी निकम
क्रिडा समन्वयक
मा.श्री.लटींगे सर आपण 100 प्रेक्षणीय (भारत/महाराष्ट्र दर्शन )यात्रा,सहल, पिकनिक च्या माध्यमातून अप्रतिम उत्तमप्रकारे व यशस्वीपणे पूर्ण केलेबद्दल आणि सदरची प्रेक्षणीय ठिकाणाची परिपूर्ण,सुंदर माहिती फेसबुक च्या माध्यमातून सर्व सदस्य यांचे पर्यन्त प्रसारित केलेबद्दल फेसबुकचे सर्व सदस्य व माझे परिवार यांचे मार्फत आपले त्रिवार अभिनंदन 🙏
श्री सुरेन्द्र पारखे साहेब वाई
आदरणीय लटिंगे सर,
आपल्या 'माझी भटकंती' या प्रवासवर्णन मालिकेचे 100 भाग पूर्ण होत आहेत.हा एक मोठा टप्पा आपण पूर्ण केलात. सर आपल्या लेखनामुळे फक्त त्या भागाची माहिती झाली असे नाही तर त्या भागाची नव्याने ओळख झाली, वाचन करत असताना प्रत्यक्ष तो प्रदेश डोळ्यासमोर उभा राहतो, तेथील लोक, संस्कृती आणि इतिहास उभा राहतो. त्यामुळे तो प्रदेश पहावा अशी एक ओढ मनात निर्माण होते .हेच आपल्या लेखनाचे यश आहे.आंम्हासारख्याना तर हे लेखन म्हणजे एक प्रेरणादायी वाटाड्याच आहे.सर आपली पावले जगाच्या कानाकोपरात पोहचवीत आणि लेखनाच्या माध्यमातून ते जग आंम्हा समोर उभं राहावं हीच या निमित्तानं सदिच्छा🌷🌷
श्री उद्धव निकम
🌹पर्यटन लेखनीची शंभरी 🌹
माझा सखा व आपणा सर्वांचे मार्गदर्शक श्रीमान रविंन्द्रजी लटींगे सर यांचा लाॕकडाऊनच्या काळातील पर्यटनाची लेखनी तलवारीच्या धारेसारखी तळपत होती .
त्यांच्या लेखनीतून बाहेर पडलेला शब्द नी शब्द वाचक वाचत होते व आपला प्रतिसाद नोंदवत होते .....
आपणा सर्वांच्या प्रेमाची हीच थाप त्यांना प्रेरणा देत गेली व शब्दांची धार वाढत गेली .
मिञा आम्हां सर्वांच्या शुभेच्छा नक्कीच तुझ्या पाठीशी आहेत . तू लिहीत रहा आम्ही वाचत जावू आणि लिहीता लिहीता मोठा लेखक होऊन पुस्तक प्रकाशित होवो याच तुला मनापासून सदिच्छा !!!!!!!🌹🌹🌹भास्कर पोतदार सर वाई 🌹🌹🌹🌹🌹
*भटकंतीचे शतक*.
*मित्रवर्य लटींगे दादांना भटकंतीची आवड आहेच. पण लाँकडाउनच्या वेळेचा सदुपयोग करून १~१ भाग लिहीत आज १०० वा भाग प्रवासवर्णनाचा पूर्ण करत आहेत.*
💪💪🙏 *दादा आपण वाचकांचाही प्रवास घडवून आणत होतात. खपच छान लेख आहेत. आपल्या शतकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!*
आपलाच सहदेव फणसे.
मित्रवर्य रवींद्र लटिंगे सरजी,
'भटकंती'च्या लेखमालिकेतील लेखांची शंभरी पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
आपल्या प्रत्येकात कधीच न संपणारे असे काही असते. कधी ते आपल्याला इतरांकडून लक्षात आणून दिले जाते तर कधी स्वतःला आतून त्याची जाणीव होते. अशा अंगभूत कौशल्याचा होईल तेवढा नेटकेपणा जपत आपण विकास करायला हवा!
अनेक कलावंतांना आपल्यातील दिव्यत्वाची जाणीव असते; पण ती फुलवत ठेवू शकतील अशा चाहत्यांची साथ न लाभल्यामुळे त्या प्रतिभेला हवा तसा वेग येत नाही.तुम्ही स्वतः तर लेखन करताच शिवाय इतर मित्रांनी लिहिलेल्या लेखनास आपलेपणाने भरभरून उत्कट दादही देता. रसपूर्ण लेखन करणे आणि लेखनास रसिकतेने दाद देणे या दोन्ही मौलिक गुणांचे तुम्ही धनी आहात!
हार्दिक अभिनंदन आणि मंगल शुभेच्छा!!🌹💐🌹💐
-श्री महादेव भोकरे.सर
आदरणीय लटिंगे सर*
*आपण माझी भटकंती या लेखमालेचे आज १००भाग पूर्ण केले त्याबद्दल आपले खूप अभिनंदन , प्रवास वर्णन हा आपला लेखन प्रपंच खरचं वाखाणन्या सारखा आहे,आपली लेखन शैली आणि सादरीकरण अचूक आणि सूक्ष्म तपशील वाचकाची उत्कंठा वाढवतात .आपला हा लेखन प्रपंच पुस्तकरूपाने आमच्या हाती येऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपणास पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा🌷👌🙏🙏
शतकवीर मित्र श्री. रविंद्रजी लटींगे अभिनंदन आणि शतकोत्तर लेखनासाठी मनस्वी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
श्री बाळकृष्ण जगताप सर, सातारा
अभिनंदन सर!!!
लेखनाचा ही पिरॅमिड असाच चढता राहो!!!
लेखनप्रवासास खूप खूप शुभेच्छा!!!
सौ अनिता गोरे वाई
👌👌👌👌👌
लटींगे सर, भटकंती करताना घेतलेला आनंद, स्वतः बरोबर, इतरांनाही तुम्ही दिलात. या प्रवास वर्णनाचे आज 100
भाग पूर्ण झाले... खूप मोठी गोष्ट आहे ही.. भटकंतीचे शतकवीर, तुमचे खूप खूप अभिनंदन..असेच लिहीत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...
.राजेंद्र वाकडे, तारळे....
श्री रविंद्र लटिंगे तू छानच लिहीत आहे लिहीत रहा 100भाग वाचले भटकंती करून त्याची नोंद ठेवली आणि लाॅक डाऊन च्या चांगले वाचायला मिळाले फोटो व माहिती उपयुक्त आहे. आपण स्वतः प्रवास केलेचा अनुभव मिळाला. तुझ्या या लिखाणाची कायमची आठवण रहावी म्हणून याचे पुस्तक लवकरच प्रकाशित व्हावे ही सदिच्छा
दिपक भुजबळ 💐💐💐💐
आदरणीय लटिंगे सर...
सर्वप्रथम नमस्कार ‼
पराकोटीची जिद्द , अथक परिश्रम, नवनिर्मितीचा ध्यास व भटकंतीची विशेष आवड या सर्वच गुणवैशिष्ट्यांनी आपण परिपूर्ण आहात.आनंदाचं जगणं आपल्या भटकंतीतून पहावयास मिळालं.परिवार, मिञमंडळी यांच्यासोबत टिपलेले अविस्मरणीय फोटोज् व आनंदी क्षणांच्या आठवणी आपण शब्दबद्ध केल्यात.हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हे..! मनात आणलेलं सत्यात उतरवायला जिद्द लागते.स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो.हे तुमच्या अथक १०० भाग लेखनातून प्रत्ययास आले.
आपण एक नविन उर्जा, नविन प्रोत्साहन मिळाले.उरलेले आयुष्य स्वछंदी जगायला हवे.मनस्वी फिरायले हवे...आपल्यांबरोबर हे मनापासून पटले.आपल्या लेखनातून बहुविध ज्ञानही आपण वाटले.खूप खूप समृद्ध लेखन केले.
आपणांस मनःपूर्वक वंदन..!!
आयुष्यात एक चांगले मार्गदर्शक मिळाले..याचा आनंद झाला.
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!!
आपलाच,
नितीन जाधव.
🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃
: 💐हार्दिक शुभेच्छा💐
उद्या दि.23 जुलै 2020 रोजी श्रीमान रविंद्रकुमार (दादा)लटिंगे सर🌹यांच्या
🎯*भटकंती*🎯या लेखाचा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. एक अफलातून प्रवासवर्णने सरांनी आपल्या सिद्धहस्त
लेखणीतून साकारले आहेत.सरांच्या सातत्य व जिद्दीला सलाम.तसेच भेटी दिलेल्या सर्व स्थळांची तपशीलवार माहिती वाचणे म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणीच आहे. सरांचे हे सर्व लेख पुस्तक स्वरूपात वाचायला मिळावे अशी आशा व्यक्त करतो . पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो.
शुभेच्छूक=श्री . महेंद्र इथापे
*आदरणीय लटींगे सर*
लहान मुले घरगुती खेळ खेळताना नेहमी १० २० ३० ४० ५० ते शेवटी शंभर असे म्हणतात आणि शंभर झाले की पळत सुटतात . कोणतीही गोष्ट जास्त हवी असल्यास ती शंभराच्या पटीत मागतात .शंभर आकडा विश्वातील सर्वात मोठा मानला जातो .
शंभरी गाठली की आनंदोत्सव साजरा केला जातो . प्रत्येकाच्या आयुष्यात शंभरी नीरनिराळे अनुभव घेऊन येते . आजच्या तुमच्या भटकंतीच्या शंभरीचा आनंद द्वीगुणित होवो . तुमच्या लेखणीला सलाम
सौ अंजली गोडसे मॅडम , सातारा
सुंदर
आपण आपली भटकंती सलग शंभर दिवस मांडली अन् आम्हाला या लाॅकडाऊनच्या दिवसात प्रत्यक्ष सहलीचा अनुभव दिलात.आपल्या सातत्याला , लेखनशैलीला मनापासून सलाम !
असेच लिहिते रहा हिच सदिच्छा
💐💐💐💐💐💐💐
श्री रविंद्र जंगम फलटण
: लटींगे सर शतक ठोकल्याचा आनंद आहेच . पण आपण नाबाद रहावं आणि द्विशतक अगदी त्रिशतकही करावं हीच शुभेच्छा !
श्री विजय पवार सर
💐💐💐💐💐👍👍
🏵️🏵️शतकपूर्ती 🏵️🏵️
आदरणीय लटिंगे सर, *माझी* *भटकंती* च्या शतकपूर्ती साठी मनःपूर्वक शुभेच्छा!
लॉकडाऊन मध्ये बाहेर पडण्यासाठी आसुसलेल्या सर्वांनाच तुम्ही वाई पासून सुरुवात करून अनेक राज्यात फिरवून आणलंत .यापुढेही *वाचनाची भटकंती* अनुभवायची असल्याने आपली *लेखनाची भटकंती* अशीच चालू राहण्यासाठी शुभेच्छा!
सौ शोभा पवार मॅडम वेळे
आदरणीय लरिंगे सर*
*आपण माझी भटकंती या लेखमालेचे आज १००भाग पूर्ण केले त्याबद्दल आपले खूप अभिनंदन , प्रवास वर्णन हा आपला लेखन प्रपंच खरचं वाखाणन्या सारखा आहे,आपली लेखन शैली आणि सादरीकरण अचूक आणि सूक्ष्म तपशील वाचकाची उत्कंठा वाढवतात .आपला हा लेखन प्रपंच पुस्तकरूपाने आमच्या हाती येऊ दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि आपणास पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा🌷👌🙏🙏*
श्री संतोष ढेबे सर महाबळेश्वर
आदरणीय शतकवीर
लटिंगे सर
आपल्या पर्यटन प्रवास वर्णन लेखन शैली
नित्य नवी टवटवीत राहीली.
अप्रत्यक्ष अनुभूती देणारं शिवधनुष्य तुम्ही लिलया पेलले.
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.जय हो*
श्री अमित कारंडे महाबळेश्वर
आदरणीय लटींगे सर*
*सर्वप्रथम तुमचं माझी भटकंती या लेखमालेचे शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन*
💐💐💐💐💐
*सर भटकंती सगळेच करतात परंतु ती भटकंती आपल्या आयुष्याला पुरेल अशी अनुभवाची शिदोरी तुम्ही जतन करून ठेवली आहे. हे फार लाखमोलाचे काम आहे .फिरायला गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य निरीक्षण,वेगळेपण, छायाचित्रण, आणि या सर्व गोष्टींच डायरीत बारकाईने नोंद ठेवणं हे फार कौशल्याचं काम तुम्ही पार पाडलंय.*
*तुमच्या हातून असंच भविष्यात लेखन व्हावे व ते आम्हाला वाचायला मिळावे हिच आमची इच्छा*
*भावी वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!*
श्री नरुटे सर
सर आपला शतकोत्तर लेखनप्रपंच प्रकाशित स्वरुपात वाचकांच्या भेटीस यावा हीच सदिच्छा!!सौ उषा महांगडे वाई
श्री लटिंगे सर आपल्या प्रवासवर्णन लेखनाच्या शतक पूर्णत्वास हार्दिक शुभेच्छा असेच माहितीपूर्ण सुंदर व वाचणीय प्रवासवर्णन वाचण्यास मिळावे यासाठी पुढील प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा!!
सौ नलिनी जाधव मॅडम वाई
*गुरुवर्य श्रीमान लटिंगे सर..*
*आपल्या विलोभनीय प्रवास वर्णनास कुर्निसात.*
*लॉकडाऊन काळातील आपल्या भटकंतीचा प्रवास एक पासून सुरू होऊन त्याने शतकपूर्ती केली हे कधी घडले समजलंच नाही..*
*आपली भटकंती रोज मनोमन उत्कंठा वाढवणारी व घरी बसून नवनवीन ठिकाणे व त्याची इत्थंभूत माहिती मिळण्याची पर्वणी असायची..*
*आपल्या तेजोमय लेखणीच्या प्रवासाचे भागीदार होण्याचे महतभाग्य लाभले..असा आपला लेखन प्रवास चंद्रकलेप्रमाणे उत्तरोत्तर वाढत जावो.ही भटकंती पुस्तकरूपाने लवकरच प्रकाशीत होवो; हीच सदिच्छा...*
*आपल्या आगामी आत्मचरित्र लेखनास मनोमन शुभेच्छा...*
श्री अमोल माने सर वाई
Very nice Sir
सर, तुम्हांला प्रेक्षणीय ठिकाणांच्या भ्रमंतीसाठी आणि ते झाल्यानंतर त्यांच्या अप्रतिम वर्णन लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा! 💐💐👏🏻👏🏻
सौ शारदा शिंदे वाई
श्री लटिंगे सर, 'माझी भटकंती 'या आपल्या सहज, सुंदर, अप्रतिम मनमोहक फोटोसहित प्रवासवर्णन लेखनाचे शंभर भाग पूर्ण झाले त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा !
सौ संगिता गायकवाड,वाई
अभिनंदन सर 💐💐आपल्या लेखनाचे आज 100भाग पूर्ण झाले.अप्रतिम वर्णन प्रत्येक भागाचे.प्रवास वर्णन वाचून प्रत्येक ठिकाणी जावून आल्यासारखे वाटले. पुढिल वाटचालीसाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा🌹🌹🌹
सौ स्वाती पाखरे,वाई
दादा लेखमालेच्या शंभराव्या भागाबद्दल मनस्वी अभिनंदनदादा🙏🙏💐💐 आपल्या सिद्धहस्त लेखनीतून साकारलेले लेख मालेचे १०० भाग म्हणजे आम्हा वाचकांसाठी एक उत्कट अनुभूती होती आणि त्यासोबतच आपल्या छायाचित्रणातून अप्रतिम छायांकन प्रत्यक्ष प्रवासाचा साक्षात्कार घडवत होते. पुस्तकरूपी प्रवासवर्णन लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा !🌹🌹🌷🌷
श्री संतोष धुरगुडे सर वाई
: श्री लटिंगे सर, 'माझी भटकंती 'या आपल्या सहज, सुंदर, अप्रतिम मनमोहक फोटोसहित प्रवासवर्णन लेखनाचे शंभर भाग पूर्ण झाले त्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐श्री इंगवले सर वाई
लटिंगे सर,
" माझी भटकंती " या शीर्षकाखाली आपण स्वतः, मित्र परिवार ,तसेच कुटुंबातील व्यक्ती व आप्तेष्ट यांचे समवेत परिसरापासुन ते विविध राज्यात प्रत्यक्ष प्रवास करून मनसोक्त आनंद घेतला.प्रत्येक ठिकाणाचे सूक्ष्म निरीक्षण केले.प्रसंग, तसेच प्रत्येक स्थळांचे चित्रीकरण केले.
माहे मार्च पासून "माझी भटकंती "या नावे एक एका भागात अखंडपणे अप्रतिम लेखनीतुन ही मालिका गुंफली.केलेले वर्णन वाचत असता स्वतः प्रवास करतो आहे असे वाटे.आजच्या या मालिकेतील भागाने पहाता पहाता शतक साजरे केले.त्याबद्दल आपले मनोभावे अभिनंदन!"""!!!!!!!
असेच लेखन आपणामार्फतव्हावे अशा मनपूर्वक शुभेच्छा !
सपकाळ बी.एम.बालेघर(सातारा
नमस्कार ,मा.रविंद्रजी लटिंगे यांच्या शंभरी गाठलेल्या भटकंती लेखमालेचा वास्तव उत्सव हा जनमानसात गरूड भरारी ठरला .या लेखमालेला पुस्तक रुपाने उदंड प्रतिसाद मिळेल यात शंका नाही .या दिशादर्शक कार्याला शिरगाव शाळा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा!!Orchid !!
श्री रामचंद्र टिके सर ओझर्डे
🌹🌹🌹🌹🌹*शतकपुर्तीच्या हार्दिक शुभेच्छा*आमचे सर्वांचे आवडते एक उत्कृष्ट संघटक,तसेच दुसर्यांना प्रेरणा देणारे, नि:स्वार्थीपणे आमच्या पाठीशी उभे राहणारे
आदरणीय आमचे परममित्र *श्री लटिंगे सर (दादा )*यांची भटकंती ही लेख मालिका म्हणजे मानवी जीवनाचा भूतकाळ, वर्तमानकाळ, आणि भविष्यकाळाची खरीखुरी नांदी आहे
त्यांनी लिहिलेली भटकंती हा लेख वाचताना असं वाटत की आपण त्या वेळी तिथेच आहोत की काय पण खरे सांगायचे तर आपणास आपल्या काही अडचणीमूळे सरांच्या (दादांच्या)बरोबर जाता आले नाही पण त्यांच्या लेख माळेमूळे तेथे असल्याचा भास होत आहे.
या लेखमालेची महती भरारी घेणारी ठरली आहे. तुमच्या जिद्दीला आमचा सलाम
*झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्षांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहत रहावा कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तूम्ही चोहीकडे पसरावा*
पुन्हा एकदा शतकपुर्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
शुभेच्छुक *श्री कासुर्डे डी. जी .*
नमस्कार
भ्रमंती ही आपली लेखमाला शंभरी पार करत आहे .आम्हाला सुद्धा भ्रमंतीची खूप आवड आहे . माणूस रिफ्रेश होतो. परंतू वर्षानुवर्षाच्या आठवणी शब्दबंधनात बांधने तसे अवघडच . ते शिवधनुष्य आपण लिलया पेललेत. लोकांच्यात यामुळे पर्यटणाची आवड निश्चितच जागृत होईल यात शंका नाही .
या लेखमालेबद्दल आपल्याला मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा💐💐
नागेश जगताप ,आनेवाडी
भटकंती चे आपले नाबाद 100 भाग प्रसारित झाले आपली प्रवासवर्णने वाचताना जणू स्वतः तिथे आहोत असा प्रत्यय येतो दर्जेदार सुंदर असे आपले लिखाण असते आम्हां वाचकांना एक वाचन पर्वणीच असते आपले लिखाण असेच बहरत जावो पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा!!
श्री रमेश लोखंडे, कवठे वाई
अतिशय छान लेखन..प्रेरणादायी.. ज्यामुळे आम्हा वाचकांना देखील अशा पद्धतीने आठवणीतील प्रवास वर्णने किंवा इतर अनुभव लिहिण्याचा मोह आवरत नाही.. ..तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..
श्री राहुल वाकचौरे सर संगमनेर
अतिशय छान लेखन..प्रेरणादायी.. खूप शुभेच्छा....गुरुजी म्हणजे शान आहेत ओझर्डेची
श्री सोमनाथ भंडलकर फोटोग्राफर ओझर्डे
माझे वर्गमित्र श्री लटिंगे यांनी अतिशय सुंदर शब्दांकनात प्रवासवर्णनाचे १०० भाग यशस्वीपणे पूर्ण केले. प्रत्येक भाग वाचताना प्रत्येक वेळी आपण स्वतः तो निसर्ग प्रवास करीत आहोत असा भास व्हायचा.
खूपच सुंदर व आर्कषक लेखनशैली त्यांची आहे. त्यांच्या पुढील लेखनांस अनंत अनंत शुभेच्छा..!
श्री अनिल पवार सर सातारा
गुरुजी अभिनंदन !आता आठवणींचे प़काशन केलेच पाहिजे.
श्री विक्रमसिंह पिसाळ देशमुख ओझर्डे
भटकंती १०० भाग पूर्ण एक मैलाचा दगड पूर्ण झाला...
पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!💐💐💐💐
श्री शरद पोतदार सर , बावधन
१०० धावा बनवणेसाठी काढलेली प्रत्येक धाव ही महत्वाची असते.
शतकपूर्ती ही नक्कीच महत्वपूर्ण आहे.
श्री धर्मेंद्र दीक्षित, वडवली वाई
छोटीशी सुरुवात 100 भागापर्यंत कशी पोचली ते कळाले देखील नाही अभिनंदन सर.
श्री शैलैश पिसाळ देशमुख ओझर्डे
भटकंती लेखनमाला १०० भाग पूर्ण well done Sir!!!💐💐💐💐
श्री शशिकांत कदम सर बावधन
Comments
Post a Comment