माझी भटकंती जायकवाडी धरण क्रमशःभाग ८२






        🛕⛳🛕🛕⛳🛕⛳🛕⛳🛕

      माझी भटकंती

        क्रमशः भाग- ८२

        🛕 पैठण व जायकवाडी धरण⛳
                सन२००६

   औरंगाबादमध्ये "मीपा" संस्थेने आयोजित केलेल्या "पर्यायी शिक्षण विषयी ''प्रशिक्षणाला गेलो असताना जिल्ह्यातील साधनव्यक्तिंच्या समवेत पैठणला जाण्याचा योग आला.सकाळी केलेल्या भटकंतीच्या नियोजनानुसार प्रशिक्षण वर्ग सुटल्यानंतर  आम्ही गाडी करून औरंगाबाद जवळील पैठण व धरण पहायला निघालो.
   इतक्या दूरवर आलोय तर  जवळच्या ठिकाणं बघायला जावूया..पैठण भागवत संप्रदायातील महान संत एकनाथ महाराजांची पावन कर्मभूमी.
समाधीस्थान ,वारकऱ्यांचे तिर्थक्षेत्र.तेथील एकनाथ षष्ठीला मोठा उत्सव असतो.भाविकांची गर्दी होते.असं धार्मिक तीर्थक्षेत्र पहायला आम्ही आलो.पैठण प्राचीन काळातील शालीवाहन राज्याच्या राजधानीचे  ऐतिहासिक शहर आहे .आज तिथं  वारकरी शिक्षणाच्या अनेक संस्था व मठ आहेत...पैठणी साडीचे प्रसिद्ध ठिकाण.संत एकनाथ महाराजांच्या समाधीचं  देवदर्शन घेतले.घरच्यांसाठी प्रसाद व कुंकू घेतले. जवळच संत एकनाथ महाराजांचा वाडा पाहून जायकवाडी धरण पहायला गेलो.धरण व ज्ञानेश्वर उद्यान एक प्रेक्षणिय पर्यटनस्थळ आहे.
     जायकवाडीधरण दगडमातीत बांधलेले सर्वात मोठे धरण आहे.
विस्तीर्ण  जलाशयाचे "नाथसागर"नांव आहे.मराठवाड्यातील सिंचन,वीज आणि पिण्याच्या पाण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो.दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी हे धरण वरदानच आहे.धरणाच्या भिंतीवरुन जलाशय व सांडव्या खालील "संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान" चे दृश्य अप्रतिम दिसते.
धरण पाहून उद्यान बघायला निघालो.हे उद्यान म्हैसूर येथील वृंदावन गार्डनच्या प्रतिकृतीवर आधारित बनवले आहे.
        फुलझाडे,वेली यांच्या विविध प्रकारच्या रचना आकर्षक दिसतात.
संगीताच्या तालावरील रंगीत कारंजाच्या खास शो पाहिला.. मनमोहक आणि मनाला आनंद देणारं सतत बदलतं दृश्य पाहून मजा वाटते.विविध रंगातील पाण्याचे तालबद्ध छोटे-मोठे फवारे उडतानाचे दृश्य, तिन्हीसांजच्या मंद प्रकाशात रंगिबेरंगी कारंजे- नृत्य बहारदार पहायला मिळाले. योगायोगाने  पैठण परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पहायला मिळाल्याचे समाधान वाटले.
तदनंतर आम्ही  मुक्कामाच्या ठिकाणी औरंगाबादमध्ये आलो.
          🦋🍃🌸🍃🦋🍃🌸🦋🍃🌸
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड