बालपणीच्या आठवणी--गॅदरिंग
🦋🌱🦋🌱🦋🌱🦋🌱🦋🌱
बालपणीच्या आठवणी
🎭 गॅदरिंग 🎭
🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻
गॅदरिंग, स्नेहसंमेलन, विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली होती. पतित पावन विद्यामंदिर,
ओझर्डे हायस्कूल मध्ये इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत असताना गॅदरिंग मध्ये अभिनय कला सादर करण्याची संधी आदर्श मुख्याध्यापक व आम्हा विद्यार्थ्यांचे दैवत.श्री एस.के.कुंभार सर,वर्गशिक्षक श्री चौगुले सर , कार्यक्रम प्रमुख श्री वीर सर व श्री बिसले सरांमुळे मिळाली.
प्रेक्षकांसमोर कलाविष्कार सादरीकरणाची पहिली संधी दिली...
कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या नटसम्राट या सुप्रसिद्ध नाटकातील श्री.गणपतराव बेलवलकर (आप्पा) यांचा गाजलेला स्वगत संवाद "कुणी घर देता का घर ?
एका तुफानाला कुणी घर देता का? To be or not to be that is the question.जगावं की मरावं हा एकच सवाल.
आणि राम गणेश गडकरी यांच्या "एकच प्याला" नाटकातील सुधाकराचा स्वगत संवाद "आमच्या श्री एस.के.कुंभार सरांनी माझ्या कडून बसवून घेतले होते .त्यातील संवाद फेक, आवाजातील चढ-उतार, हावभाव युक्त सादरीकरण कसे करायचे याचे प्रात्यक्षिक टेपरेकॉर्डरवरील संवाद ऐकायला लावले होते.सर कार्यालयात सराव घ्यायचे...
त्यावेळी आमच्या हायस्कूल मध्ये रेकॉर्ड डान्स नसायचा.सगळी गाणी तबला पेटी वर बसवून मुलामुलींचा ग्रुप गाणं म्हणायचा.त्या तालावर ठेक्यावर नृत्य सादर केले जायचे.त्यावेळी आमच्या शाळेचे समई नृत्य तबला पेटी वरील एक नंबर सादर व्हायचे.जिल्ह्यात प्रसिध्द होते.सगळे प्रेक्षक टाळ्या वाजवून शाबासकीची दाद द्यायचे..पेटीवादक श्री मोहन गुरव तबला वादक श्री आप्पा गुरव,खंजिरी वादकश्री गणपत सोनावणे व टाळ वादक श्री बाळासाहेब जाधव वाद्यवृंदात असायचे.खूप छान संगीत साथ करायचे.त्यांच्यामुळेच "समई नृत्य " हा बहारदार कार्यक्रम जिल्हास्तरावरही फेमस होता.तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमात समुहगीते ,प्रार्थना, देशभक्तीपर गाणी,नक्कला, कविता,एकपात्री, नाट्यछटा व बालनाट्य सादर व्हायची.
आम्ही इयत्ता नववीत असताना यात्रेतील तमाशा पाहून एक " पाच मिनिटे" नावाची नाट्य छटा लेखन करुन सादर केली होती.दरोडेखोराला पोलिस पकडतात या बेसवरील नाट्यछटा होती.यात मी सखा पोलिस ,शिवाजी चव्हाण तुका पोलीस,सुधीर फरांदे इन्स्पेक्टर व दरोडेखोर शांताराम जायगुडे होता.लय मजा यायची पोलिसांचे फार्सिकल संवाद बोलताना गंमत वाटायची.पब्लिक टाळ्या वाजवून दाद द्यायचे.लहानमुलं खळखळून हसायची... सुधीर फरांदे स्टेजवर आल्यावर तर प्रेक्षकांनी टाळ्या व शिट्या वाजवून एन्ट्रीलाच स्वागत. पेहरावावरून आणि बलदंड शरीरयष्टीतला रुबाबदार इन्स्पेक्टर गॉगल घालून स्काउटच्या पेहरावात उठून दिसत होता.मराठी शाळेच्या मैदानावर रात्रीचा कार्यक्रम संपन्न झाला होता. कौतुक करणाऱ्या ओझर्डे गावच्या रसिक प्रेक्षकांसमोर आणि समस्त आबालवृद्धांसमोर पहिली कला सादर करण्याची संधी मिळाल्यामुळेच मला कलाविष्कार नाट्य मंडळात सहभागी होण्याची संधी मिळाली.स्टेजवर अभिनय , संभाषण व सुत्रसंचलन करण्याची बीजे या गॅदरिंग मध्येच रुजल्याने मी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेता आला .माझ्या अनेक शाळेतल्या मुलांना कलाविष्कार सादरीकरणाची संधी गॅदरिंग मुळेच देवू शकलो..
कला म्हणजे सत्याचा शृंगार होय....
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक १४ मे २०२०
Comments
Post a Comment