पुस्तक परिचय क्रमांक:२९०ज्ञानरचनावाद
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२९०
पुस्तकाचे नांव- ज्ञान रचनावाद
संपादक: एच व्ही जाधव
प्रकाशन-संजीवन पब्लिकेशन्स, सातारा
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- २०१२ प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१०४
वाड़्मय प्रकार- शैक्षणिक मार्गदर्शक
किंमत /स्वागत मूल्य-२२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२९०||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: ज्ञानरचनावाद
संपादक: एच. व्ही. जाधव
______________________
जेव्हा शिकणं सहेतुक असतं, तेव्हा सृजन फुलून येतं…जेव्हा सृजन फुलून येतं तेव्हा विचार फैलावू लागतात.. जेव्हा विचार फैलावू लागतात तेव्हा ज्ञान अलोकित होतं.. जेव्हा ज्ञान अलोकित होतं तेव्हाच देशाची प्रगती होते.
–भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एस पी जे अब्दुल कलाम यांचे मुलांचे शिकणं कसं घडावं हे अधोरेखित करणारी विचारधारा
‘ज्ञान रचनावाद’या अध्यापनशास्त्रीय संदर्भ ग्रंथांची ओळख करून देते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि वर्गाच्या दर्जात्मक गुणवत्तेसाठी अनवटवाटेने प्रयोगशील उपक्रम राबविण्यासाठी पाठीवर थाप देऊन प्रेरणा देणारे वाई तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री एच व्ही जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वीस शिक्षकांनी भारत विद्यालय वाई येथे प्रत्यक्ष कृतीयुक्त अनुभव घेऊन आपल्या वर्गातील मुलांना अध्ययन अनुभव दिले.
शैक्षणिक साहित्याचा वापर करून रचनावादी कृतीशील पध्दतीने मूल स्वतः शिकणे आणि त्या ज्ञानाचा वापर अभिव्यक्त होण्यासाठी करते. या नवोपक्रमाने मुलांच्या गुणवत्तेत परिणामकारक बदल दिसून येवू लागला या पध्दतीचा वापर सर्वच शिक्षकांना व्हावा. यासाठी संपादक मंडळाने स्वतः अनुभवलेल्या पध्दतीवर चर्चा विचार चिंतन मनन करून तयार झालेलं पुस्तक. विद्यार्थ्यांच्या भाषिक विकास व गणिती कौशल्ये विकसित करण्यासाठी अध्ययन अध्यापनाची व्यावहारिक स्वरूपातील मांडणी म्हणजे ‘ज्ञान रचनावाद’. शिक्षकांचा खरा मार्गदर्शक विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीला संधी देणारी नवीन अध्ययन अध्यापन पद्धतीचे मार्गदर्शक दीपस्तंभ.
वर्गातील मुलांचे अध्ययन स्तर निश्चित करून तीन गटात (प्रज्ञावान,प्रगत व अप्रगत)विभागणी करुन. आकलन परिपक्व होण्यासाठी कृती करण्याची संधी देणे गरजेचे आहे.यासाठी सर्वंच मुलांना निर्वर्ग पध्दतीने अध्ययन अनुभव देणे.
दररोज परिपाठानंतर एक तास भाषा व गणितातील शैक्षणिक साहित्याचा वापर करून शिकवण्याची संधी दिली.आकलन परिपक्व होण्यासाठी प्रत्येकाला कृती करण्याची संधी दिली जातात याची दक्षता घेतली.तसेच गट पद्धतीने शिकवण्याचा आरंभ केला.याची सविस्तर माहिती या शैक्षणिक अध्यापन शास्त्रीय पुस्तकात दिलेली आहे.गुणवत्तापुर्ण शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण शिक्षकांनी कसे करावे?या प्रश्नांचे उत्तर सोडविण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घेऊन ,त्यांना शब्दसाज चढवून संपादक मंडळाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.यामध्ये भाषा व गणित विषयांचे पायाभूत पंधरा घटकांची माहिती तपशीलवार दिली आहे.तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्याची यादी दिली असून.या पुस्तकात उत्तरार्धात ‘करुन शिकूया’या सदरात विविध शाळेतील विद्यार्थी व मेंटॉर यांची प्रत्यक्ष कृती करतानाचे रंगीत छायाचित्रे आहेत.तसेच या संदर्भ ग्रंथांला तत्कालीन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.शशीकांत शिंदे,वाईचे जननायक आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ अरुणादेवी पिसाळ तसेच सातारा जिल्हापरिषद व वाई पंचायत समितीचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांचे शुभेच्छा संदेश या पुस्तकाचा आशय अधोरेखित करतात.तसेच संपादकीय मंडळातील सर्वांचे लेख ‘ज्ञान रचनावादी’ अध्यापन पद्धतीचे महत्त्व विषद करतात.
शिक्षकांसाठी असणाऱ्या लेखात या पुस्तकाचे रसग्रहण झाले नंतर ज्ञानरचनावादी दृष्टीने स्वयंअध्ययन सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा संपादणूक स्तर निश्चित करावा. कारण प्रत्येक मुलं हे वेगळे आहे.यातील छोटे छोटे उपक्रम,कृती उदाहरणे दिली आहेत.ती समजावून घ्यावीत.वर्ग आरेखन, अध्ययन साहित्य मांडणी,वर्ग रचना कल्पकतेने करावी.याची माहिती सविस्तरपणे दिली आहे.हे पुस्तके मुलांचे शिकणे होण्यासाठी मूलनिहाय कोणत्या मार्गाने जावे याची माहिती समजते.
शिक्षकांसाठी मूल निहाय अध्ययन अनुभव कसे घ्यावे याचे मार्गदर्शन करणारे , वेळोवेळी उपयोगी पडणारे पुस्तक आहे…
आस्वादक:: श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
दिनांक:२५ सप्टेंबर २०२६

Comments
Post a Comment