पुस्तक परिचय क्रमांक:२८६ फिरता फिरता
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८६ ||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव -फिरता फिरता
लेखक: द्वारकानाथ व सुप्रिया संझगिरी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८६
पुस्तकाचे नांव-फिरता फिरता
लेखक-द्वारकानाथ व सुप्रिया संझगिरी
प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-२५मार्च २०२३
द्वितीयावृत्ती
पृष्ठे संख्या–१८२
वाड़्मय प्रकार-प्रवासवर्णन
किंमत /स्वागत मूल्य-२६०₹
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
केल्याने देशाटने आणि पहावी रम्य मनोहारी आणि नेत्रदीपक स्थळे मग ती निसर्गसंपदेची असो वा मानवनिर्मित असो!त्या स्थळांना ऐतिहासिक संदर्भ असतो.अशीच स्थळे देशविदेशात पाहण्यासाठी गेलेल्या श्री द्वारकानाथ व सौ सुप्रिया संझगिरी यांचे‘फिरता फिरता’हे प्रवासवर्णन वाचक रसिकांना घरबसल्या परदेशवारी घडवून आणते.इतकं सुंदर आणि समर्पक शब्दात भेट दिलेल्या स्थळांचे आणि कळतनकळत घडलेल्या किस्स्यांचे वर्णन अफलातून आहे.
परदेशातील लोकप्रिय व देखण्या स्थळांची रंगीबेरंगी चित्रे आपणास पुस्तक चाळण्याची लालसा निर्माण करतात.तर मलपृष्ठावर लेखकांनी परदेशदौऱ्यात भेट दिलेल्या ठिकाणांची वैविध्यपूर्ण संस्कृतीची,तिथल्या माणसांची, पाळीव प्राण्यांची,खाद्यसंस्कृतीची आणि काही शहरातील रात्रीच्या जीवनशैलीची व लोकजीवनाची ओळख करून देणारा ‘ब्लर्ब’हमखास पुस्तक वाचायला उद्युक्त करतोच.
मनोगतात लेखक द्वारकानाथ संझगिरी म्हणतात की, “क्रिकटचे सामने आणि विविध कार्यक्रमांमुळे मला देशपरदेशात हे महागडं व्यसन सांभाळता येते.मला विविध स्वभावाच्या,देशाच्या,व्यवसायाच्या माणसांना भेटायला आवडते.त्यातल्या काहींशी दोस्ती होते तर काही प्रवासीच राहतात.पण मनावर कोठेतरी आठवणी कोरुन जातात.अश्या माणसांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही लेखन केले आहे.”
एकंदर अठरा लेखांतून ते आपणाला परदेशातील बाली, इस्तंबूल आणि इस्रायल, इंडोनेशिया, इंग्लंड आणि अमेरिका देशातील लोकप्रिय स्थळांची भेट घडवून आणतात. तर सोबत जगभरातील खाद्यसंस्कृतीची ओळख सौ सुप्रिया संझगिरी यांचे लेख करून देतात.सोबत कृष्णधवल व रंगीत छायाचित्रामुळे लेखनाचा आस्वाद घेताना मन त्या स्थळात रमतं.अतिशय खुमासदार व बहारदार शैलीत आणि समर्पक व चपखल शब्दसाजात लेखन फुलवलं आहे. वाचन करताना याची पानोपानी प्रचिती येते. विशेषत:भाषाशैली मुंबईतसारखी असल्याने आपल्या मनाला त्यातले शब्द आणि वाक्य भावतात.अगदी अधोरेखित करुन पुन्हा वाचावी वाढतात.बरीच माहिती नव्याने मिळत जाते.त्यामुळे ज्ञानात भर पडते.आणि मनात विचार येतोच. ‘तिकडं असं असतय होय!’.
अप्रतिम शब्दांकनात प्रवासवर्णन केले आहे.
लढवय्यांच्या देशात चार दिवस हा लेख उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी झालेल्या इस्रायल देशाची सफर घडवतो. तर ‘इस्तंबूलचा वणवा’यामध्ये इस्तंबूल देशाची भटकंती करुन देतो. पुस्तकाचे शीर्षक असलेलाह’फिरता फिरता’लेखात फिरणं माणसाला प्रगल्भ करतं.ही या लेखाची टॅग लाईन वाटते. अमेरिकेतील ॲटलांटाला जाताना बसमध्ये शेजारी बसलेल्या सजा भोगून आलेल्या चोराशी झालेला संवाद अतिशय खुमासदार शैलीत आणि समर्पक शब्दात लिहिला आहे.जणू काही आपणही बसने प्रवास करताना आपल्या समोरच हा प्रसंग घडतोय इतकं सुपर लेखन केले आहे.तसचं विविध फळांची वाईन बनवणाऱ्या उद्योजक पुराणीक यांची यशोगाथाही आपण फिरता फिरता वाचनात मग्न होऊन जातो.
पुढे ‘मी आणि अंदमान’,माझी लंडनमधील तीर्थक्षेत्रं’आणि ‘लंडनमधील कृष्णमंदिराने ब्रिटिशांचं डोकं फिरवलंय’ रोमॅन्टिक मॉन्ट्रियल ,एक बंगला बने न्यारा, अमेरिकेत सगळंच मोठ्ठं!,गाय एक उपयुक्त पशू?पायाशी घोटाळणारा जीव,मीटर डाऊन, टॅक्सी टॉक्स, शंभर नंबरी सोनं या लेखांतून आपणास अमेरिकेत लोकप्रिय स्थळांची महती समजते.तसेच सिंहली पाहुणचार’या लेखात क्रिकेटचा दौरा श्रीलंकेत असताना क्रिकेटर आणि मित्रांच्या घरी मेजवानातील सुप्रसिद्ध खाद्यपदार्थांची चव चाखायला मिळाली.त्याचे वर्णन लाजवाब केले आहे. तसेच उत्तरार्धात सुप्रिया संझगिरी यांचे जगभराचा खाऊ:काही असा काही तसा आणि शत्रु राष्ट्र,नव्हे मित्र राष्ट्र!असे दोन लेख लोकप्रिय खाद्यपदार्थांची ओळख करुन देतात.अतिशय सुंदर शब्दात क्रिडा समीक्षक व परदेशभ्रमण करणारे श्री द्वारकानाथ संझगिरी आणि सौ.सुप्रिया संझगिरी यांनी ‘फिरता फिरता’या प्रवास वर्णन तथा पर्यटन यासाठी इतरांना परदेशवारीसाठी हमसफर म्हणून उपयोगी पडेल असं लिखित साहित्य आहे.
अप्रतिम शब्दांकन!
आस्वादक: श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक- १५सप्टेंबर २०२६

Comments
Post a Comment