पुस्तक परिचय क्रमांक:२९९ व लिजेंड ऑफ बहिर्जी-नाईक'
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-२९९
पुस्तकाचे नांव-- द लिजंड ऑफ बहिर्जी-नाईक पन्हाळयाचा वेढा पुस्तक दुसरे
लेखकाचे नांव--श्रेयस भावे
अनुवाद: योगिता रिसवूड
प्रकाशक-दिलीपराज प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सप्टेंबर २०२४/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-३१०
वाड्मय प्रकार-कथा
मूल्य--४५०₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
२९९||पुस्तक परिचय
बहिर्जी-नाईक
लेखक-श्रेयस भावे
➿➿➿➿➿➿➿➿➿➿➿
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
युगप्रवर्तक जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य अलौकिकअसणारा शिवइतिहास अथांग खोल असून त्यात अनेक शौर्यगाथेचा खजिना लपलेला आहे. अनेक शिलेदारांच्या शौर्यगाथा आहेत.या शिवसागरात रक्ताच्या अभिषेकाने आणि महापराक्रमाने स्वराज्य निर्माण करण्यात अनेक दुर्मिळरत्नांनी मुर्दुमूकीने रणांगणे गाजविली आहेत.त्याच शिवकाळातील आपल्या बुध्दीचातुर्याने, चाणाक्षपणे आणि समयसूचकतेने शत्रूच्या गोटातील बित्तंमबातमी महाराजांपर्यंत वाऱ्याच्या वेगाने पोहचविणाऱ्या गुप्तहेरांच्या महान कारवायांची आणि मराठा साम्राज्याच्या उदयाची कहाणी ‘दि लिजंड ऑफ बहिर्जी-नाईक’पन्हाळ्याचा वेढा पुस्तक दुसरे लेखक श्री श्रेयस भावे यांनी इंग्रजीत प्रकाशित केली आहे.तर अतिशय समर्पक आणि सहज सुंदर शब्दात योगिता रिसवूड यांनी अनुवादित केली आहे.
सन १६६५ सालातील मराठा स्वराज्याची ही कहाणी आहे.प्रचंड मोठ्या मुघल फौजेने पुरंदर किल्ल्याला वेढा राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंह यांच्या नेतृत्वाखाली अफगाणी सरदार दिलेरखान याने वेढा घातलेला असतो.अशा कठीण आणीबाणीच्या प्रसंगी चतुराईने कसा मार्ग काढला.याचे दर्शन गुप्तहेर बहिर्जी- नाईक
यांच्या नजरेतून ही कथा उलगडते.गनिमी काव्याचे अनोखे तंत्रज्ञान आपणास या कथेतील वाचायला मिळते.गुप्तहेर स्वराज्यात कसे सामील झाले.त्यांचे प्रशिक्षण,दिलेली कामगिरी आणि मराठा साम्राज्याच्या विस्ताराचा इतिहास काल्पनिक कथेतून गुंफला आहे.
अठ्ठावीस कथांमधून सुरतेची लूट ते दिल्लीच्या बादशहाचे आग्रा भेटीचे छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रण या कार्यकाळातील ऐतिहासिक घटना शब्दबध्द केल्या आहेत.या काळात गुप्तहेरांनी केलेल्या कामगिरीचे वर्णन वाचताना प्रत्यक्ष शिवकाळातील प्रत्यक्ष घटनाप्रसंगाची प्रचिती येते इतकं समर्पक वर्णन यथार्थ शब्दात आणि ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे.युध्द प्रत्यक्ष लढण्यापुर्वी शत्रूची चाल काय असेल याची खबरबात मिळवण्यासाठी गुप्तहेरांना कोणत्या दिव्यातून जावे लागते, कोणत्या धाडसी उपाययोजना कराव्या लागतात तसेच हजरजबाबीपणा आणि डोळे व कान उघडे ठेवून कसं रहावं लागतं याची संवादात्मक वर्णन अप्रतिम आहे.भावना,समर्पण,त्याग आणि आकांक्षांना तिलांजली देऊन स्वराज्याचे संवर्धन करण्यासाठी शिवाज्ञा शिरसावंद्य मानून गुप्तहेरांना, नजरबाजांना किती संघर्ष करावा लागतो.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे’द लिजेंड ऑफ बहिर्जी-नाईक' ही
कथाकादंबरी आहे.या कार्यप्रणालीचे वर्णन वाचताना मन मंत्रमुग्ध होते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!

Comments
Post a Comment