पुस्तक परिचय क्रमांक:२९५ प्रतापगडाची जीवनगाथा

📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९५ ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव -प्रतापगडाची जीवनगाथा 
लेखक: इंद्रजित वसंत सावंत 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९५
पुस्तकाचे नांव-प्रतापगडाची जीवनगाथा 
लेखक: इंद्रजित वसंत सावंत 
प्रकाशन-साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२६
द्वितीयावृत्ती
पृष्ठे संख्या–१९२
वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
मराठा इतिहासाचे संशोधक, अभ्यासक व लेखक इंद्रजित वसंत सावंत यांनी दुर्गसंवर्धन आणि वारसा जतन या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.शिवकालीन इतिहास, दुर्ग आणि ऐतिहासिक वस्तूंचे संवर्धन यासाठी ते ओळखले जातात. सह्याद्री पर्वतातील काळजाचा ठेवा म्हणजे महाबळेश्वरचा प्रदेश.याच प्रदेशात चंद्रराव मोरे यांचा ‘जावली’प्रदेश जिंकून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली होती. प्रदेशावर चुहूबाजूंनी लक्ष ठेवण्यासाठी गडकिल्ले असणं आवश्यक होतं.म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी याच प्रदेशातील भोरप्या डोंगरावर  ‘प्रतापगड’ किल्ला बांधून घेतला.त्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास इंद्रजित वसंत सावंत यांनी ‘प्रतापगडाची जीवनगाथा’या ऐतिहासिक ग्रंथात संग्राह्य केली आहे.
या जीवनगाथेत कृष्णधवल दुर्मीळ चित्रे, छायाचित्रे आणि संदर्भासह ऐतिहासिक माहिती समाविष्ट केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतापगडावरील आदिलशहाचा सेनापती अफजलखानाचा वध एवढीच माहिती आपणास या गडाची होती.परंतू ‘प्रतापगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी पराक्रमाच्या खुणा सांगणारी स्फूर्तीदायी ठेव.’लेखक श्री इंद्रजित सावंत यांनी ऐतिहासिक कागदपत्रे धुंडाळून, संशोधन व अभ्यास करून आपणास प्रतापगडाची नवनवीन माहिती यापुस्तकात संदर्भासह आणि स्पष्टीकरणासह प्रकाशित केली आहे.
  आकर्षक आणि पाहता क्षणीच हातात घ्यायला उत्सुक करणारं मुखपृष्ठ. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या अफजलखानाच्या वधाचं रंगीत चित्र पाहता क्षणीच पुस्तक हातात घेऊन पुस्तकाची पाने चाळायला सुरुवात होते. तर मलपृष्ठावर दुर्ग अभ्यासक व लेखक इंद्रजित वसंत सावंत यांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ओळख उठावदार करणारा ‘ब्लर्ब’आहे. ‘प्रतापगडाची जीवनगाथा'या ऐतिहासिक ग्रंथात हा गड बांधणारे अ‌र्जोजी यादव आणि पुनश्च जीर्णोद्धार करण्यासाठी झटणाऱ्या तमाम शिलेदारांना ही लेखनसेवा अर्पण केली आहे.
प्रतापगडाच्या जीवनगाथेत भौगोलिक वैशिष्टे, ऐतिहासिक महत्त्व,युध्दमोहिम हे सर्व शिवकालीन पत्रे,बखरींच्या आधारे सहसंदर्भ मांडले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा रंजक शैलीत उलगडत जाते.त्यामुळे प्रतापगडाचा इतिहासाच्या तपशिलांचा प्रवास जिवंत वाटतो.रसिक वाचकांची ऐतिहासिक माहिती सह गडभेट घडते. प्रतापगडाची कथा सांगणारा हा ठेवा वाचकांना रोमांचक वाटेल इतकं सुंदर लेखन केले आहे.
पुस्तक परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई 
लेखन दिनांक -२३ऑक्टोंबर २०२६



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....