Posts

Showing posts from April, 2026

सेवापुर्ती शुभेच्छा

Image
🌸 कर्तव्यपरायण अध्यापक 🌸 आमचे सन्मित्र श्री. रामचंद्र एकनाथ टिके सर उपशिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शाळा, शिरगाव ता. वाई हे चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी शैक्षणिक सेवेतून नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत.त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! जिल्हा परिषदेच्या विद्यालयाला कर्मभूमी मानून अनेक शाळांचा चेहरामोहरा बदलुन यशवंत, गुणवंत विद्यार्थी घडवले.सुंदर हस्ताक्षर,रचनावादी अध्यापनाचे शिक्षकांचे मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षांचे जाणकार अध्यापक,प्रभावी व्याख्याते  आणि विद्यार्थीप्रिय  उपक्रमशील  शिक्षक यामुळे टिके सरांनी प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. सातारा जिल्हा परिषदेने “आदर्श शिक्षक पुरस्काराने  त्यांना सन्मानित केले आहे. तसेच त्यांनी रचनावाद अध्यापन पध्दती यावर महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये  कार्यशाळा घेतल्या आहेत.त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यातून असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे. "फळ्यावरती अक्षरांचे सुंदर मोती रेखिले, ज्ञानदीप तेवत ठेवून आयुष्य सारे वेचिले… विद्यार्थ्यांच्या यशामधुनी आनंद ज्यांनी शोधला, कर्तव्याच्या वा...

पुस्तक परिचय क्रमांक:२७१ तराळ -अंतराळ

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७१ पुस्तकाचे नांव-तराळ-अंतराळ लेखक: शंकरराव खरात  प्रकाशन-कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१७ पुनर्मुद्रण  पृष्ठे संख्या–५०२ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र किंमत /स्वागत मूल्य-४००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७१||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -तराळ-अंतराळ लेखक: शंकरराव खरात  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~  क्रांतिसूर्य,दलितांचे कैवारी भारतरत्न  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेणारे सामाजिक कार्यकर्ते,लेखक , कादंबरीकार आणि दलित साहित्यिक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र ही केवळ कैफियत नाही, वेदना नाही तर दलितत्त्वाचा इतिहास आहे.  “अग्नीमधून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही;बळही वाढत नाही म्हणून पददलित माणसांना हालअपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्याशिवाय मोठेपणा प्राप्त होणार नाही.”     –-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  ‘तराळ-अंतराळ' हे समाजशास्त्रज्ञ त...

पुस्तक परिचय क्रमांक:२७० शहीद भगतसिंग

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७० पुस्तकाचे नांव-शहीद भगतसिंग  लेखक: प्राचार्य व.न. इंगळे  प्रकाशन-साकेत प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२६  सहावी पृष्ठे संख्या–१५२ वाड़्मय प्रकार-चरित्र किंमत /स्वागत मूल्य-२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७०||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -शहीद भगतसिंग  लेखक: प्राचार्य व.न.इंगळे  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  वंदे मातरम्!!!इन्कलाब जिंदाबाद!!! भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक धगधगती मशाल प्रेरणाज्योत, ‘शहीद भगतसिंग’.ते केवळ क्रांतिकारकच नव्हते तर निर्धर्मी समाजवादी विचारांचे लेखक व पत्रकार होते.तसेच त्यांचे ग्रंथप्रेमही विलक्षण होते. यातून आपणाला दिसते त्यांची अभ्यासू वृत्ती आणि विवेकवादी दृष्टी. “जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर मातृभाषेचा आणि इतर भाषांचा अभ्यास केला पाहिजे.”हे त्यांचे विचार आजही लागू पडणारे आहेत.त्यांचा स्वातंत्र्यासाठीचा ध्येयवाद ज्वलंत होता.त्यांचे हे चरित्र आजही राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती म्हणून स...

पुस्तक परिचय क्रमांक:२६९ नक्षत्रचित्रे

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६९ पुस्तकाचे नांव-नक्षत्रचित्रे लेखक: शांता ज. शेळके  प्रकाशन-सुरेश एजन्सी, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सप्टेंबर-२०२५  चौथी पृष्ठे संख्या–८८ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६९||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -नक्षत्रचित्रे लेखक: शांता ज.शेळके 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  स्नेहसंबंधाच्या अवकाशात चमकणाऱ्या महत्त्वाच्या नक्षत्रांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांवर लिहिलेल्या लेखांचा संग्रह म्हणजे नक्षत्रचित्रे! हे लेखिका शांता शेळके यांनी दिलेले समर्पक आणि यथार्थ नाव. ऐंशी वर्षांच्या आयुष्यातील साठ वर्षे त्यांनी चौफेर साहित्य लेखन केले.मग ते गीतलेखन,कथा कादंबरी लेखन, काव्य, चित्रपटातील गाणी लेखन अथवा ललित लेखन.निर्मळ प्रतिभेच्या जोरावर त्यांनी सृजनशील साहित्य शब्दबध्द केले आहे. ‘नक्षत्रचित्रे’या पुस्तकात ज्यांच्या विषयी लिहिलं आहे ती माणसं सामान्य नव्हेत.तर त्यांचं कलावंत म्हणून किंवा लेखक म्हणून असणारे मोठेपण शांताबाईंन...

पुस्तक परिचय क्रमांक:२६८ साताऱ्याच्या मुलखात

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२६८ पुस्तकाचे नांव-साताऱ्याच्या मुलखात  लेखक: आदित्य फडके  प्रकाशन-स्नेहल प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-एप्रिल-२०१६  द्वितीय  पृष्ठे संख्या–१७४ वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन किंमत /स्वागत मूल्य-२२५₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २६८||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -साताऱ्याच्या मुलखात  लेखक: आदित्य फडके  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  सातारा जिल्हा म्हणजे सह्याद्री पर्वत रांगेतील डोंगररांगेतील नैसर्गिक आणि ऐतिहासिक वरदान लाभलेले नंदनवन.गडदुर्ग,मंदिरे,अभयारण्ये, तलाव आणि अनवटवाटेने भटकंती करायला अनेक पर्यटकस्थळे तर आहेतच शिवाय भारतातील प्रेक्षणिय थंड हवेचे ठिकाण पांचगणी,महाबळेश्वर आणि तापोळा ही नैसर्गिक देणगी लाभलेली स्थळे साताऱ्यातील आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध स्थळांना भेटी देण्यासाठी मार्गदर्शक वाटाड्या म्हणून उपयोगी पडणारे हे पुस्तक, ‘साताऱ्याच्या मुलखात’साताऱ्याचे निसर्ग भटकंतीकार आदित्य फडके यांनी लेखणीबध्द केले आहे. प्रत्येकाच्या भटक...