Posts

पुस्तक परिचय क्रमांक:२९७ डोळस भटकंती

Image
२९७ ||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव -डोळस भटकंती  लेखक: प्र.के.घाणेकर 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९७ पुस्तकाचे नांव-डोळस भटकंती  लेखक:प्र.के.घाणेकर प्रकाशन-स्नेहल प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२००८ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–२२३ वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन किंमत /स्वागत मूल्य-२२५₹ ”””””””””””””””””””””””””””””””””””         डोळस भटकंती  एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर त्या ठिकाणी काय बघावं, कसं पहावं? हिंडायला- फिरायला आपण सगळेच जातो.पण अशा भटकंतीत नीट लक्ष देऊन बारकाईने पाहिले तर आपणाला वेगळीच अनुभूती घेता येते. अनुभवांची गाठोडी बांधूनी| काही कडू, काही गोड आठवणी|| जपल्या मी माझ्या मनी| अशी ही भटकंतीची कहाणी|| -प्रा.प्र.के.घाणेकर “उघडे डोळे आणि चालणारे पाय लाभलेल्या” प्रा.प्र.के.घाणेकर यांनी केलेल्या भ्रमंतीत पाहिलेल्या,बघितलेल्या, अनुभवलेल्या ठिकाणांची वैविध्यपूर्ण माहिती आपणा सर्वांसाठी ‘डोळस भटकंती’या अक्षरधनात शब्दबध्द केल्या आहेत...

पुस्तक परिचय क्रमांक:२९६ सोनहिरा डॉ पतंगराव कदम जीवन चरित्र

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९६ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव - सोनहिरा डॉ.पतंगराव कदम  लेखक: बा.ग.पवार  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९६ पुस्तकाचे नांव-सोनहिरा डॉ. पतंगराव कदम  लेखक: बा. ग. पवार प्रकाशन-मातृभूमी प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१९९६ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–३०४ वाड़्मय प्रकार-जीवनचरित्र किंमत /स्वागत मूल्य-२००₹ ””””””””””””””””””””””””””””””””””” भारती विद्यापीठाचे संस्थापक, लोकश्री डॉ.पतंगराव कदम यांच्या  जीवनचरित्राचा आणि कार्यकर्तृत्वाचा आलेख सन १९९६ साली एकावन्नाव्या वाढदिवसानिमित्ताने हडपसर येथील शाळेतील सहकारी श्री बा.ग.पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात आभाळाला गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सहकाऱ्याचे ‘सोनहिरा डॉ पतंगराव कदम’यांचे जीवनचरित्र भावस्पर्शी शब्दात आणि समर्पक रंगीत छायाचित्रात उलगडून दाखवले आहे. एखाद्या असामान्य व्यक्तिचा स्वप्नवत ध्यास प्रत्यक्ष साकार होत असताना त्या प्रवासाचे साक्षीदार असणारे लेखक बा. ग. पवार आहेत...

पुस्तक परिचय क्रमांक:२९५ प्रतापगडाची जीवनगाथा

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९५ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -प्रतापगडाची जीवनगाथा  लेखक: इंद्रजित वसंत सावंत  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९५ पुस्तकाचे नांव-प्रतापगडाची जीवनगाथा  लेखक: इंद्रजित वसंत सावंत  प्रकाशन-साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२६ द्वितीयावृत्ती पृष्ठे संख्या–१९२ वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” मराठा इतिहासाचे संशोधक, अभ्यासक व लेखक इंद्रजित वसंत सावंत यांनी दुर्गसंवर्धन आणि वारसा जतन या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.शिवकालीन इतिहास, दुर्ग आणि ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन यासाठी ते ओळखले जातात. सह्याद्री पर्वतातील काळजाचा ठेवा म्हणजे महाबळेश्वरचा प्रदेश.याच प्रदेशात चंद्रराव मोरे यांचा ‘जावली’प्रदेश जिंकून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. प्रदेशावर चुहूबाजूंनी लक्ष ठेवण्यासाठी गडकिल्ले असणं आवश्यक होतं.म्हणून छत्र...

पुस्तक परिचय क्रमांक:२९४ सुमनांचे रेखांकन

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९४ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -सुमनांचे रेखांकन  लेखक:सौ रेखा विजय शिर्के  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९४ पुस्तकाचे नांव-सुमनांचे रेखांकन  लेखक:सौ रेखा विजय शिर्के  प्रकाशन-प्रणीत प्रकाशन, सातारा  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-९मे २०२३ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–९६ वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ ”””””””””””””””””””””””””””””””””””””””””  कलासाधक प्रतिभावंत आपल्या सभोवताली असणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन बहुविध प्रकारे सादर करत असतो.कोणी आपल्या कुंचल्यातून निसर्गचित्र साकारतो तर कोणी त्यावर गोष्टी सादर करतो तर कोणी त्यावर वर्णन रेखाटतो तर कोणाला कविता स्फुरते. फुलांच्या भावविश्वातील फुलांचे सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या कविमनाच्या शिक्षिका सौ रेखा विजय शिर्के यांनी अष्टाक्षरी छंदात ब्याऐंशी फुलांचे काव्य ‘सु-मनांचे रेखां-’कण’या काव्यसंग्रहात प्रकाशित केले आहे.गेयतेमुळे ओठांवर रुळणाऱ्या या कविता आहेत.आपण फक्त...

पुस्तक परिचय क्रमांक:२९३ ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९३ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील संपादक: प्राचार्य रा. तु. भगत 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९३ पुस्तकाचे नांव-ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील  संपादक-प्राचार्य रा. तु. भगत प्रकाशन-चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२ऑक्टोंबर २००६ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–७४४ वाड़्मय प्रकार-गौरवग्रंथ  किंमत /स्वागत मूल्य-७००₹ ”””””””””””””””””””””””””””””””””””””””””  कर्मवीर भाऊराव पाटील यांचे मानसपुत्र,शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू बॅ.पी.जी.पाटील यांच्या जीवनाकार्यातील वाणी आणि लेखणी  यांची मनोवेधक शब्दचित्रात विचारांची शिदोरी ज्ञानामृताचा कुंभ प्राचार्य रा.तु.भगत यांनी संपादित केला आहे ‘ज्ञानयोगी बॅ.पी.जी.पाटील’या गौरव ग्रंथात.प्रज्ञा व प्रतिभा,काव्य व करुणा, हास्य व विनोद यामुळे सरांची व्याख्याने प्रबोधन आणि प्रमोदाचा सुंदर आविष्कारच असे.तोच आपणाला या गौरवग्रंथातून आस्वाद घ्यायला उपलब्ध करून दिला आहे. ...

पुस्तक परिचय क्रमांक:२९२ दिवेलागणीची वेळ

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९२ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -दिवेलागणीची वेळ  लेखक:ना.धों.महानोर 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९२ पुस्तकाचे नांव-दिवेलागणीची वेळ  लेखक- ना.धों.महानोर प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१६सप्टेंबर २०१८ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१३६ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-१६०₹ ”””””””””””””””””””””””””””””””””””””””””  निथळ घामाची शाई करुन  शेतीमातीची ओवी बहरली खुरप्याची लेखणी करुन  रानातली कविता फुलविली || मातीच्या चैतन्याचे गाणे गाऊन  शब्दांचे पुष्पमळे फुलवले शेतीत काबाडकष्ट करून  शब्दफळांचे सुगंध दरवळले||   शेती आणि साहित्य यांचा सुरेख संगम साधत पिकं अन् लतावेलींच्या मनातलं आपल्या लेखणीने कागदावर झरझर लिहून त्यांचे सृजनगाणं करणारे शेती मातीचे प्रतिभावंत लेखक व सृजन कवी.कृषीभूषण, कृषिरत्न, वनश्री,पद्मश्री आणि जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले माजी विधानपरिषद सदस्य आदरणीय लोकसाहि...

सेवानिवृत्ती

Image
      सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹  श्रीमान लटिंगे सर.... आपल्या प्रदीर्घ सेवेतून घडलेले विद्यार्थी, प्रेरित झालेले शिक्षक आणि विकसित झालेली शाळा हीच आपल्या कार्याची खरी पावती आहे.आपल्या कार्याचा ठसा केवळ शाळेच्या दप्तरात किंवा नोंदीत नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात, शिक्षकांच्या कार्यपद्धतीत आणि समाजाच्या शैक्षणिक जडणघडणीत उमटलेला आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी आपण शासकीय सेवेतून निवृत्त होत आहात. हा सेवापर्वाचा शेवट नसून अनुभव, ज्ञान आणि संस्कार यांच्या माध्यमातून समाजाला अधिक समृद्ध करण्याच्या नव्या पर्वाचा शुभारंभ आहे.