आमची शाळा आमचे उपक्रम.स्कुलकीट
शालेय उपक्रम
जननी चॅरीटेबल ट्रस्ट मलकापूर तालुका कराड या ट्रस्टच्या वतीने दुर्गमभागातील कोंढावळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दप्तराचे वितरण करण्यात आले.
🖊🗒📚✏📝📓📋🔖🔖
जननी चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री संदीप फुके व श्री माधव काळे आणि श्री केतन भिलारे यांच्यावतीने कोंढावळे , देवरूख वाडी व किरोंडे या गावातील इयत्ता पहिली ते दहावीच्या 101 विद्यार्थ्यांना व अंगणवाडीतील मुलांना स्कूल किट दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वितरण व गरीब आदिवासी वंचित घटकातील 17 कुटुंबांना मायेची ऊब म्हणून ब्लॅंकेटचे वाटप जननी चॅरिटेबल ट्रस्ट मलकापूर तालुका कराड चे अध्यक्ष श्री संदीप फुके , सदस्य श्री माधव काळे व श्री केतन भिलारे ,श्री धोंडीबा कोंढाळकर सरपंच कोंढावळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर कोंढाळकर ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कोंढाळकर, श्री नारायण महाराज कोंढाळकर आनंद महाराज कोंढाळकर, नारायण कोंढाळकर, शिवराम कोंढाळकर यांच्या हस्ते कोंढावळे , देवरूखवाडी व किरोंडे शाळेतील सुमारे 101 मुलांना 51 हजार रुपये किंमतीचे साहित्य दप्तर,वह्या,पाण्याची बाटली,स्केच पेन,पेन, पेन्सिल,शार्पनर इत्यादी शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्ष श्री संदीप फुके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ग्रामपंचायत सदस्य शांताराम कोंढाळकर व अंगणवाडी सेविका सौ रत्नमाला कोंढाळकर यांनी विशेष परिश्रम घेतले....
🖊शब्दांकन मुख्याध्यापक श्री रविंद्र लटिंगे कोंढावळे
Comments
Post a Comment