घरीच राहूया ,कोरोनाला हरवूया भाग--२
📖✒️🗣️ घरीच राहून काम........
🔰माझं मत🔰
उतरार्ध
कोरोना व्हायरस या संसर्गजन्य साथीच्या आजारामुळे भारत लाॅकडाउन झाला.
➖➖➖➖➖➖➖➖
दुसरा लाॅकडाउन जाहीर झाल्यावर तर खुपच नाराज झालो.पहिल्या सारखाच लटका राग.... पुस्तक वाचन,टि.व्ही.मोबाईल आणी झोप .करावं काय? अशी विवंचना असताना जुने अल्बम चाळायला सुरूवात केली.फोटो पाहून साठवणीतल्या आठवणी मनात रूंजी घालू लागल्या.अनेक फोटोंचे मोबाईल क्लिक केले.वेगळ्या वाटणाऱ्या फोटोशी हितगुज करताना सहज आयडीयाची कल्पना मनात चमकली.ज्ञानरचना पध्दतीने मुलांचे उपयोजन होण्यासाठी शब्द,चित्र अथवा वस्तू देवून लेखन संभाषणातून व्यक्त व्हायला सांगतो.याच रितीने चित्रा वरुन आपल्याला जमतंय का म्हणून सुरुवात केली.डायरेक्ट मोबाईलवर लिहायला....जणू लागलं.माझे शिक्षकमित्र श्री शिवाजी निकमांनी लिहिण्याला प्रेरणा देणारा राजन खान यांचा फेसबुक वरील पाठविलेला लेख वाचला . लेखातील सकारात्मकता आवडली. लिहिण्यासाठी मनाची तयाची सुरू झाली.दरम्यानच्या काळात लिखतं होण्यासाठी काय करावे ? याची मार्गदर्शक पोस्ट उपक्रमशील शिक्षक ग्रुपचे मार्गदर्शक पत्रकार शिक्षकमित्र श्री सुनील शेडगे (आप्पा )यांनी शेअर केलेली वाचली.वाचल्यानंतर लिहिण्याचा संकल्प केला... यापूर्वी अनेक कार्यक्रमाची माहिती वजा बातमी लिखित मिडीयाद्वारे इतरांना समजावी म्हणून अहवाल स्वरूप बातम्यांसाठी लिहित होतो.तो अनुभव जमेस धरून प्रथमतः चला साठवणीतल्या आठवणींना स्मरून आपले अनुभव इतरांशी शेअर करण्यासाठी लेखन करूया.चिरकाळस्मरणात राहणाऱ्या गावच्या आठवणी व आतापर्यंत झालेली भटकंती स्मरून लिहायला सुरुवात केली.... दरम्यान काळात आदरणीय केंद्रप्रमुख श्री दीपक चिकणे सर यांनी सुट्टीच्या काळात काय करताय यासाठी फोनवरून संपर्क केला......सर मिळालेल्या संधीच सोनं करा.कायतरी लिखाण करा .त्यांनी लेखनासाठी प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या..व छंदिष्ट गुरूजींच्या कथा ग्रुपमध्ये समाविष्ट करु का? असे विचारले.मी होकार दिला....लेख शेअर करायला दोन्ही ग्रुपवर सुरुवात केली........अनेक शिक्षक मित्र व फेसबुक मित्रांनी उत्साहवर्धक प्रतिक्रिया दिल्या..
अस्वस्थ वाटणारं वातावरण हळूहळू बदलू लागलं.लेखनात मन रमू लागले. लेखनप्रपंच सुरू झाला.. यामुळे सतत मोबाईल जवळ आला..... भटकंती लेखन बध्द होवू लागली.... आता वेळ पुरेना अनेक आठवणींना उजाळा द्यायचाय..जो याकाळात मित्रासारखा मदत करतोय "मोबाईल" त्याचीच यमक जुळवून मनातील भावना व्यक्त करतोय.
मोबाईलशी मैत्री
मोबाईलच्या संगतीने गेला कंटाळा
सहल,भटकंतीला बसलाय आळा
फेसबुक-व्हाटसअप चॅटिंग संपर्क
मोबाईलवर आठवणी लिहिण्यात गर्क
यापूर्वी लिहा वाचायला वेगळे मार्ग
याच्यात एकत्र सगळेच वर्ग
लाॅकडाउनच्या काळात
किंमत कळली
आई-वडीलांशी भेट
व्हिडिओ कॉलिंगने घडवली
एकलेपणात खरी याचीच गरज
आता फावला वेळ नाही उरत
घरातल्या सर्वांची काळजी घेतोय
घरीच राहून काम करतोय
बोललकी लिहीतोय
कुतूहल वाढवतोय
नव नव शिकतोय
वेळ मजेत जातोय......
मानवतावादी दृष्टिकोन
ठेवून घरीच थांबलोय...
शारीरिक अंतर ठेवून
इतरांशी वागतोय.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻याच काळात.... दवाखाने, रस्ते,कार्यालये व विविध सेवेच्या संस्थांतील सेवकवर्ग कोरोना रुपी साथीचा आजार बरा व्हावा म्हणून प्रयत्न करतायत त्याची संवेदना व जाणीव ठेवून.. त्यांच्या कार्यास लाखो सलाम
हे दिवस लवकर बदलावेत म्हणून काम करणाऱ्या तमाम पोलीस,डाॅक्टर,नर्स,केमिस्ट, वीज कामगार,सफाई कर्मचारी, सेवाभावी संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था व शासन आणि युध्दपातळीवर प्रयत्न करणाऱ्या ज्ञात-अज्ञात भारतीयांना सलाम....व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन❗
रविंद्र लटिंगे,वाई
दिनांक ८ एप्रिल २०२०
Comments
Post a Comment