खरी कमाई
प्रेरणादायी वास्तूपाठ ,खरी कमाई....
वाढदिवस म्हणजे फक्त केक नव्हे… तर आनंद वाटण्याचा दिवस!
इयत्ता दुसरीतील रिषभ राऊतने वर्षभर साठवलेल्या पैशातून शाळेला दिला ब्लूटूथ स्पीकर 🎶
खऱ्या शिक्षणाची हीच खरी सुरुवात! इतरांना प्रेरणादायी उपक्रम…
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-माझेरी पुनर्वसन केंद्र -विडणी ता.फलटण येथील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या रिषभ विशाल राऊत याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वर्षभर त्याला मिळालेले पैसे त्याने गल्ल्यात साठवून ठेवले होते. त्याची आई वृषाली आणि पिता श्री.विशाल राऊत यांनी त्याच्याशी या पैशाचे तू काय करणार आहेस?असा विचारविनिमय केला.परिपाठ, कविता गाणी श्रवण करायला आणि नृत्य शिकायला उपयोगी पडेल असे बहुगणी ब्लुटुथ स्पिकर (आय पॉड) शाळेस भेट दिले.लोकसहभागातही मुलांचे योगदान महत्त्वाचे आहे.
शिक्षणाचे महत्त्व ओळखणाऱ्या आणि संस्कारित मुलाला घडवणाऱ्या पालकांना मनःपूर्वक धन्यवाद! आणि वर्गशिक्षिका सौ.सरस्वती संजय भोईटे मॅडम आपणास कृतज्ञतापूर्वक धन्यवाद!!
मुख्याध्यापक मॉडेल स्कूल माझेरी पुनर्वसन तालुका फलटण

Comments
Post a Comment