माझी भटकंती मुरुड बीच भाग क्र.तीस ते एकतीस

माझी भटकंती
माझी भटकंती
🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸🌱 
  🛶माझी भटकंती🛶
क्रमशः भाग क्र.तीस
सन जून २०१७
            🖼️ कोकण🖼️










❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️❄️
    कोकणची किनारपट्टी निसर्ग सौंदर्याची खाण..... डहाणू पासून वेंगुर्ले पर्यंतच्या अरबी समुद्राच्या  खाड्या, समुद्रकिनारे, धबधबे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा गाणारे जलदुर्ग, शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले गडकिल्ले.
स्वराज्याची राजधानी रायगड , भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह.
संस्कारीविचाराचे  समाजशिक्षक व साहित्यिक साने गुरुजी यांची जन्मभूमी.  विविध क्षेत्रातील नामांकित समाजधुरिणांची  जन्मभूमीतील स्मारके. त्यांच्या कार्याची आठवण भेट. अनेकविध धार्मिक तीर्थक्षेत्रे , सह्याद्रीच्या डोंगररांगा,अवघट घाट,खळागत वेगाने धावणाऱ्या नद्या, कड्यावरुन वहाणारे धबधबे ,
नारळी पोफळीच्या बागा, जगप्रसिद्ध हापूस आंब्याच्या बागा, फणसाची अवीड गोडी, निसर्गातील रानमेवा करवंदे व  जांभळं मनसोक्त खात भटकंती करायची.मासे खाण्यासाठी पर्यटन,रिव्हरसाईडवरील रायडिंग,लज्जत वाढविणारा कोकम सरबत,  डोंगराच्या आणि सागराच्या सहवासात वसलेली व झाडांच्या गर्द छायेत वसलेली गावं,छोटी पण सुबक घरं.लाल मातीचा वतनवारसा जोपासणारी काजू व फणसाच्या गरासारखी गोड माणसं.ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जतन करणारी अनेक गांव,जंगलातील जैवविविधतेने नटलेला निसर्ग.
धरतीची अनेकविध रूपे एकाच भागात पहायला मिळतात ते कोकण किनारपट्टीत.
    मुंबई ते गोवा हायवेने भटकंती करताना अनेक वैविध्यपूर्ण ठिकाणं पहायला मिळतात... सिनेसृष्टीला भुरळ घालणारी कोकण किनारपट्टी . भारताचा कॅलिफोर्नियाच जणू....
   दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत ट्रीपला ठरवताना पहिल नाव कोकणातलं हमखास येणारच . कोकणात डी.एड.
कॉलेज असताना प्रथम गेलो होतो..नंतर संधी मिळालीकी कोकणवारी होते.कुटूंबातील  सर्वांबरोबर,शिक्षकमित्रांबरोबर आणि गावातल्या मित्रांसोबत अनेकदा कोकण  फिरलोय... त्यापैकी मुरुड बीचवर अधिकतर गेलोय.मनाला भुरळ घालणारे ठिकाण..




   
       मुरुड जवळील अंबवलीला आमचे शिक्षकमित्र श्री विशाल जरंडे सर होते.१५ वर्षांपूर्वी प्रथमतःखास मासे खायला त्यांच्याकडे गेलो होतो. मित्रामुळे आमची हर्णे ,अंजार्ले व  मुरडबीच ट्रीप झाली. दापोली मार्गे मुरुड चौकात आलो की समोर श्री दुर्ग मातेचे मंदिर व सभामंडप आहे.उजव्या बाजूला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे स्त्रीशिक्षणाचे उद् गाते यांचा पुतळा व स्मारक आहे..मुरुड अण्णांची जन्मभूमी.उजवीकडचा रस्ता हर्णे बंदराकडे जातो.तर डावीकडील रस्ता गावात जातो.
तिथं जवळच वाचनालय आहे..
मंदिरापासून उजव्या बाजूच्या रस्त्याने आपण मुरुड बीचवर जातो...


