पुस्तक परिचय क्रमांक:२८५ शब्दांच्या अल्याड पल्याड





📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८५ ||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव - शब्दांच्या अल्याड पल्याड 
लेखक: अनुजा जोशी 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८५
पुस्तकाचे नांव-शब्दांच्या अल्याड पल्याड 
लेखक-अनुजा जोशी
प्रकाशन-अक्षरधन प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च २०२६
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१४४
वाड़्मय प्रकार-ललित 
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
”””””””””””””””””””””””””””””””””””””””””
आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटना आणि साहित्य यांचे कुतूहल निर्माण करणारे वेल्हाळ म्हणजे निळ्या शाईचा साहित्य प्रवाह…लेखिका तथा कवयित्री अनुजा जोशी यांच्या लेखणीतून सजलेला ‘शब्दांच्या अल्याड पल्याड’हा ललित संग्रह म्हणजे वाचक रसिकांना साहित्यातील विविध साहित्य प्रकार,भाषा,वाचन संस्कृती,रुपक,प्रतिमा,मिथक आणि नियतकालिकांच्या सहवासातील एक अनोखे सुंदर पर्व लेखिका अनुजा जोशी भेटीला घेऊन आल्या आहेत.सन २०१६ मध्ये दैनिक गोवादूत मध्ये ‘शब्दांच्या अल्याड पल्याड'नावाचं एक सदर चाललं होतं,त्यातील हे सुप्रसिद्ध लेख.तब्बल १० वर्षांनी या लेखांचे संकलन करून पुस्तक प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाला गोवा मराठी अकादमी यांनी प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे.सुंदर , आकर्षक व मनोवेधक मुखपृष्ठ आपली नजरेसमोर आले की पुस्तकांची पाने उलटत राहावी वाटतात.इतकं सुंदर आहे. तर  मलपुष्ठावर लोकप्रिय साहित्यिक दासू वैद्य यांचे लेखनाला दाद व पसंती देणारा लेख या पुस्तकाची खासियत आणि आशयगर्भता अधोरेखित करतो. वाड्गमयातील निळ्या शाईचा साहित्य प्रवाह अविरतपणे झुळझुळ वाहणाऱ्या साहित्यसरितेच्या अल्याडपल्याडचा प्रदेश हे या लेखनाचे आशयबीज आहे.जस की लोभस हिरवाईच्या प्रेमात पडल्याशिवाय झाडांचे विभ्रम अलगडता येत नाही. त्याचप्रमाणे साहित्यावर असलेल्या निखळ प्रेमाला बहुश्रुततेची जोड असल्याशिवाय एवढं सहजपणे समर्पक शब्दांत वर्णन करता येत नाही.यासाठी साहित्याचा सुक्ष्मपणे बारकाईने लेखन वाचन चिंतन मनन करून विचारवेध तयार करावे लागतात.संपुर्ण तपशीलवार माहिती विवेचन व विश्लेषण करत मांडावी लागते.
त्यांनी क्लिष्ट संकल्पना अतिशय सहज सोप्या भाषेत मांडलेल्या आहेत.त्यामुळे रसिक वाचकांना या पुस्तकातील लेख मनोहारी सफर घडवून आणतील असं मत त्यांनी मांडले आहे.
शब्द म्हणजे आपली जीविका असल्याचा शोध कवितेने लावला.मग शब्दांची सृष्टी विविध अंगांनी समजून घेण्याचं कुतूहल वाढत गेलं.त्याच अभ्यासातून निर्माण झालं ‘शब्दांच्या अल्याड पल्याड.’
   या ललित संग्रहात एकूण ४३लेखांची माला गुंफलेली आहे.साहित्याच्या प्रवासातील शब्दांची भाषा ते वाचन संस्कृती आणि काव्य ते मुक्तछंद तसेच नियतकालिके ते साहित्य संमेलने यांची अप्रतिम सहजपणे उकल करणारी भाषा आणि अलवार शैलीत केलेले वर्णन वाचताना मनाला भावतं.तसेच त्याविषयी ज्ञान आणि माहिती देत नेमक्या शब्दांचे अर्थ सहजपणे समजतात.  इतक्या ताकदीने लेखन केले आहे.
समस्त लेखातील मजकूर अतिशय समर्पक आणि सर्जनशील लेखनाचा अनुभव देणारा आहे.तसेच लेखनातील रुपक प्रतिमा आणि वर्णन वाचताना आपल्या शब्दभंडाराचे संवर्धन होईल असा शब्दप्रवाह आणि शब्दप्रवाह चपखल शब्दात व्यक्त केला आहे.एक मराठी भाषेचे गोडवी गाणारं अप्रतिम कोटेशन!
“माणसाने शब्द घडविला.त्याच लिपीची , भाषा तयार केली.भाषेने समृध्दी दिली. उत्क्रांत होत गेलेल्या मानवी मेंदूचं म्हणजे माणसाचं हे ऋण मराठीने चुकतं केलंय.माणसाने तिला घडवलं पण आजवर माणूस घडवण्याचे काम भाषेने केले आहे.” किती सार्थ विचार भाषेचे.
ओवी आणि अभंग ही सहोदरच.पण भक्तीच्या रसात तुडुंब भिजणारा भाऊ म्हणजे अभंग व त्याची भक्तीभावाने व्याकूळ झालेली बहीण म्हणजे ओवी…किती सुंदर निरुपण ओवीचं केलंय.
हर एका गोष्टीची लय शब्दात पकडणे शक्य असते.फक्त त्यासाठी पाहिंजे अनुभवाशी तादात्म्य पावणं आणि भावनांशी समरसता साधणं.भावलेला विषय मनात मुरला की शब्द आपोआपच त्याचा नाद व लय घेऊन कागदावर उतरतात आणि तेंव्हाच भावकाव्य अथवा गीतकाव्य जन्माला येतं.खूप सुंदर साज 
चढवला आहे लावण्यमती लयीला.
बालजगताची निरागस मुलांसाठी असणारं साहित्य भंडार म्हणजे बाल मासिकं.याची अतिशय समर्पक आणि सहज सुंदर शब्दात परिपूर्ण ओळख करून दिली आहे.मुलांनी नेमकं काय वाचावं हे अधोरेखित करत पुस्तके हाच समर्थ पर्याय बालजगत समृद्ध करायला आहे.
अतिशय सुंदर लेख या पुस्तकात वाचायला मिळाले याचे समाधान वाटले.अतिशय शुध्द आणि अलवारपणे अभ्यासपूर्ण आशयघन लेखन केले आहे.

आस्वादक:श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई 
लेखन दिनांक:१४सप्टेंबर २०२६






Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प