पुस्तक परिचय क्रमांक:२५९गोष्टींचं एटीएम
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२४९
पुस्तकाचे नांव-गोष्टींचं एटीएम
लेखक :प्रा.श्याम भुरके
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीयावृत्ती, ऑगस्ट,२०१७
पृष्ठे संख्या–१३०
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२४९||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव-गोष्टींचं एटीएम
लेखक:प्रा.श्याम भुरके
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
‘विनोद’ हा जीवनाचा नैसर्गिक आरोग्यवर्धक शब्दवेलींचा अर्क आहे.
विनोद ऐकल्याने आपण मनसोक्त हसतो. दिलखुलासपणे दाद देतो.अगदी लोटपोट होतो.इतकी ताकद विनोदात असते. तमाश्यातला सोंगाड्या फार्सिकल बोलून आपल्याला हसायला लावतो.तसेच विनोदी चित्रपट आणि दूरदर्शन मालिका पाहताना आपण ताजेतवाने होतो.
अनेक विनोदी साहित्यिकांनी अवतीभोवतीच्या परिसराचे निरीक्षण करून आणि माणसांच्या दैनंदिन घटनांचे नकळतपणे घडलेले किस्से, समर्पक शब्दात टिपून एकमेकांशी शेअर केलेले आहेत.एखाद्या गोष्टीवर भाष्य चपखलपणे , समर्पक शब्दात आणि समयसूचकतेपणे बोललं की ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते.आणि तिथेच विनोद घडत असतो.
विनोदी साहित्याचे लेखन अनेक नामवंत आणि सुप्रसिद्ध साहित्यिकांनी केलेले आहे.त्याच पंगतीतले एक नामवंत लेखक प्रा.श्याम भुरके आपल्या बॅकिंग क्षेत्रातील किस्से,साहित्याच्या एटीएम मध्ये गोष्टींचे चलन भरुन वाचक रसिकांना “गोष्टींचे एटीएम”पुस्तक रुपाने प्रसिद्ध केले आहेत.
बॅकेतील कर्मचारी आणि ग्राहक एकमेकांशी संवाद साधताना घडलेल्या विनोदी किस्स्यांची साखरपेरणी या सर्व गोष्टीत आहे.अलिकडे अनेक समारंभ व व्याख्यानातून वक्ते विनोदाची पेरणी अधूनमधून करून वातावरण हलकेफुलके करतात.चला तर मग आपणही या एटीएम मधून आपणाला पाहिजे त्या गोष्टींचे चलन
वाचनाचेकार्ड स्वाईप करून आणि आतुरतेचा टाकून पासवर्ड हवी ती गोष्ट वाचूया…
अफलातून गोष्टींचं ऑल टाइम मनोरंजन करणारे, बॅकिंग क्षेत्रात सेवा करताना टिपलेले प्रसंग प्रा.श्याम भुरके यांनी ‘गोष्टींचं एटीएम’या विनोदी पुस्तकात शेअर केले आहे.हे रसग्रहण केल्याने मन आणि शरीराच्या समाधनानाचा शेअर्स निश्चितच वधारेल.आकर्षक आणि गोष्टींना समर्पक मुखपृष्ठ असून मलपृष्ठावरील ब्लर्ब एका कथेतील विनोदी बाजाची आपणास ओळख करून देतो.
या गोष्टींच्या एटीएममध्ये तेरा गोष्टी आपणास वाचायला मिळतील.एकपेक्षा एक हास्याची लकेर उमटणाऱ्या आहेत.तर आशयाला साजेश्या व्यक्तिंची छायाचित्रे गोष्टीचा शुभारंभ करुन देतात.स्वप्नात आलेल्या एका सर्क्युलरमुळे बॅकेतल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी सौजन्याने कसे वागावे लागते.स्वप्नात बॅक कर्मचारी ठेवी वाढविण्यासाठी मिठ्ठास गोड बोलीतून कसं पटवतात.ती गोष्ट ‘बॅंकेतले पगार बंद.’
महिलांना आठवड्यात एकदा हक्काची सुट्टी मिळाली तरी स्वयंपाक घराचा हक्क दुसऱ्याला देताना काय काय घडते? सुट्टी असलीतरी स्वतः सगळी कामं कशी करतात?ते पतीपत्नीचा संवाद म्हणजे ‘गृहिणींनी हक्काची सुट्टी’.
बॅकेतील कर्मचारी आणि ग्राहक सगळेचजण जर वयोवृध्द असतील तर व्यवहार करताना काय घडेल याची ओळख करून देणारी, ‘वयोवृध्दांची बॅंक.’
टिव्हीवर विनोदी मालिका म्हणून लोकप्रिय असलेल्या शेखर सुमन यांच्या ‘मूव्हर्स ॲण्ड शेकर्स’मालिकेतील प्रमुख कलाकार शेखर सुमन यांच्या उपस्थितीत
त्यांच्या शोची वात्रटिका सादर करताना झालेल्या विनोदी मैफिलीची ओळख ‘बॅंकेत मूव्हर्स ॲण्ड शेकर्स' या गोष्टीत अफलातून करामती सारखीच केली आहे.
घुकणी बुद्रुक शाखेची चित्तरकथा दैनिक व्यवहार कसे होतात त्याचा रिपोर्ताज ‘अगत्यशील(?)ग्राहक या गोष्टीतून समजत उमजत जातो.अन् या वेगळ्या बॅकेची स्टोरी वाचताना अगत्याने सरबराई कशी होते.ते उमगतं.
चिमणला मिळालेल्या धनादेशाचे पैसे लगेच हवे असतात.त्यासाठी त्याला खाते उघडणे ते खात्यातून रक्कम काढण्यासाठी दिवसभर काय काय दिव्य करावं लागतं. जणूकाही सामान्य माणसाची परवड बॅकेतील कर्मचारी कसे करतात.याची ओळख उठावदार करणारी ही कथा.बॅंकेत चिमण..
बॅकेतील कर्मचाऱ्यांचा एकमेकांवर विश्वास असेलतर व्यवहार चोख होतात.पण बॅकेतीलच शिपाई गुपचूपपणे कॅशमधील पैसे लंपास करतो.ते शोधायला कॅशियरनै
काय युक्ती वापरली.त्याची उत्सुकता ताणायला लावणारी कथा म्हणजे ‘कॅश मंत्र’.
कधीच फेरीवाल्यांकडून वस्तू खरेदी न करणाऱ्या बाईला पुण्यातला फेरीवाला पैजेचा विडा उचलून, सौंदर्य प्रसाधने कशी खरेदी करायला लावतो.ती ‘लोका सांगे’
कथा सुविचारासारखी आहे.
अशाच सुरस आणि मनोरंजक करणाऱ्या
नातवासारखी प्रेमळ बँक,गरीबाची श्रीमंत मुलाखत, मुदत ठेव- एक पदवीदान!, सेंटेड टोकन आणि अजब वसुली !या कथा आहेत.अप्रतिम पुस्तक आहे. हलकंफुलकं विनोदी वाचन केल्याने आपण तणावमुक्त होतो.भावभावना बदलते.आनंददाची
लयलूट करतो.अतिशय छान पुस्तक आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- २० सप्टेंबर २५

Comments
Post a Comment