पुस्तक परिचय क्रमांक:२४४ अडगुलं मडगुलं




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४४
पुस्तकाचे नांव-अडगुलं मडगुलं 
लेखक : विश्वनाथ खैरे 
प्रकाशन-संमत प्रकाशन, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीयावृत्ती २६जानेवारी ,२०१०
पृष्ठे संख्या–१५०
वाड़्मय प्रकार-शब्दकोश
किंमत /स्वागत मूल्य-९०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४४||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-अडगुलं मडगुलं 
लेखक: विश्वनाथ खैरे 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
आपल्या वाडवडिलांच्या बोलीचालींचा मऱ्हाटी मागोवा घेणारं साहित्य अकादमीचे ‘भाषा सन्मान २००८’चे पारितोषिक विजेता शब्दकोश.तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘भाषाशास्त्र आणि व्याकरण’विभागातील उत्कृष्ट वाड्मयनिर्मितीचा पुरस्कारही ‘अडगुलं मडगुलं’या पुस्तकास लाभलेला आहे.
   एकंदर भाषेतील शब्द,मिथ्यकथा,लोक दैवते, कोरीव लेख,आर्ष मराठी काव्ये, लोककाव्ये अशा विविधांगी मराठी आणि तमिळ भाषेचा संबंध या पहिल्यावहिल्या संमत लेखनात स्पष्ट केला आहे.गुरुवर्य गोविंद अण्णाराव नरसापुर आणि रा.बा. कुलकर्णी यांना हा ग्रंथ समर्पित केला आहे.
 या ग्रंथातील लेखमाला यापूर्वी ‘अडगुलं मडगुलं’ या मथळ्याखाली लोकप्रिय साधना साप्ताहिकात १९७७व७८साली प्रकाशित झालेले आहेत.विज्ञान आणि भाषा यांचा संगम या लेखनातून घडवून आणला आहे. आपल्या बोलीभाषेतील शब्दांची नेमकी उत्पत्ती कोणत्या भाषेतून झाली?त्याचे विश्लेषण मिमांसक पध्दतीने इतिहास आणि भूगोल सोदाहरण स्पष्ट केले आहे.अनेक भाषाचार्यांचे पुरावे आणि संदर्भ नमूद केले आहेत.सामान्यजणांना आपल्या बोलीचालींचा मागोवा माहिती असावा यासाठी या ग्रंथाचे प्रकाशन भाषा अभ्यासक तथा लेखक विश्वनाथ खैरे यांनी केले आहे. पुस्तकाची खासियत ‘भूमिका’ या लेखात मांडली आहे.
मराठी भाषा आणि दक्षिणी भाषा यांच्या परस्पर संबंधातील निरखणे आजवर कुणी मांडली नाहीत.ती प्रथमच या लेखातून निरुपली आहेत.या ग्रंथात निरुपणातून न उलगडणारी शब्दांची कोडी उलगडताना
पानोपानी दिसतात.शुध्द जिज्ञासेपोटी आरंभलेल्या, एकलव्यमार्गाने केलेल्या तमिळ भाषेच्या अभ्यासातून उदय झाला आहे.संस्कृत विद्येच्या चिकित्सक अभ्यास महाराष्ट्राचे पाऊल अग्रभागी आहे.
 ‘अडगुलं मडगुलं’या ग्रंथात एकंदरीत पंधरा सदरे असून साधारणपणे एकशे सत्तर शब्दांची उत्पत्ती या ग्रंथात संदर्भ आणि पुराव्यास विश्लेषण केले आहे.
शेवटी परिशिष्टात संदर्भ साहित्य सूची, दक्षिणी शब्द सूची, सामान्य सूची दिलेली आहे.अडगुलं मडगुलं, ओवीची चित्तरकथा, एकगीते-लोकगीते,सरडाचा विष्णू झाला, दगडावरच्या रेघा, मऱ्हाटेचि बोल,छे छे! इश्श तमिळ? अय्या!, घरोघरी मुरुगन्, खंडुबाचा येळकोट,युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, तेतीस कोटी देवा,गोंधळा यावं, भाषा मूळ अडाण्याची, नखशिखान्त तमिळ, चूलमूल नातीगोती,यादुम् ऊरेऽयावरुम् केऽलिर्..अशी शीर्षक असणारी सदरे.अनुक्रमणिकेत क्रमवार सदरे त्यातील उपप्रकार पानवार नोंदविले आहेत.मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या अक्षरयात्रींनी वाचकरसिकांनी आपल्या बोलीभाषेतील शब्दांचा उगम आणि वापर नेमका कसा होत गेला आहे.याचे विश्लेषण मिमांसा अतिशय समर्पक शब्दात लेखक आणि भाषा अभ्यासक विश्वनाथ खैरे यांनी स्पष्टपणे केली आहे.
मराठी भाषेचे अध्यापन करणाऱ्या समस्त शिक्षकांना आणि साहित्यिकांना हा ग्रंथ मार्गदर्शक दीपस्तंभ ठरेल असे मला वाटते…अतिशय मौलिक ज्ञानभांडार वाटणारा ग्रंथ म्हणजे ‘अडगुलं मडगुलं'.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २४ ऑगस्ट २०२५




Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी