होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प

 







 साक्षीशिल्प येथे होम मिनिस्टर कार्यक्रम बहारदार वातावरणात हास्यमस्करी करत साजरा झाला.

साक्षी शिल्प दुर्गामाता सार्वजनिक उत्सव सन 2025 आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी खास होय मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्रितम लोखंडे,यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सावंत वहिनी, ग्रामपंचायत सदस्या सौ शैला मालुसरे वहिनी,सौ दिपाली मालुसरे,चैत्या फेम रिलस्टार आदिनाथ जाधव ,नेल आर्टिस्ट कु.श्रुती जाधव, वेबसिरीज स्टार विजय राऊत आणि प्रायोजकांचे व्यासपीठावर आगमन फटाक्यांच्या आतषबाजीत झाले. मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि दुर्गामाता प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून शुभारंभ झाला. सर्वांचे हार्दिक स्वागत गीतसुमनाने बालचमुंनी केले. तदनंतर सर्व अतिथी मान्यवरांचे स्वागत ‘सन्मानचिन्ह’ देऊन आयोजकांच्या हस्ते करण्यात आले.हॉटेल व्यावसायिक श्री अमर गायकवाड, प्राध्यापक नितेश ससाणे आणि सरपंच सावंत मॅडम यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ झाला.

     मिमिक्री कलाकार राउत याने सिनेजगतातील व राजकारणी नेत्यांचे हुबेहुब आवाजाची नक्कल करत वातावरण निर्मिती केली.तदनंतर हसत खेळत गाण्याच्या तालावर नाचत ‘होम मिनिस्टर’खेळात महिला सहभागी झाल्या. सर्वंच महिलांसाठी लकी ड्रॉ बक्षिसाचे आयोजन केले होते.सुमारे अडीचतास खेळ रंगला होता.

  सजगपणे महिला खेळात अवधान टिकवून मानाची पैठणी मिळवायला आतुर झाल्या होत्या.सगळे प्रेक्षकही चेअरप देत खेळाचा आनंद मनमुरादपणे घेत होते.शेवटी दोघींची मानाच्या बक्षिसासाठी स्पर्धा सुरू झाली,तेंव्हा त्यांच्या पतीलाही खेळात सहभागी करून घेतले.अन् संगिताच्या तालावर दोन्ही जोड्यांनी‘कपल डान्स’बहारदारपणे सादर करत रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली.अंतिम फुगे फोडण्याच्या मनोरंजक खेळातून सौ. सुवर्णा फरांदे वहिनी पैठणीच्या पहिल्या विजेत्या झाल्या तर अश्विनी पाटील वहिनी उपविजेत्या होऊन मानाच्या सुवर्णनथीवर आपले नाव कोरले.पाचव्या टोस्ट मेकर बक्षिस विजेत्या सौ.शर्मिला शेळके वहिनी, तर चतुर्थ बक्षिस इस्त्री विजेत्या सौ वैशाली जाधव आणि तृतिय चांदीचे पैंजण बक्षिस विजेत्या झाल्या सौ.प्राजक्ता कवडे. 

   लकी ड्रॉ विजेत्या महिला अनुक्रमे कोमल वनारसे जयश्री भोईटे पुनम कदम,कोमल भोरे,पूजा मुळीक व नंदा बेलोसे यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.मानाची बक्षिसे,होम मिनिस्टर कार्यक्रम आणि लकी ड्रॉ बक्षिसे प्रायोजकांचा सन्मानचिन्ह देऊन आयोजकांच्या हस्ते गौरव करण्यात आला.स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य आणि परिश्रम घेतलेल्या सर्वश्री श्री रविंद्र निकम,श्री यशवंत मालुसरे, श्री युवराज जगताप, श्री संजय बेलोसे,श्री सतिश पाटील,श्री राकेश खोपडे,श्री शरद राजपुरे, श्री अमर शेळके आणि आयोजक टीमचे हार्दिक आभार!!!








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी