निसर्ग सौंदर्य भीमाशंकर अभयारण्य कविता ४१
जंगलवाट
कुठून आलो ती वाट दिसतेयका
हातवारे करून दाखवी एकमेका
भटकंतीने वनाचे निरीक्षण
परिसराचे होते वाचन||
माथ्यावर आलेली दिसतेयका जंगलवाट
झाडीतलपलेली निसरडी कातळवाट
डोंगर कुशीतील ग्राम नजरेआडचे धाम
या वनाचे महादेव वन नाम ||
निळी सोनेरी छटा सुंदरी
पक्ष्यांच्या कोलाहलाची वाजे बासरी
गार वाऱ्याची होई झोंबाझोंबी
वनराई बघायला पाऊले थांबी||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४१
Comments
Post a Comment