पुस्तक परिचय क्रमांक:२९४ सुमनांचे रेखांकन
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९४ ||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -सुमनांचे रेखांकन
लेखक:सौ रेखा विजय शिर्के
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९४
पुस्तकाचे नांव-सुमनांचे रेखांकन
लेखक:सौ रेखा विजय शिर्के
प्रकाशन-प्रणीत प्रकाशन, सातारा
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-९मे २०२३
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–९६
वाड़्मय प्रकार-काव्यसंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
कलासाधक प्रतिभावंत आपल्या सभोवताली असणाऱ्या निसर्ग सौंदर्याचे दर्शन बहुविध प्रकारे सादर करत असतो.कोणी आपल्या कुंचल्यातून निसर्गचित्र साकारतो तर कोणी त्यावर गोष्टी सादर करतो तर कोणी त्यावर वर्णन रेखाटतो तर कोणाला कविता स्फुरते. फुलांच्या भावविश्वातील फुलांचे सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या कविमनाच्या शिक्षिका सौ रेखा विजय शिर्के यांनी अष्टाक्षरी छंदात ब्याऐंशी फुलांचे काव्य ‘सु-मनांचे रेखां-’कण’या काव्यसंग्रहात प्रकाशित केले आहे.गेयतेमुळे ओठांवर रुळणाऱ्या या कविता आहेत.आपण फक्त फुलांचा सुगंध घेतो.देवाला वाहतो अन् शुभेच्छा व सजावटीला उपयोग करतो तर कधी श्रध्दांजली अर्पण करतो.पण ‘जे देखे रवी,ते न देखे कवी’,या सुवचनाप्रमाणे कवयित्री ने अवतीभोवतीच्या सुमनांचे काव्य सहज सुंदर कोमल अन् गेयतेत सजवले आहे.नाजूक टपोऱ्या फुलांच्या गंधसुंगधाबरोबरच त्यांची जातकुळी, उत्पत्ती, पौराणिकता,आयुर्वेदातील उपयोग आणि देखणेपणा यांचा समर्पक शब्दांचा फुलोरा सजवून कवितेचे वेगळाच आविष्कार सादर केला आहे.स्वत: लेखन सृजनाचा आनंद घेऊन काव्यरसिकांना या संग्रहातून आनंदीआनंद घेण्यास कागदावर बहरला आहे.तो एक सुंदर अनुभव वाचक रसिकांना लाभेल असे मला वाटते.
सदर पुस्तक माझे पुस्तकप्रेमी सन्मित्र श्री दीपक भुजबळ यांनी सेवापुर्ती निमित्ताने मानपत्रासमवेत भेट दिले होते.
‘सुमनांचे रेखांकन’या काव्यसंग्रहाचे आकर्षक अन् कुतूहल निर्माण करणारं शीर्षक आणि मलपृष्ठ आहे .आपणास पुस्तकाची पानं चाळण्याची इच्छा निर्माण करते.तर मलपृष्ठावर कवयित्री यांच्या जीवनप्रवासातील छंद,मानसन्मान आणि साहित्य यांचा उंचावणारा आलेख आहे.
साताऱ्यातील प्रथितयश साहित्यिक डॉ.राजेंद्र माने यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.यामध्ये काही प्रातिनिधिक कवितातील पंक्तींचे स्पष्टीकरण करून या पुस्तकाची खासियत अधोरेखित केली आहे.
‘सुमनांचे रेखाटन’या काव्यसंग्रहास सहृदयी शुभेच्छा,सखी सौ अंजली गोडसे,सौ व श्री प्रदीप कांबळे,सौ मनिषा शिरटावले आणि श्री विजय शिर्के यांनी दिल्या आहेत.या शुभचिंतनामुळे या फुलांचा सुगंध कवितेचा आस्वाद घेताना दरवळत राहील.निसर्गाच्या ऋणानुबंधातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.हे त्यांनी मनोगतात आवर्जून उल्लेख केला आहे.
या कवितांचे वाचन आणि रसग्रहण करताना फुलांचे मन,गंध,रंग,रुप,आकार आणि उपयोगिता नकळतपणे लक्षात राहतील. जागतिक ओळख असलेल्या कास पठारावरील कातळपुष्पांची तसेच उद्यानातील, वनातील,माळरानावरील आणि शेतशिवारातील फुलांचे अनोखे विश्व अष्टाक्षरी छंदात काव्यबद्ध केले आहे.अनभिज्ञ असलेल्या अनेक फुलांची माहिती आपल्या ज्ञानात मोलाची भर घालणारी आहे.भावनिक शब्दांची पेरण करून शब्दांची गुंफण केली आहे.तसेच
‘‘मनातल्या भावभावना
कागदावर उमटल्या
शब्दांच्या रुपात बांधून
कवितेच्या ओळी झाल्या’’
अतिशय अलवार,सहज सुंदर शब्दांत
कवयित्री सौ रेखा विजय शिर्के यांनी कवितेतून फुलांची दुनिया उलगडून दाखवली आहे…. हळव्या आणि कोमल मनातून साकारलेला हा काव्यसंग्रह आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- २१ऑक्टोंबर २०२६

Comments
Post a Comment