आमची शाळा आमचे उपक्रम-रचनावाद
ज्ञानरचनावाद शाळा अभेपचरी
🍀ज्ञानरचनावाद🍀
जाँन पियाजे यांच्या विचारानुसार , सर्व मुले सारखी आहेत पण विचाराने वेगळी आहेत. ग्रहण करण्याची क्षमता प्रत्येकाची वेगवेगळी असते यासाठी अध्ययन स्तरानुसार वर्गात गट तयार करून त्यागटानुसार विविध उपक्रमातून मूल स्वत: शिकले पाहिजे.वर्गात अध्ययन स्तरानुसार शैक्षणिक साहित्याची मांडणी व रचना असावी. शिक्षक आपल्या कल्पकतेने साहित्यनिर्माण करून मुलांना वापर करण्यासाठी प्रेरणा देत आहेत विविधांगी वर्गरचना करून प्रत्येक मुलाकडून कृती करून घ्यावी.
दरम्यान मुलांचे निरीक्षण करावे छोटे छोटे सूचक प्रश्न विचारून अचूक उत्तरापर्यत पोहचण्यासाठी प्रवृत्त करावे.गरज पडेल तिथे मार्गदर्शन करावे.आपले मूलांशी मैत्रीचे व आपुलकीचे नाते असावे. निबंध लेखनाचे प्रश्न सर्वमुलांना अचूक येण्यासाठी प्रथम मुलांशी गप्पा माराव्यात चर्चा करावी व सर्वांना सहभागी करून घ्यावे.फलकावर निबंधाचे नांव लिहून त्या विषयाशी संबंधित शब्द मुले सांगत असताना शिक्षकांनी फक्त फळ्यावर शब्दलेखन करावे विषयातील काही आशयाचे शब्दाकन न आल्यास मार्गदर्शन करावे .त्यानंतर प्रत्येक मुलांना माईंड मँप वरून प्रत्येक शब्दांची वाक्ये तयार करून लेखन करावयास सांगावे त्यानुसार मुले विस्तृतपणे लेखन करतात.
वरील प्रमाणे निबंध लेखन उपक्रम ज्ञान रचनावाद पध्दतीने घेतला आहे!!!
🍀🍀🍀🍀🍀🌺🍀🍀🍀
आमच्या वाई तालुक्यात तीन वर्षापासून ज्ञान रचनावाद पध्दतीने अध्ययन अनुभव 🌿🌺गटशिक्षणाधिकारी श्री एच. व्ही.जाधव यांच्या मार्गदर्शनखाली सुरू आहे.🌿🌺
💐💐💐💐💐💐💐💐💐
ज्ञानरचनावादी शिक्षणाचा वाई पॅटर्न
👌👌👌👌👌👌👌👌👌
आमच्या वाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने ज्ञानरचनावाद या संकल्पनेचा गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षणामध्ये वापर केल्याने विद्यार्थ्यांचं शिकणं ख-या अर्थाने सुरु झालेलं आहे. मुलं त्यांच्या क्षमतेनुसार कमी अधिक गतीनं शिकू लागली. यासाठी शिक्षकांनाही सकारात्मक दृष्टिकोन आणि अधिक चिंतनशील व्हावे लागले. एकच गोष्ट शिकण्यासाठीचे अनेक मार्ग शोधावे लागले. दैनंदिन शिक्षण प्रक्रियेतील उपक्रम आणखी विविधतेने राबविले.
उपक्रम -
१. विद्यार्थ्यांचे बौद्धिक स्तरानुसार विषयनिहाय अध्ययन गट.
२. भाषा विकासासाठी अधिकाधिक चित्रांचा प्रभावी वापर.
३. चित्रावरून घटना - प्रसंग - गोष्ट - संवाद - वर्णन इ.
४. असंबधित शब्दावरुन प्रसंग - गोष्ट लेखन.
५. अपरिचित उता-यांचे समजपूर्वक, गतीने वाचन, प्रश्ननिर्मिती.
६. भाषिक खेळ.
७. व्याकरणातील घटकांसाठी गमतीदार उपक्रम.
८. हस्ताक्षर सुधार तसेच उच्चारणानुसार लेखन.
९. संबंधित शब्दाच्या याद्या.
१०. विविध घटनाक्रम - टप्पे.
११. विविध घटनांचे संवाद लेखन.
१२. संख्याज्ञान - विविध साधनांचा वापर करुन.
१३. संख्यानाम, संख्याराशी, संख्याचिन्ह यांच्या दृढीकरणासाठी उपक्रम.
१४. विविध मुलभूत क्रियांचे व्यवहार मांडणी - कृती.
१५. संख्यारेषांच्या सहाय्याने विविध कृती
१६. मापन, प्रात्यक्षिक, दृढीकरणासाठीचे खेळ.
१७. नकाशा तयार करणे, वाचन व नकाशावरील खेळ.
ज्ञानरचनावादामुळे मुलांच्या भाषा आणि गणित विषयांचा विकास अतिशय चांगल्या गतीने होत आहे शाळा शंभर टक्के प्रगत होत आहेत
Comments
Post a Comment