गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी


         🌸 ओझर्डे गावची वैभवशाली छत्रदायिनी  श्री. पद्मावती देवी..


     ग्रामदैवत श्री पद्मावती  देवी
ओझर्डे निवासिनी श्री पद्मावती माता
➖❄️➖❄️➖❄️➖❄️
  ओझर्डे गावचे ग्रामदैवत श्री पद्मावती देवीचे मंदिर
वाईहून गावात पुल ओलांडताच लक्ष वेधून घेते. देवीचे मंदिर चंद्रभागा ओढ्याच्या काठावर आहे.गावात प्रवेश करतानाच मंदिर लागते. चारही बाजूने भक्कम तटबंदी आहे.तटबंदीला पवळी म्हणतात. पुर्वेस तोडीच्या दगडात बांधलेले उंच प्रवेशद्वार असून त्यावर नगारखाना आहे.त्यामुळे प्रवेशद्वार भारदस्त आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्हीकडे निवांत थंडावा देणारी ढेलजा आहे. उजवीकडे नगारखान्यावर जायला तोडीच्या दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर समोरच तुळशीवृंदावन दिसते.मंदिराचा मुख्य भाग हेमाडपंथी असून दगडी बांधकाम आहे. सभामंडप व गाभारा आहे.गाभाऱ्यात चांदीची मेघडंबरीवर सुबक नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपात पालखी व झुंबर आहे.सभामंडपातून बाहेर जायला दोन्हीकडे छोटे दरवाजेआहेत.मंदिरात डावीकडे दीपमाळा आहे.तेथील मोकळ्या आवारात गावचा हरिनाम सप्ताह संपन्न होतो.
          पुर्वी येथील मोकळ्या जागेत नाटक व पडद्यावर सिनेमे तिकीट काढून बघितले आहेत.सोनेश्वर परिसराच्या विकासासाठी व्हिडिओवर आणि पडद्यावर
 तिकीटं काढून  सिनेमे पाहिलेत. हल्ली दानशूर भाविकांनी व ग्रामस्थांनी मंदिराचा जीर्णोद्धार करुन आखीवरेखीव रंगकाम करुन कायापालट केला आहे. सुशोभीकरण केले आहे.शांत व समाधान मंदिरात गेल्यावर लाभते .छोटेखानी स्टेजवजा व्यासपीठ बांधलेले आहे. पटांगणात सिमेंट ब्लॉक्स बसविले आहेत. तिथचं छोटेखानी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम संपन्न होतात. पुजारी नित्यनेमाने  स्वच्छता, पूजा-अर्चा करतात.देवळातील प्रसन्न  व भक्तीमय  वातावरणात मनःशांती लाभते. देवीचे दर्शन नित्यनेमाने दररोज गावकरी घेतात.जागृत देवस्थान म्हणून देवीचा लौकिक आहे.मुर्तीचे रुप तेजोमय दिसते. मंदिरात नवरात्र उत्सव सोहळा  असतो.त्यावेळी देवीची मूर्ती विविध रुपात साकारतात.समस्त गावकरी ,भाविक दररोज दर्शनासाठी जातात. शक्ती ,भक्तीची आद्य देवी पद्मावतीमातेची बहुतांश महिला नवरात्रात मनोभावे देवीचे उपवास करतात.त्यावेळी देवळात भजन, जागर व होमहवन होते.
     दसऱ्याला देवीची पालखीतून मिरवणूक निघते.दर मंगळवारी व पौर्णिमेला पालखी गावातील इतर देवांना भेटायला जाते.मंदिरालगत विठ्ठल रखुमाईमंदिर व चावडी आहे. समोर श्रीराम मंदिर उजव्या बाजूला मारुती मंदिर आहे श्री तुकाबाई मंदिर,श्री लक्ष्मी माता मंदिर. गावात मुख्यमंदिरा शिवाय गावच्या वेशीवर व जाधव आळीला संतसेना वस्ती येथेही श्री पद्यावती देवीचे मंदिर आहे.श्री पद्यावती देवीची यात्रा चैत्र महिन्यात कृष्ण चतुर्थी व पंचमीला भरते.आमच्या गावची सर्वांची  मायमाऊली,रक्षणकरिती छत्रदायीनी आईसाहेब श्री पद्यावती माता की जय...... शुभाशीर्वाद दायनी आणि कृपाछत्रधारिणी पद्मावती देवी

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा