पुस्तक परिचय क्रमांक:२९२ दिवेलागणीची वेळ
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९२ ||पुस्तक परिचय पुस्तकाचे नांव -दिवेलागणीची वेळ लेखक:ना.धों.महानोर 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९२ पुस्तकाचे नांव-दिवेलागणीची वेळ लेखक- ना.धों.महानोर प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१६सप्टेंबर २०१८ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१३६ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-१६०₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” निथळ घामाची शाई करुन शेतीमातीची ओवी बहरली खुरप्याची लेखणी करुन रानातली कविता फुलविली || मातीच्या चैतन्याचे गाणे गाऊन शब्दांचे पुष्पमळे फुलवले शेतीत काबाडकष्ट करून शब्दफळांचे सुगंध दरवळले|| शेती आणि साहित्य यांचा सुरेख संगम साधत पिकं अन् लतावेलींच्या मनातलं आपल्या लेखणीने कागदावर झरझर लिहून त्यांचे सृजनगाणं करणारे शेती मातीचे प्रतिभावंत लेखक व सृजन कवी.कृषीभूषण, कृषिरत्न, वनश्री,पद्मश्री आणि जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले माजी विधानपरिषद सदस्य आदरणीय लोकसाहि...