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https:// raviprema.blogspot.com



     माझी भटकंती
 भाग-क्र.एकतीस

कोकण मुरुड व हर्णे बंदर
सन २०१७
    सकाळच्या शांत आणि प्रसन्न वातावरण बीचवर फिरायला,
जाॅगिंग, चालायला व रफेट मारायला एक नंबर ठिकाण आहे.मऊ रुपेरी वाळू, शांतपणे येणाऱ्या लाटा,डोलणारे व झुलणारे माड,वाऱ्याची हळुवार पणे येणारी झुळूक...अशा वातावरणात मनःशांती लाभते.थकवा जातो.उर्जा मिळते.त्यावेळी तुरळक पर्यटक असायचे फक्त विकएंडला गर्दी असायची..... हसतखेळत लाटांवर स्वार होत मनसोक्त समुद्रात पोहायचं.वाळूने अंग चोळायचे.वाळूत खेळायला मजा यायची.बीचवरील विविध रायडिंग चा आस्वाद घ्यायचा.मस्तपैकी फोटोग्राफी करायची..
१५ वर्षांपूर्वी बीचवर एक-दोन हॉटेल व लॉजिंग तेही उपलब्ध नसल्यास घरगुती मुक्काम व भोजनाची सोय करायला लागायची.आम्ही त्रिमूर्ती हॉटेलमध्ये राहिलो होतो...आज अनेक बीचरिसाॅर्ट व हॉटेल्स पॅकेजसह उपलब्ध आहेत.... समुद्रात मनसोक्त पोहल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी येवून अंघोळ करायची..
लाईट नाष्टा करून मासे खरेदीला हर्णे बंदरावर जायचं...मोठाले ट्रॉलर व बोटी मासेमारी करून बंदरात येतात. तिथं माश्यांचे  अनेकविध प्रकार बघायला मिळतात.सुरमई, कोळंबी, पापलेट व इतर माशांचे लिलाव तिथं होतात त्यामुळे खरेदीदार,ग्राहक व खवय्ये पर्यटकांची गर्दी होते.. आपल्याला पाहिजे तेवढी मासळी विकत घेऊन पुन्हा मुरुडला यायचं..
  हर्णेबंदराजवळ दीपस्तंभ आहे. सुवर्णदुर्ग व इतर दोन-तीन दुर्ग आहेत.सुवर्णदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता. कर्दे व अंजार्ले बीचही प्रेक्षणीय व रमणीय आहेत.अंजार्लेयेथील कड्यावरचा गणपती प्रसिध्द आहे...
  हर्णेबंदरावरुन मासे घेऊन आल्यावर घरगुती बनवायला दिले..पापलेट फ्राय,सुरमर्ईचं कालवण आणि कोळंबीचा रस्सा.भात अन् तांदळाची व  ज्वारीची भाकरी असा बेत बनवायला सांगितला.अन्  क्रिकेट खेळ जेवण येईपर्यंत सुरू केला..कारण कुठल्याही तेव्हा मोबाईलला रेंज नसायची.केवळ हर्णेत असायची... आता नेटवर्क सगळीकडे आहे..... दरम्यान ऑडरवाला जेवण घेऊन आला की सर्वांनी एकाच वेळी जेवायला बसायचे सगळे जेवणाचे पदार्थ पुढ्यात ठेवायचे, एक-दोघांनी पाहिजे तेवढ प्रत्येकाला वाढायच. जेवायला सुरूवात . मस्तपैकी चवीवर,माश्यांवर गप्पामारत ताटातील जेवणावर यथेच्छ व भरपूर ताव मारायचा.....
     रमणिय समुद्र किनारा
      मासे खवय्येगिरी
        विरंगुळा
       निसर्ग पर्यटन
    या कारणांमुळे मुरुड बीच आवडतो..
     आता पर्यटन विकासाला चालना मिळाल्याने नवनवीन सोयी किनाऱ्यावर उपलब्ध होतात....
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड