आमची शाळा आमचे उपक्रम- बालिका दिन
आमची शाळा आमचे उपक्रम
अभेपुरी लेकवाचवा ,लेकशिकवा
आमच्या शाळेतल्या आदर्श व अष्टपैलू विद्यार्थ्यानी कुमारी आर्या मांढरे व वृष्टी कांबळे
लेक वाचवा , लेक शिकवा
मुलींचे शिक्षण प्रगतीचे लक्षण.
... पहिल्या मुख्याध्यापिका व स्त्रीशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभियानास सुरुवात होते.२६ जानेवारीला सांगता समारंभ असतो.मुलींनी शिक्षणाची संधी मिळावी.सुशिक्षित मुली म्हणजे नवयुगाची युवती आहे.मुलगी शिकली तर घराची प्रगती होते.आम्ही सावित्रीच्या लेकी.... मुलींना शाळेच्या प्रवाहात आणणे.गुणवत्तापुर्ण शिक्षण देणे.तिच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ निर्माण करुन देणे... मुलींना शाळेत आनंद मिळावा म्हणून शाळेत अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात.कर्तबगार स्त्रीयांची व्यक्तिरेखा साकारून स्व कार्याचा सर्वपरिचय करुन देणे. मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करणे. नाट्यप्रवेश सादर करणे.मुलीच झालेल्या मातांचा सत्कार करणे.परिसरातील आदर्श महिलांचा सन्मान करुन मुलाखत घेणे.(मी कशी घडले.) मुलींचे वाढदिवस साजरे करणे.विविध गुणदर्शनाचे कार्यकर्त्यांचे आयोजन. वंचित घटकातील मुलींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.मुलींचे वाढदिवस शाळेत साजरे करणे.आदर्श मुलींचा गौरव करणे.इत्यादी उपक्रमातून मुलींचं शिकणं होण्यासाठी संधी दिली.
Comments
Post a Comment