राजपत्रित अधिकारी मयूर गवते....
ओझर्डे गावचे राजपत्रित अधिकारी मयूर गवते
खडतर व अथक प्रयत्नातून यशाची हॅट्रिक.... एसटीआय, पीएसआय आणि बीडीओ या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले.याबद्दल हार्दिक अभिनंदन!
महाराष्ट्र राज्यसेवा स्पर्धा परीक्षा 2024 मध्ये मयूर संगीता प्रमोद गवते यांची गटविकास अधिकारी पदावर निवड . महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षा 2024 च्या निकालात ओझर्डे येथील मयूर संगीता प्रमोद गवते यांनी गटविकास अधिकारी (BDO) वर्ग – १ या पदावर झळाळते यश संपादन केले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता 1 ली ४थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण पतितपावन विद्यामंदिर, ओझर्डे येथे झाले. पुढील उच्च माध्यमिक शिक्षण त्यांनी राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे पूर्ण केले. कृषी महाविद्यालय, पुणे येथून बी.एस्सी. (Agriculture) पदवी प्राप्त केली.
मयूर यांची घरची परिस्थिती सक्षम असून कुटुंबीयांनी अभ्यासासाठी आणि तयारीसाठी संपूर्ण पाठींबा दिला.त्यांचे पिताजी सेवानिवृत्त एस टी कर्मचारी आहेत.त्यांनी 2021 पासून MPSC ची तयारी सुरू केली.अभ्यासात सातत्य ठेवले आणि यश त्यांच्या पावलांवर आले.
त्यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल ओझर्डे ग्रामस्थ, कुटुंबीय, नातेवाईक,शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुढील शासकीय सेवेमध्ये ते ग्रामीण विकासात मोलाची भर घालतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Congratulations 🎉
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete