सेवापुर्ती शुभेच्छा



🌸 कर्तव्यपरायण अध्यापक 🌸
आमचे सन्मित्र श्री. रामचंद्र एकनाथ टिके सर
उपशिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शाळा, शिरगाव ता. वाई हे चौतीस वर्षांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी शैक्षणिक सेवेतून नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत.त्याबद्दल त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
जिल्हा परिषदेच्या विद्यालयाला कर्मभूमी मानून अनेक शाळांचा चेहरामोहरा बदलुन यशवंत, गुणवंत विद्यार्थी घडवले.सुंदर हस्ताक्षर,रचनावादी अध्यापनाचे शिक्षकांचे मार्गदर्शक, स्पर्धा परीक्षांचे जाणकार अध्यापक,प्रभावी व्याख्याते  आणि विद्यार्थीप्रिय  उपक्रमशील  शिक्षक यामुळे टिके सरांनी प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.
सातारा जिल्हा परिषदेने “आदर्श शिक्षक पुरस्काराने  त्यांना सन्मानित केले आहे. तसेच त्यांनी रचनावाद अध्यापन पध्दती यावर महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये  कार्यशाळा घेतल्या आहेत.त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यातून असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे.
"फळ्यावरती अक्षरांचे सुंदर मोती रेखिले,
ज्ञानदीप तेवत ठेवून आयुष्य सारे वेचिले…
विद्यार्थ्यांच्या यशामधुनी आनंद ज्यांनी शोधला,
कर्तव्याच्या वाटेवरती आदर्श शिक्षक घडला…
शिस्त, संस्कार, प्रेम, माया यांचा सुंदर संगम,
टिके सरांच्या कार्यातून अध्ययन अनुभव उजळला 
सेवेचा हा प्रवास जरी आज थोडा थांबला,
संस्धकाराचा धडा मात्र विद्यार्थ्यांच्या हृदयस्थानी राहिला…

💐 आपल्या सेवानिवृत्तीच्या नव्या पर्वासाठी निरोगी, आनंदी आणि समाधानमय आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
— श्री. रवींद्र लटिंगे, ओझर्डे

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

कविता आनंदाची शाळा

सेवापुर्ती सोहळा सौ.नलिनी जाधव मुख्याध्यापिका प्राथ.शाळा.व्याजवाडी