Posts

Showing posts from May, 2026

पुस्तक परिचय क्रमांक:२७२ चित्रलिपी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-२७२ पुस्तकाचे नांव-चित्रलिपी लेखक: संध्या शेषराव येलेकर व विनोदकुमार नवघडे प्रकाशन-युरो वर्ल्ड पब्लिकेशन, नागपूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम पृष्ठे संख्या–१०८ वाड़्मय प्रकार-काव्यचित्र किंमत /स्वागत मूल्य-५००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 २७२||पुस्तक परिचय  पुस्तकाचे नांव -चित्रलिपी  लेखक: संध्या शेषराव येलेकर व विनोदकुमार नवघडे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~    “रंगछटांनी कॅनव्हासवर  उमटली भावना मनीची  सुगंधित शब्दफुलोऱ्याने  बहरली चारोळी सृजनाची!”    मनातील विचारतरंगांना कुंचल्यातून चित्राला आविष्कार देणाऱ्या चित्रकार सौ.संध्या येलेकर अन् चित्राचा आशय  मनभावन काव्यातून सौंदर्य खुलविणारे कवी प्रा.विनोदकुमार नवघडे.दुहेरी संगमातून रसिक प्रेक्षकांना आभासी पटलावर खिळवून ठेवणारी जादुई करामत म्हणजे ‘चित्रलिपी’.  जणूकाही कलाविष्कार मैफिलीत सर्वांसमक्ष चित्रकार स्केचिंग करत आहेत अन् त्याच स्केच ‘दिलरुबा’ समर्पक काव्यातून सादर अश...