बालपणीच्या आठवणी--जांभळं
ग्रामीण भागातील अस्सल मनपसंद खाणं कैरी,चिंचा,बोरं,आवळं,जांभळं आणि करवंद,आंबुळक्या...डोंगरभागात करवंदाच्या जाळ्या असतात..बाकी इतर रानमेवा शेतशिवारात अमाप त्यावेळी खायला मिळायचा.कुणाच्याही शेताबांधावर सिझनला ही झाडं खुणवायची नजर वेधायची.
आमच्या गावच्या ओझर्डे ते जोशी विहीर रस्त्याच्या दुतर्फा भरपूर जांभळाची मोठमोठी झाडं आहेत. सगळ्या ओढ्यांच्या काठी,काहींच्या शेतातही झाडं आहेत..काळसर जांभळ्या रंगांची ही फळं खायला लय मस्त लागतात.साखरी जांभळं मोठी व भरपूर गर असणारी तर लेंडी आकाराने छोटीसी असतात.ती आख्यी चोखून खायची व मग बी खाली फेकायची.ही कमी गराची असतात... सर्वांच्याच आवडीची जांभळं.याचा हंगाम उन्हाळा संपताना अन् पावसाळा सुरू होताना असतो. झाडाला लगडलेले

काळे जांभळे घोसच्या घोस आणि झाडाखालचा सडा
यांच्या ओळखीच्या गंधाने आपले पाय आपसूक झाडाकडे वळतात.मग काय 'जांभुळ पिकल्या झाडाखाली,ढोल कुणाचा वाजतोऽऽऽ..'म्हणत म्हणत रसदार काळीशार जांभळांचा मनमुराद आस्वाद घ्यायचा..
आळीतल्या जिगरी दोस्त कंपनी नाहीतर शाळकरी वर्गमित्रांबरोबर जांभळं खायला जायची मजाच वेगळी.. आळीतल्या बऱ्याच सवंगड्यांची जोशीविहीरकडे 'बदकाल' नावाच्या शिवारात शेती.. बालपणी प्रमोद,आण्णा,अशोक, विजूबरोबर कित्येकदा हा रानमेवा खायला चाखायला तिकडे गेलोय..त्याचे शेत शिवच्या ओढ्यापासून सुरू ओढ्यात लेंडी जांभळाची झाडाखाली सेनसड असायची. वेगळाच वास झाडाखाली यायचा.झाडावर चढून भरपूर काढायची.आणि झाडावरच मनसोक्त खायची.जीभ निळी झालेली असायची... जोशी विहीर सडकेला दुतर्फा झाडं. ती मात्र मोठाली त्यावर चढायचे म्हणजे मोठे दिव्य.पण काही मित्र त्यातही वस्ताद होते.शेंड्यात चढून अगदी अस्सल जांभळं काढायची....सगळ्या जांभळाच्या झाडाखाली पडलेल्या जांभळाचं निळकाळं जांभळं अंथरुन दिसायचे.वळवाच्या पावसाने झाडाच्या फांद्या मोडायच्या व गारांमुळे जांभळाचे घोसच्या घोस खाली पडायचे.. पाऊस उघडल्यावर सायकलवरून किंवा चालत जाऊन खाली पडलेल्या फळातील चांगली चांगली, शेलकी, काळीभोर, मोठाली आणि टपोरी गोळा करून खायची.घरी आणायची सगळ्यांना वाटायची...झाडावर जांभळं काढायला ओळखीचा कोण असेल तर त्याला खाली घोस टाकायला सांगायचे.आपण खाली झेलायचे.. काहीजणांनी जांभळं काढण्याच्या हौसेपोटी हातपाय गळयात घेतले आहेत.शेंडक्यातून खाली दाणकन आदळलेत.
तेव्हा अवीट चवीची जांभळं पोटदुखे पर्यत मनसोक्त खायची.गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.. बाजारातून विकत घेऊन खाताना बालपणी खाल्लेल्या जांभळाची आठवणी मनात रुंजी घालतात.
हायस्कूलला असताना शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेला दुपार नंतर सुट्टी मिळायची..बरीच मुलं जांभळं खायला चालत अथवा सायकलवर जोशीविहीरी कडील झाडाखाली गर्दी करायचे पडलेली वेचून किंवा मित्रांनी झाडावरुन काढलेली जांभळं खायला मजा वाटायची.मनसोक्त आस्वाद घ्यायचा..

लेखन दिनांक १३मे२०२०
Comments
Post a Comment