आमची शाळा आमचे उपक्रम शालेय रंगकाम

आमची शाळा आमचे उपक्रम
शालेय रंगभरण कोंढावळे

माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कोंढावळे  प्राथमिक शाळेला मिळाला नवीन लुक...💥🌈💥🌈💥🌈💥🌈 🌈🌈🌈
एक पाऊल शैक्षणिक उन्नतीकडे..आणि मुलांच्या शैक्षणिक वेध घेणाऱ्या भविष्याकडे.... जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे नव्या आकांक्षाच्या दिशेने नव्या रुपात आकार घेत आहेत...........
🤝☄🎨 माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञता निधीने शाळेचे रूप बदललं......
नोव्हेंबर 2019 या महिन्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेऊन या सभेमध्ये आपल्या शाळेचं रंगकाम  व सुशोभीकरण लोकसहभागातून पूर्ण करावयाचे आहे यासाठी काय करावे यावर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते शाळेचे  रंगकाम व सुशोभीकरण माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने पूर्ण करण्यासाठी  सर्व सदस्य सहकार्य करतील .आपण सर्वांना विनंती व आवाहन करुया......त्यानुसार दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळेचे रंगकाम करण्याचे नियोजन करण्यात आले .पेंटरची भेट घेतली.शाळा पाहून त्याने रंगकामाचे बजेट तयार करून दिले.त्यास मंजूरी देवून कामाला सुरुवात केली.कामानिमित्त गावाकडे आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी घेवून शालेय रंगकामाची लोकसहभागातून पुर्तता करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले.
💥👍अनेक मुलांनी ..गुरूजी रंगाचे काम सुरू करा. आम्ही तुम्हाला मदत करतो व इतरांनाही सांगतो....
 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈शाळेच्या आठ खोल्या,किचन शेड व स्वच्छतागृहाचे रंगकाम  सुरू झाले. रंगकामानंतर विद्यार्थ्यांना आनंद देणारा बोलका व्हरांडा रेखाटन केले. गरजेनुसार विविध आकृत्या,पंचांग, शालेय नकाशा,तंबाखू मुक्तशाळा फलक,पर्यावरणाची शिडी, परिमाने, व्यायाम व खेळ,मुलांच्या आवडत्या कार्टून द्वारे विविध चित्रांचे रेखाटन करण्यात आले. 🏵🎨🎨🤹🏼‍♀🎨🤹🏼‍♀🤹🏼‍♀रंगकाम 80 टक्के झाल्यानंतर कोंढावळे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर केवळ शाळेच्या गरजा आणि शिक्षण यावर चर्चा करण्यात आली.शालेय उपक्रम शेअर करण्यात आले.रंगकाम व सुशोभीकरण करण्यासाठी आर्थिक मदतीचे  आवाहन केले.आवाहनाला प्रतिसाद देवून शाळेच्या  माजी विद्यार्थ्यांची स्वखुशीने शाळेच्या रंगकाम सुशोभीकरणासाठी मदत जाहीर करण्यास चढाओढच लागली.
👍🤝💥 गावातील  पालक मुंबईला माथाडी कामगार ,टॅक्सी ड्रायव्हर व छोटे-मोठे व्यवसाय करणारे पालक आहेत .अशा या पालकांना म्हणजेच माजी विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण करून लोकसहभागातून  शाळा स्मार्ट, डिजिटल  बोलका व्हरांडा रंगकाम कसा करायचा याविषयी अनेकदा वैयक्तिक गाठीभेटी घेऊन चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार शाळेचे रंगकाम माजी विद्यार्थ्यांच्या आर्थिक  मदतीने पूर्णत्वाला गेले.🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 प्रजासत्ताकदिना दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या ऋणानुबंधातून निर्माण झालेल्या शाळेच्या रंग कामाचा   उद घाटन सोहळा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते साजरा झाला........एक नवा आनंद.. शिक्षणाच्या पवित्र कार्यास मदत केल्याचा आनंद मला माझ्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता..
    🌈🙏🏻माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञता निधीने कोंढावळे शाळेचे रुपडे बदलले.
याबद्दल सरपंच व सर्व सदस्य,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती व सदस्य ,पालक शिक्षक संघ ,शिक्षक वृंद , विद्यार्थी  व पालक व माजी विद्यार्थ्यांचे मनपुर्वक आभार.....🙏🏻🙏🏻🙏🏻
शब्दांकन मुख्याध्यापक
श्री रविंदकुमार लटिंगे
संपर्क..8605460207



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड