गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा




🌸माझा गाव🌸
         आमच्या गावची यात्रा
➖〰️➖〰️➖〰️➖〰️
                  लोकनाट्य तमाशा
ग्रामीण भागातील लोकांचे मनोरंजनाबरोबरच प्रबोधन तमाशा कलाकार करीत.. आमच्या गावात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तमाशा मंडळांनी सादर केले आहेत.दत्ता महाडिक,अमन तांबे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर,मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर,साहेबराव नांदवळकर, भिकाभीमा व इतर अनेककांचे तमाशे झाले आहेत... यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी नवीन कपडे घालून  देवळाकडील दुकाने बघायला जायचं.
खुशखबर खुशखबर , ओझर्डे गावच्या तमाशा रसिकांना इनंती करण्यात येते की थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होतय...सर्वांनी लवकर या  असा आवाज ऐकू आलाकी धावतपळत तमाशा बघायला देवळाकडे जायचे....सगळ्यात पुढे बसायचं 
 गणाने तमाशाला सुरुवात.(गण म्हणजे गणेश वंदना),हलगी व ढोलकीची जुगलबंदी साथीला क्लोरोनेटची धून ,मग गवळण ,फार्सिकल, 
 संगीतबारी आणि वगनाट्य असा कार्यक्रम चालायचा





तमाशातील फार्सिकल( गावातल्या दोस्तांच्या विनोद गप्पा) ऐकताना खो-खो हसायला यायचं. त्यांची  संवाद फेक, समयसूचकता व शब्दाला प्रतिशब्द आणि अस्सल ग्रामीण बाजात ढंगात सादरीकरण तमाशातलं वगनाट्य खास आवडीचे एक नाटकच बघायला मिळायचे. त्यातील हवालदारांचे किंवा राजा प्रधानजीचं नर्मविनोदी ,द्विअर्थी व चपखल फार्ससिकल
बोलणं ऐकताना पोटधरून हसायला यायचं..असचं वगनाट्य पाहून आम्ही हायस्कूलच्या गॅदरिंगला
डॉयलॉग लिहून एक नाट्यछटा सादर केली होती. आत्तापर्यंतच्या तमाशातील देवळाच्या पुढे झालेल्या साहेबराव नांदवळकरांच्या तमाशातील सामाजिक वग  "कराडची कुऱ्हाड अर्थात चित्ता फाडला जावलीचा"ह्यातील 'दावका तुला मिलेकट्रीचा कचका'हा संवाद आजही हमखास तोंडावर येतो. अन् बालपणीच्या यात्रेत फिरवून आणतो.
तसेच वगनाट्यातील हुबेहूब कोर्टातला खटला फिरत्या रंगमंचावर सादर झाला होता..नंतरच्या काळात मराठी शाळेच्या मैदानावर तमाशा  होवू लागला.त्यावेळी मंगलाताई बनसोडे  तमाशाची संगीतबारी आॅर्केस्ट्रा सारखीच सादर झाली होती... काही हौशी पोरं आवडतं गाणं सुरू झालं की  गाण्याच्या तालावर नाचायची  हौस भागवून घ्यायची... तीन-चार वाजता तमाशा सुटला की घरी जाऊन मटनाचं कालवण व भाकरी कुस्करून मस्तपैकी जेवायचं आणि कुस्त्याची चर्चा दोस्तांबरोबर करायची



क्रमशः

Comments

Popular posts from this blog

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड