Posts

Showing posts from 2026

पुस्तक परिचय क्रमांक:२९२ दिवेलागणीची वेळ

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९२ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -दिवेलागणीची वेळ  लेखक:ना.धों.महानोर 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९२ पुस्तकाचे नांव-दिवेलागणीची वेळ  लेखक- ना.धों.महानोर प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१६सप्टेंबर २०१८ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१३६ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-१६०₹ ”””””””””””””””””””””””””””””””””””””””””  निथळ घामाची शाई करुन  शेतीमातीची ओवी बहरली खुरप्याची लेखणी करुन  रानातली कविता फुलविली || मातीच्या चैतन्याचे गाणे गाऊन  शब्दांचे पुष्पमळे फुलवले शेतीत काबाडकष्ट करून  शब्दफळांचे सुगंध दरवळले||   शेती आणि साहित्य यांचा सुरेख संगम साधत पिकं अन् लतावेलींच्या मनातलं आपल्या लेखणीने कागदावर झरझर लिहून त्यांचे सृजनगाणं करणारे शेती मातीचे प्रतिभावंत लेखक व सृजन कवी.कृषीभूषण, कृषिरत्न, वनश्री,पद्मश्री आणि जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आलेले माजी विधानपरिषद सदस्य आदरणीय लोकसाहि...

सेवानिवृत्ती

Image
      सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹  श्रीमान लटिंगे सर.... आपल्या प्रदीर्घ सेवेतून घडलेले विद्यार्थी, प्रेरित झालेले शिक्षक आणि विकसित झालेली शाळा हीच आपल्या कार्याची खरी पावती आहे.आपल्या कार्याचा ठसा केवळ शाळेच्या दप्तरात किंवा नोंदीत नाही, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात, शिक्षकांच्या कार्यपद्धतीत आणि समाजाच्या शैक्षणिक जडणघडणीत उमटलेला आहे. दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी आपण शासकीय सेवेतून निवृत्त होत आहात. हा सेवापर्वाचा शेवट नसून अनुभव, ज्ञान आणि संस्कार यांच्या माध्यमातून समाजाला अधिक समृद्ध करण्याच्या नव्या पर्वाचा शुभारंभ आहे.

पुस्तक परिचय क्रमांक:२९१ क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९१ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -क्रांतिवीर  लेखक: भालचंद्र विष्णूपंत धर्माधिकारी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९१ पुस्तकाचे नांव-क्रांतिवीर लेखक- भालचंद्र विष्णूपंत धर्माधिकारी  प्रकाशन-क्रांतिवीर नागनाथ (अण्णा) नायकवडी गौरव समिती,वाळवे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१५जूलै २००७ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–२५४ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र किंमत /स्वागत मूल्य-५०₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” ‘अशक्य’ते शक्य करून दाखवणारे तडफदार व झुंजार नेते स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी…. स्वातंत्र्यपूर्व काळात रोमहर्षक व धाडसी कार्य करुन एक आगळा वेगळा इतिहास घडविला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सत्तेच्या राजकारणात न पडता जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिथे अन्याय होतोय ,तो दूर करण्यासाठी अग्रेसर असणारे क्रांतिवीर… क्रांतिसिंह नाना पाटील आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदर्श मानणारे त्यागी आणि झुंजार देशभक्त, कष्टकरी शेतकरी कामगार...

पुस्तक परिचय क्रमांक:२९०ज्ञानरचनावाद

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२९० पुस्तकाचे नांव- ज्ञान रचनावाद संपादक: एच व्ही जाधव  प्रकाशन-संजीवन पब्लिकेशन्स, सातारा  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०१२ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१०४ वाड़्मय प्रकार- शैक्षणिक  मार्गदर्शक  किंमत /स्वागत मूल्य-२२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २९०||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव: ज्ञानरचनावाद  संपादक: एच. व्ही. जाधव  ______________________ जेव्हा शिकणं सहेतुक असतं, तेव्हा सृजन फुलून येतं…जेव्हा सृजन फुलून येतं तेव्हा विचार फैलावू लागतात.. जेव्हा विचार फैलावू लागतात तेव्हा ज्ञान अलोकित होतं.. जेव्हा ज्ञान अलोकित होतं तेव्हाच देशाची प्रगती होते. –भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एस पी जे अब्दुल कलाम यांचे मुलांचे शिकणं कसं घडावं हे अधोरेखित करणारी विचारधारा  ‘ज्ञान रचनावाद’या अध्यापनशास्त्रीय  संदर्भ ग्रंथांची ओळख करून देते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि वर्गाच्या दर्जात्मक गुणवत्तेसाठी अनवटवाटेने प्रयोगशील उपक्रम राबविण्यासाठी पाठीवर...

सेवापुर्ती कृतज्ञतापूर्वक धन्यवाद

Image
        कृतज्ञतापूर्वक धन्यवाद  सेवा गौरव सोहळ्यानिमित्ताने….     आदरणीय श्री सी जी मठपती गटशिक्षणाधिकारी फलटण, श्री कृष्णा फडतरे अधिव्याख्याता डाएट,श्री रवींद्र मेमाणे केंद्रप्रमुख विडणी, श्री शशिकांत सोनवलकर संचालक प्राथमिक शिक्षक बॅक,श्री ज्ञानेश्वर दिघे माजी सरपंच माझेरी,श्री विष्णू दिघे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,सौ दमयंती कुंभार साधनव्यक्ती फलटण, श्री प्रविण दिघे माजी उपसरपंच,श्री उमेश झांजुर्णे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री नंदकुमार दंडिले माजी शिक्षण विस्तार अधिकारी,सौ दिक्षीत मॅडम माजी केंद्रप्रमुख,सौ राजश्री कुंभार मॅडम माजी केंद्रप्रमुख , श्री भोलाचंद बरकडे सर आधारस्तंभ माझेरीयन परिवार,श्री संजय देवकर ग्रामसेवक,केंद्रसमूहातील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू-भगिनी,शाळेचे पालक,ग्रामस्थ,डीएटचे मित्रवर्य,माझे विद्यार्थीप्रिय शिक्षकवृंद आणि उपस्थित सर्व आप्तेष्टांनो… आज या व्यासपीठावर उभा राहताना मनामध्ये अनेक भावना दाटून आल्या आहेत. ३७ वर्षांचा सेवाकाळ… हा केवळ वर्षांचा आकडा नाही, तर असंख्य आठवणींचा, अनुभवांचा, संघर्षांचा, आनंदाचा आणि माण...

पुस्तक परिचय क्रमांक:२८९ बटाट्याची चाळ

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८९ पुस्तकाचे नांव-बटाट्याची चाळ लेखक: पु.ल.देशपांडे प्रकाशन-मौज प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती- १जानेवारी २०१६ त्रेचाळिसावे पुनर्मुद्रण  पृष्ठे संख्या–१७२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८९||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव: बटाट्याची चाळ  लेखक:पु.ल.देशपांडे ______________________  आदरणीय भाईं म्हणजेच महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे. यांनी वाड्मय क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात पादाक्रांत करुन ती क्षेत्रे गाजवली आहेत.मराठी माणसाला पु.ल.देशपांडेंनी काय दिले असेल,तर माणसांच्या दैनंदिन जीवनातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने टिपून त्यावर लेखन करुन रसिक वाचकांना मनसोक्त हसायला शिकविले.पु.लं.च्या साहित्यात विनोदाचे स्थान फार महत्त्वाचे आहे.विनोदाचे दोन प्रकार त्यांनी रसिक वाचकांसमोर सहजतेने उलगडून दाखवले आहेत.एका प्रकारामुळे आपल्याला हसू येते तर दुसरा प्रकार हसताना ही विचार करायला लावणारं साहित्य.हसण्या...

पुस्तक परिचय क्रमांक:२८८ बियॉंड द लाइन्स

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८८ पुस्तकाचे नांव-बियॉंड द लाइन्स एक आत्मचरित्र  लेखक:कुलदीप नय्यर अनुवादक: सायली राजाध्यक्ष व डॉ.भालचंद्र सुपेकर प्रकाशन- चिनार पब्लिशर्स, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-ऑक्टोंबर २०१८ द्वितीय आवृत्ती  पृष्ठे संख्या–५५३ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र किंमत /स्वागत मूल्य-५००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८८||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव:बियॉंड द लाइन्स एक आत्मचरित्र  लेखक:कुलदीप नय्यर अनुवादक: सायली राजाध्यक्ष व डॉ.भालचंद्र सुपेकर 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वरिष्ठ पत्रकार आणि माजी संसद सदस्य कुलदीप नय्यर हे भारतातील ख्यातनाम पत्रकार होते.फाळणीच्या वेळी निर्वासित म्हणून भारतात येण्याआधी त्यांनी लाहोर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होते.अमेरिकेत पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री आणि गोविंद वल्लभ पंत यांचे माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. 'यूएनआय'या वृत्तसंस्थेचे ते व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम केले आहे.तसेच ते तब्...

पुस्तक परिचय क्रमांक:२८७ एका समृद्ध शाळेचा प्रवास

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८७ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -एका समृद्ध शाळेचा प्रवास  संकल्पना:कबीर वाजपेयी  अनुवाद:विनिता गणबोटे 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८७ पुस्तकाचे नांव-एका समृद्ध शाळेचा प्रवास  संकल्पना:कबीर वाजपेयी  अनुवाद: विनिता गणबोटे  प्रकाशन-मनोविकास प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१०सप्टेंबर २०१२ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–९६ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-४००₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” ‘Building as learning aid’इमारत अथवा वास्तू; ‘एक शैक्षणिक साधन’ही अभिनव कल्पना सध्या भारतात रुजत चालली आहे.मोठ्या प्रमाणात लक्षवेधी ठरली आहे.अनेक शाळामध्ये बाला इव्हेंट या नावाने रेखाटन,शैक्षणिक साहित्य, खेळणी, बांधकाम याद्वारे शैक्षणिक वातावरणात अध्ययन अनुभव रचनावादी व कृतीशील पध्दतीने विद्यार्थी घेत आहेत. खरतर व्यक्तीच्या विकासात सामाजिक अस्तित्व असते .सहभागात तसेच ज्ञानार्जनाद्वारे वैश्विक नागरिक तयार करण्यात शाळांच...

पुस्तक परिचय क्रमांक:२८६ फिरता फिरता

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८६ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -फिरता फिरता  लेखक: द्वारकानाथ व सुप्रिया संझगिरी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८६ पुस्तकाचे नांव-फिरता फिरता  लेखक-द्वारकानाथ व सुप्रिया संझगिरी  प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२५मार्च २०२३ द्वितीयावृत्ती पृष्ठे संख्या–१८२ वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन  किंमत /स्वागत मूल्य-२६०₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” केल्याने देशाटने आणि पहावी रम्य मनोहारी आणि नेत्रदीपक स्थळे मग ती निसर्गसंपदेची असो वा मानवनिर्मित असो!त्या स्थळांना ऐतिहासिक संदर्भ असतो.अशीच स्थळे देशविदेशात पाहण्यासाठी गेलेल्या श्री द्वारकानाथ व सौ सुप्रिया संझगिरी यांचे‘फिरता फिरता’हे प्रवासवर्णन वाचक रसिकांना घरबसल्या परदेशवारी घडवून आणते.इतकं सुंदर आणि समर्पक शब्दात  भेट दिलेल्या स्थळांचे आणि कळतनकळत घडलेल्या किस्स्यांचे वर्णन अफलातून आहे. परदेशातील लोकप्रिय व देखण्या स्थळांची रंगीबेरंगी चित...

पुस्तक परिचय क्रमांक:२८५ शब्दांच्या अल्याड पल्याड

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८५ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव - शब्दांच्या अल्याड पल्याड  लेखक: अनुजा जोशी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८५ पुस्तकाचे नांव-शब्दांच्या अल्याड पल्याड  लेखक-अनुजा जोशी प्रकाशन-अक्षरधन प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च २०२६ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१४४ वाड़्मय प्रकार-ललित  किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ ””””””””””””””””””””””””””””””””””””””””” आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटना आणि साहित्य यांचे कुतूहल निर्माण करणारे वेल्हाळ म्हणजे निळ्या शाईचा साहित्य प्रवाह…लेखिका तथा कवयित्री अनुजा जोशी यांच्या लेखणीतून सजलेला ‘शब्दांच्या अल्याड पल्याड’हा ललित संग्रह म्हणजे वाचक रसिकांना साहित्यातील विविध साहित्य प्रकार,भाषा,वाचन संस्कृती,रुपक,प्रतिमा,मिथक आणि नियतकालिकांच्या सहवासातील एक अनोखे सुंदर पर्व लेखिका अनुजा जोशी भेटीला घेऊन आल्या आहेत.सन २०१६ मध्ये दैनिक गोवादूत मध्ये ‘शब्दांच्या अल्याड पल्याड'नावाचं एक सदर चाललं होतं,त्यातील ह...

पुस्तक परिचय क्रमांक:२८४ मराठी साहित्य शोध आणि बोध

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८४ || पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव – मराठी साहित्य शोध आणि बोध लेखिका – अनिता जाधव 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वाचन साखळी समूह, महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता – श्री. रवींद्रकुमार गणपत लटिंगे, ओझर्डे–वाई पुस्तक परिचय क्रमांक – २८४ पुस्तकाचे नाव – मराठी साहित्य शोध आणि बोध लेखिका – अनिता जाधव प्रकाशन – समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती – १ एप्रिल २०२६, प्रथमावृत्ती पृष्ठसंख्या – १५० वाङ्मय प्रकार – समीक्षा ग्रंथ किंमत / स्वागत मूल्य – ₹२२०  --- मराठी भाषा म्हणजे सौंदर्याची खाण आणि तिचे वैभव म्हणजे लिखित साहित्य. विविधांगी साहित्यप्रकारांतील पुस्तकांचे वाचन व लेखन करून, समर्पक शब्दांत लेखक-कवींचे विचारविश्व आपल्या ओजस्वी शैलीत उलगडून दाखवणे आणि वाचक-रसिकांना ‘शब्दगंध’ अनुभवण्यासाठी उद्युक्त करणे, हे एका साहित्यसमीक्षकाचे महत्त्वाचे कार्य असते. पण लेखिका अनिता जाधव यांनी केवळ वाचन-लेखन न करता, त्यांना आवडलेली, भावलेली, चिंतनात्मक आणि सकारात्मक विचार करायला लावणारी पुस्तके निवडून त्यांचे समीक्षण एका सुंदर ग्रंथात गुंफले आहे. हे पुस्तक प्रकाशित करण्य...

पुस्तक परिचय क्रमांक.२८३ कृष्णामाई

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८३ पुस्तकाचे नांव-कृष्णामाई  लेखक: प्रदीपकुमार कांबळे -बहेकर प्रकाशन-न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२५ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–१५२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य-२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८३ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -कृष्णामाई लेखक: प्रदीपकुमार कांबळे -बहेकर  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 कृष्णाकाठच्या गावातील माणसांच्या वास्तव कथा.. महाराष्ट्राची जीवनदायी, जीवनवाहिनी संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या तीरावर अनेक तीर्थक्षेत्र वसलेली आहेत.अगदी उगमापासून ते सागराला मिळेपर्यंत वेगवेगळ्या देवादिकांची आहेत.कृष्णामाई महाबळेश्वर येथे उगम पावते अन् वाई, सातारा,सांगली जिल्ह्यातून कर्नाटकात प्रवेशते.कृष्णेच्या काठावरील बहे गावचे सुपुत्र लेखक श्री प्रदीपकुमार कांबळे यांनी ‘कृष्णामाई’या कथासंग्रहाचे लेखन केले आहे.या पुस्तकावरील आकर्षक आणि देखणं मुखपृष्ठ कृष्णामाईच्या बहे येथील तीरावरील ‘रामलिंग बेट’ अतिशय सुंदर आणि पवित्र तीर्थक...

वाढदिवस शुभचिंतन

Image
आपुलकीच्या नात्याचा नवा आयाम… वाढदिवसाचे शुभचिंतन!  काही नाती रक्ताची नसतात… ती मनाची असतात. काही भेटी मोलाच्या नसतात… त्या भावनेने अनमोल ठरतात. आणि काही क्षण क्षणिक असतात… पण आयुष्यभराच्या आठवणी बनून मनात घर करून राहतात! शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं हे अशाच निरागस, निर्मळ आणि संस्कारमय भावबंधाचं असतं. शिकवताना शिक्षक ज्ञान देतात; पण नकळत ते विद्यार्थ्यांच्या मनात मूल्यांची, संस्कारांची आणि माणुसकीची पेरणीही करत असतात. म्हणूनच शिक्षकांचा वाढदिवस हा विद्यार्थ्यांसाठी केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस राहत नाही; तो आपुलकी व्यक्त करण्याचा, ऋणानुबंध जपण्याचा आणि आपल्या मनातील प्रेम कृतिशील करण्याचा एक सुंदर उत्सव बनतो. वाढदिवस जर आपल्या वर्गशिक्षिका किंवा वर्गशिक्षकांचा असेल, तर त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मनातील उत्साहाला वेगळंच उधाण आलेलं असतं.त्यांच्या छोट्या-छोट्या कल्पना, आग्रह आणि प्रेमळ सूचना शिक्षकांनीही आनंदाने स्वीकाराव्यात लागतात. कारण शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांचं नातं हे केवळ शिक्षणापुरतं मर्यादित नसतं; ते मूल्ये आणि संस्कृती यांच्या आचरणाचे, अनुकरणाचे आणि संवर्धना...

पुस्तक परिचय क्रमांक:२८२ क्रिकेटर्स मनातले

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८२ पुस्तकाचे नांव-क्रिकेटर्स मनातले लेखक: द्वारकानाथ संझगिरी  प्रकाशन-सुरेश एजन्सी, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०२४ प्रथमावृत्ती पृष्ठे संख्या–२५६ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य-३४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८२ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -क्रिकेटर्स मनातले लेखक: द्वारकानाथ संझगिरी  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला ज्यांच्या अत्युत्तम खेळीने सुवर्ण झळाळी लाभली. त्या दिग्गज क्रिकेटपटूंच्या कार्यकर्तृत्वाचा उंचावणारा आलेख म्हणजे ‘क्रिकेटर्स मनातले’.  हल्ली तेच क्रिकेट भारतीय क्रिडा रसिक प्रेक्षकांच्या हदयसिंहासनी विराजमान झाले आहे.त्या महान क्रिकेटपटूंच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यातील,रणजी सामन्यातील आणि काउंटी सामन्यातील  संस्मरणीय खेळीची ओळख ‘क्रिकेटर्स मनातले’या पुस्तकाचे लेखन लोकप्रिय  स्तंभलेखक, चतुरस्त्र लेखक आणि क्रिडा समिक्षक क्रिकेटच्या विश्वासातील संदर्भ आपल्या लेखणीतून बोलके करणारे द्वारकानाथ संझग...

पुस्तक परिचय क्रमांक :२८१ वारी एक आनंदयात्रा

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२८१ पुस्तकाचे नांव-वारी एक आनंदयात्रा  लेखक: संदेश भंडारे  प्रकाशन-मनोविकास प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२०१८ तृतीयावृत्ती पृष्ठे संख्या–१५६ वाड़्मय प्रकार-छायाचित्र मालिका किंमत /स्वागत मूल्य-५५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २८१ ||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -वारी एक आनंदयात्रा  लेखक: संदेश भंडारे  📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚        पंढरीच्या वारीची छायाचित्र दर्शनकथा  वारकऱ्यांची भजन-कीर्तनाची मांदियाळी अन् मुखाने ‘माऊली’नामाचा जयघोष, टाळचिपळ्याची संगत अन् मृदंगाच्या ठेक्यावर पताकांचे झेंडे नाचवत अन् तुळशीवृंदावन डोईवर घेत पाउले चालतात देहु-आळंदी ते पंढरपूरी…. वारकऱ्यांची पायवारी…..अफाट जनसमुदाय लोटतो. ‘वारी एक आनंदयात्रा’या छायाचित्रांचे पुस्तक प्रकाशित केले आहे;प्रसिध्द छायाचित्रकार संदेश भंडारे यांनी.  छाया-प्रकाशाच्या लिपीने मानवी स्थिती-गतीची, अवस्थांची अभिव्यक्ती करणारे छायाचित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत.पुणे...