वाचन साखळीचा षटकार



💫📚📙📘📗📖✒️
वाचन साखळीचा षटकार्.....

सस्नेह नमस्कार !
 आपल्या वाचन साखळी समूहाला सहा वर्षे पुर्ण झाली साधारणपणे आठ हजारपेक्षा जास्त वाचक रसिक , लेखक,कवी अशी लेखणीवर आणि वाणीवर प्रेम करणारी या श्रुंखलेत गुंफली आहेत...तर तीन हजार पुस्तकांचा पुस्तक परिचय ,समिक्षा यावर समूहावर वाचक मंडळींना रसग्रहण करायला उपलब्ध आहेत.. वाचन साखळी समूहाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाढदिवसाला पुस्तक भेट, पुरस्कार विजेत्यांचा पुस्तकाने सन्मान, नायगाव ता.खंडाळा जिल्हा सातारा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले वाचनालयास व अनेक शाळांना आयोजिका प्रतिभाताईंनी पुस्तके दान केली आहेत....

🔖📖दरमहा उत्कृष्ट पुस्तक परिचय आणि अभिप्रायासाठी ई-सन्मानपत्र व घरपोच पुस्तक स्वरुपात भेट घरपोच पाठविली जाते.तसेच समूहातील अनेक मान्यवरांनी या स्पर्धेचे प्रायोजकत्व स्विकारलेले आहे.समूहातील साहित्यिक आपलं पुस्तकं प्रकाशित झाली की अनेकांना पुस्तक परिचय करण्यासाठीं घरपोच पुस्तके पाठवून कृतज्ञता व्यक्त करतात. म्हणजेच आपलं वैयक्तिक वाचनालय समृध्दी होतेय ती ही या समूहामुळे..पुस्तक आणि मैत्री हा अनोखा आविष्कार साजरा होतोय. अनेक मान्यवरांनी पुस्तक परिचय वाचल्यानंतर फोनवरून संपर्क करतात आणि शुभेच्छा देतात.तर काहींनी पुस्तक परिचय दैनिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला आहे.त्यामुळे पुस्तक परिचय करणाऱ्यांना आत्मिक समाधान लाभते.आणि लिहिण्याला प्रोत्साहन मिळतेय...ते वाचन साखळी मुळेच...
आत्तापर्यंत राज्यस्तरीय वाचनयात्री व वाचनश्री पुरस्कार समारंभ,औरंगाबाद,वाई(सातारा), बारामती आणि पुणे येथे वाचन साखळी समूहाचे साहित्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या साहित्यिकांच्या मांदियाळीत साजरे झाले आहेत....या समूहामुळे चांद्यापासून बांध्यापर्यंतचे आणि पालघर पासून लातूर पर्यंतच्या महाराष्ट्रातील पुस्तकप्रेमींची आभासी पटलावर मैत्रीपर्व झाले आहे. सगळेच एकमेकांच्या साहित्यावर अभिप्राय नोंदवितात... सहाव्या वर्धापनदिनाच्या सर्व वाचक रसिकांना आणि लिहित्या हातांना त्रिवार वंदन!!!

   एक वाचक....
श्री रवींद्र लटिंगे 
सहसंयोजक, वाचन साखळी समूह

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे