आमची शाळा आमचे उपक्रम निसर्ग भेट अभेपुरी


आमची शाळा आमचे उपक्रम निसर्ग भेट अभेपुरी







अभेपुरी शाळेच्या पाठीमागे रायरेश्वरापासून सुरू झालेली डोंगर रांगेची एक शाखा विसागते.त्या टेकडीवरून परिसराचे विहंगम दृश्य पहायला व खेळ मनोरे करायला आम्ही दिवाळी सुट्टी पर्यंत जायचो... पाच-सात मिनिटांत आम्ही तिथं पोचतो.एके दिवशी परिपाठावेळी मुलांना सुचना केली.इयत्ता पाचवी, सहावी व सातवीच्या सर्व विद्यार्थ्यानी शिक्षकांनी आपल्या शाळेजवळील टेकडीवर फिरायला जायचे आहे.रेनकोट व छत्र्या बरोबर घ्या.  आज दिवसभर निसर्गाच्या सान्निध्यात राहून मजा करायची आहे.
 हजेरी घेऊन आम्ही सर्वजण पाठीमागील रस्त्याने निघालो.. श्री राजेन्द्र क्षीरसागर सर सर्वांचे फोटो काढत. रस्त्या धोम धरणाचे दृश्य सर्वांना बघायला सांगितले.व त्यावर चर्चा केली.पाणी, डोंगर,पठार,धरणाची भिंत,नदी व घाट इत्यादी मुलांनी सांगितले.श्री शशीकांत कदम सरांनी निसर्गाचे निरीक्षण कसे करायचे याची माहिती दिली.परिसरातील सर्व नैसर्गिक ठिकाणांची नावे सांगितली.... तदनंतर आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली.. डोंगरातील पायवाटेने आम्ही फिरत फिरत पुढे छोट्या धबधबा सुरू होतो तिथं पोहचलो.तिथं बारीक पाण्याची धार दिसत होती... धबधबा,ओहळ , ओढा व नंदी कशी बनते यावर मुलांशी संवाद करुन परिचय करून दिला.एव्हाना पाऊसाची चळक आली.. वाऱ्याच्या झुळकीबरोबर पाऊस पडायला लागला..कुणी रेनकोट चढवले काहिंनी छत्र्या डोक्यावर धरल्या.थोड्या वेळांनी मुलं सांगू लागली,सर बारीक साखरनळीचे पाणी वाढून ती जोराने खालीपडतेय.. धबधबा मघापेक्षा मोठा वाटतोय.मुलांनी अचूक निरीक्षण करून निदान केले.याचे कारण विचारल्यावर ते आत्ता पाऊसाचे पाणीइथं पडलेले पाणी वहात वहात उताराला धबधब्याकडे आले.धबधबा मोठा दिसायला लागला...पाउस उघडून उन्ह पडलंअन् एका बाजूला इंद्रधनुष्य दिसू लागले.... मुलं आनंदीत होऊन त्यातील रंग मोजू लागले..सर मुलांचे मस्तपैकी फोटो काढत होते..सर्वच लोकेशन सुपर होते...आता धोम धरण परिसराचा नजारा वेगळाच दिसत होता.धरतिची विविध रुपे दिसत होती.डोळ्यांत न  सामावणारे  धोम धरणाचा जलाशय.डोंगरमाथ्यावरुन धावणारे काळे निळे ढग.

     डोंगराच्या पठारावरून आम्ही दुसऱ्या वाटेने शाळेच्या जवळील टेकडीवर आलो... इथं नेहमी मुलांना घेऊन खेळायला यायचो.. तिथून दिसणाऱ्या परिसरातील घटकांवर संवाद सुरू झाला....वेरुळी डोंगर, मांढरदेव घाट,वाईचा परिसर,गाढवेवाडी , पांडवगड भिलारे वाडी,श्री भैरवनाथ मंदिर,ओढा, दूरवरच्या डोंगरावरील पवनचक्क्या,वैराटगड,सोनजाई डोंगर, साखर कारखाना, टेकडीच्या पायथ्याची घरं याची पाहणी करून.मुलांना आपापली घर शोधायला लावली.....
     नंतर आम्ही मुलांचे तीन गट करुन छोटे-मोठे खेळ,मनोरे, मनोरंजक खेळ सुरू केले.मऊ व लुसलुशीत गवतावर मुलं चेकाळून उड्या मारत होती.उन कमी-जास्त होत होतं...एकदीडच्या दरम्यान टेकडी उतरून शाळेत आलो.सर्वांनी जेवण केले व पुन्हा थटीमाळ येथे जाण्यासाठी टेकडीवर गेलो.... मुलांना आज मजाच मजा होती.भटकायला मिळत होतं.. टेकडीवर पोहचल्यावर पायवाटेने चालत चालत निघालो..जवळच समोर  दिसणाऱ्या  टेकडीवर जायला वळणावळणाच्या  पायवाटेने व्ही आकारात चालत थटीमाळाकडे निघालो.. ठिकठिकाणी गवतफुले दिसत होती.ती मुलींनी तोडून छान पैकी वेणी बनवली... इथंल्या गर्दझाडीत मुलांनी विविध झाडांची सरांच्या मदतीने माहिती घेतली....बीया लावलेल्या व वृक्षारोपण केलेल्या थटीमाळावर आम्ही पोहोचलो..करंजाच्या बीया रूजून रोपे झाली होती.. झाडांनी जीव धरला होता.काहींनी रोपांना हाताने आळी करायला सुरुवात केली.काहीजण रोपाशेजारी वाढलेले गवत काढत होती.काही सीसीटीत साठलेल्या पाण्याची ओळख करून घेत होती.. काहीजण नवीन रोपांची नावे जाणून घेत होती.दोन तास मुले तिथंच वावरात कामं करत होती....
  नंतर हळूहळू माळ उतरवून खाली आलो..भातशेती,एका झाडावरील सुगरणीची घरटी पाहून तिथं पाचपुतेवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर आलो.....गावातल्या जवळच असणाऱ्या आंब्याच्या बागेत फिरलो...शाळेकडे येताना शिवारातील शेती गावाजवळील ओढा पहात पहात शाळेत पोहोचलो... वर्गवार हजेरी घेतली... मुलांना आजच्या परिसरात पाहिलेल्या ठिकाणांपैकी मला आवडलेल्या  ठिकाणची माहिती लिहिण्याचा स्वाध्याय दिला.













Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड