पुस्तक परिचय क्रमांक:२८८ बियॉंड द लाइन्स
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२८८
पुस्तकाचे नांव-बियॉंड द लाइन्स एक आत्मचरित्र
लेखक:कुलदीप नय्यर
अनुवादक: सायली राजाध्यक्ष व डॉ.भालचंद्र सुपेकर
प्रकाशन- चिनार पब्लिशर्स, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-ऑक्टोंबर २०१८
द्वितीय आवृत्ती
पृष्ठे संख्या–५५३
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य-५००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२८८||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव:बियॉंड द लाइन्स एक आत्मचरित्र
लेखक:कुलदीप नय्यर
अनुवादक: सायली राजाध्यक्ष व डॉ.भालचंद्र सुपेकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वरिष्ठ पत्रकार आणि माजी संसद सदस्य कुलदीप नय्यर हे भारतातील ख्यातनाम पत्रकार होते.फाळणीच्या वेळी निर्वासित म्हणून भारतात येण्याआधी त्यांनी लाहोर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होते.अमेरिकेत पत्रकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री आणि गोविंद वल्लभ पंत यांचे माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. 'यूएनआय'या वृत्तसंस्थेचे ते व्यवस्थापकीय संपादक म्हणून काम केले आहे.तसेच ते तब्बल २५ वर्षे लंडनच्या 'द टाईम्स'या दैनिकाचे वार्ताहर म्हणून काम केले आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता. त्यांची १२ पेक्षा जास्त ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. दक्षिण आशियातील बऱ्याच देशांमध्ये कुलदीप नय्यर यांचे स्तंभलेखन आवडीने वाचलं जातं.
'बियाॅंड द लाईन्स' ख्यातनाम पत्रकार कुलदीप नय्यर यांचे इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेले आत्मचरित्र आहे.ते सायली राजाध्यक्ष व डॉ.भालचंद्र सुपेकर यांनी मराठी भाषेत अनुवादित केले आहे. पुस्तकाच्या शीर्षकाचा अर्थ 'वास्तविक नियंत्रण रेषा'असा आहे.
जीवनातील विविध सुखदुःखाच्या घटना, अनुभव आणि राजकीय विचार त्यांनी मांडले आहेत. ते एक भारतीय पत्रकार, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहेत.
अनुवादक सायली राजाध्यक्ष या जेष्ठ पत्रकारांनी प्रकाशित केलेल्या'कहाणी दोन शहरांची'या पुस्तकाच्याही त्या अनुवादिका असून पत्रकारिता क्षेत्रात वीस वर्षांहून अधिक काळ त्या कार्यरत आहेत. तसेच पंधरा वर्षे त्यांनी आकाशवाणीवर वृत्तनिवेदक आणि दूरदर्शनच्या वृत्त विभागात अनुवादक तसेच संपादक म्हणून काम केले आहे.अनेक पुस्तकांचे त्यांनी मराठी अनुवाद केला आहे.
'बियॉंड द लाइन्स'या आत्मचरित्रात पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या जीवनपट उलगडून दाखविला आहे.हे आत्मचरित्र कुलदीप नय्यर यांच्या आयुष्याचा ताळेबंद मांडणारे हे आहे.आयुष्य जगताना काळाजाच्या वर्मावर घाव घालणाऱ्या प्रसंगाचे प्रत्यक्ष चाखलेले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.ते म्हणतात की,''माझं आयुष्य बदलून टाकणारी घटना म्हणजे मला झालेली अटक. कारण मी निरपराधी असतानाही मला तुरुंगवास भोगावा लागला."फाळणीने माझ्या आयुष्याची सुरुवात झाली.तेंव्हा आईने मला भारतात जायला १२०रुपये दिले होते.सगळ्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत मी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होतो.भारताची फाळणी ते भारताच्या आर्थिक सुधारणा काळ यामधील देशाचा राजकीय आणि प्रशासकीय कार्याची माहिती देणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे.भारताच्या स्वातंत्र्योत्तर अंतरंगाचे सविस्तर दर्शन घडवणारे ‘बियॉंड द लाईन्स’हे पुस्तक आहे.
या आत्मचरित्रात एकूण एकोणवीस प्रकरण असून उपसंहार लेखात लेखकाने वास्तव घटनांची माहिती समाविष्ट केली आहे.तर परिशिष्ट एक मध्ये भारतीय प्रसारमाध्यमे यांची माहिती आहे. बालपण व फाळणी,नेहरू प्रभावाची वर्ष, प्रशासनाच्या सुरुवातीच्या वेदना, इंग्रजी पत्रकारितेतलं माझं प्रशिक्षण आणि उमेदवारी, गोविंद वल्लभ पंत यांची गृहमंत्रिपदाची कारकीर्द,लाल बहादूर शास्त्री यांची गृहमंत्रिपदाची कारकीर्द,लाल बहादूर शास्त्री यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल,इंदिरा गांधी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल, बांगलादेश देश युद्ध, सिमला परिषद, आणीबाणी आणि नंतर, जनता पक्षाचे सरकार, ऑपरेशन ब्लू स्टार, राजीव गांधी,व्ही पी सिंग यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाल, नरसिंह राव यांचं सरकार,माझी संसदेतील वर्षं,भाजप सरकारचा कार्यकाल मनमोहनसिंग यांचं सरकार….
माजी खासदार व पत्रकार कुलदीप नय्यर यांच्या आयुष्याचा ताळेबंद मांडणारे आत्मचरित्र….
आस्वादक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई
लेखन दिनांक:३०ऑगस्ट २०२६

Comments
Post a Comment