माझी भटकंती दांडी कुटीर गांधीनगर क्रमशःभाग १००









💫☘️💫☘️💫☘️💫☘️💫☘️💫☘️💫☘️💫☘️

माझी भटकंती
  📚क्रमशः भाग-१००
१९ ऑगस्ट २०१८

💎 🎖️📽️🎥📹🔆 महात्मा मंदिर (दांडी कुटीर )💎🎖️

    गांधीनगर गुजरात
🔆❄️🔆❄️🔆❄️🔆❄️🔆❄️🔆❄️🔆❄️🔆❄️
अडालज येथील "राणीची वाव" हे सौंदर्य स्थळ पाहून आम्ही  गांधीनगर कडे निघालो.वाटेतील एक उत्कृष्ट जैन मंदिर पाहिले.वास्तूकलेचे उत्तम मंदिर बघायला मिळाले.सकाळपासून ढगाळ वातावरण होते. थुईथुई पाऊस पडायला सुरुवात झाली होती.. गांधीनगर मधील  राष्ट्रपिता महात्मा गांधींचे " महात्मा मंदिर"(दांडी कुटीर)  या नावाने प्रचलित असणारे सर्वात मोठे संग्रहालय पहायला गेलो.. महात्मा मंदिर हे प्रदर्शन  आणि अधिवेशन केंद्र आहे.महात्मा गांधींचे जीवन आणि तत्त्वज्ञानाने प्रेरित ठिकाण आहे.हे मंदिर अंदाजे ३५ एकरात पसरलेले भारतातील सर्वात मोठे अधिवेशन केंद्र आहे.
  महात्मा मंदिर  पर्यटकांसाठी अनमोल ठेवा आहे.त्यात बघणारे जर टेक्नोसॅव्ही असतील तर एक अलौकीक नवतंत्राचे संग्रहालय पहायला मिळाल्याचे समाधान लाभते.दांडीकूटीर महात्मा मंदिर हे स्मारक संपूर्ण वातानुकूलित आहे.मुख्य असेंब्ली हॉल मध्ये एकाच वेळी 15,000 पेक्षा जास्त लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे. मुख्य थिएटर-शैलीतील हॉलमध्ये 3,000 लोकांची क्षमता आहे. प्रदर्शन हॉलमध्ये चार सेमिनार हॉल (थिएटर) आहेत.सात हायटेक कॉन्फरन्स हॉल आणि एक प्रेक्षागृह आहे.
    भेटीचा कालावधी 01.30 तास आहे मंगळवार ते रविवारी हे संग्रहालय खुले असते.सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत वेळ आहे .आठवड्यातील दर  सोमवारी  सुट्टी असते.शुल्क - रु. १० / - भारतीय नागरिकांसाठी आणि रु. २०० / - परदेशी पर्यटकांसाठी आहे.आपल्याला एन्ट्री पास घेऊन म्युझिअम मध्ये प्रवेश मिळतो.संपूर्ण चेकिंग केल्याशिवाय एन्ट्री नसते.सोबत काहीही घेऊन जायला बंदी आहे. तिथं लॉकरमध्ये  मोबाईल,कॅमेरे आणि पर्सेस ठेवायची सोय आहे.
पर्यटकांचा ग्रुप करून ऑडिओटोरिम (थिएटर)मध्ये प्रवेश दिला जातो.आपणास ऐकण्यासाठी हेडफोन-सेट दिला जातो. क्रमाक्रमाने आपण एकेका थिएटरमधील शो बघून पुढे पुढे जातो.अप्रतिम सादरीकरण पाहून आपण थक्क होतो.अप्रतिम दिमाखदार सादरीकरण होते.महात्मा मंदिर ऑडिटोरिममध्ये नवतंत्रज्ञानाचा वापर करून महात्मा गांधीजींच्या बालपण ते स्वातंत्र्याच्या चळवळीतील अनेक ऐतिहासिक  घटनांचे सादरीकरण अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऑडिओ,व्हिडिओ,थ्रीडी व्हिज्यूवल, साऊंड सिस्टीम आणि लाईट इफेक्ट्सचा वापर करुन शो बघायला मिळतो.जणूकाही  थिएटरमध्ये शो बघतोय .असं दृश्य  "दृकश्राव्य " तंत्राद्वारे पहायला व ऐकायला  मिळते. महात्मा गांधीजींच्या जीवन चरित्राचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रदर्शित करण्याचे जगातील एकमेव प्रदर्शनीय स्मारक असावं. महात्मा गांधीजींच्या जीवनचरित्रातील ऐतिहासिक घटनांचा माहितीपट अनोख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बघायला मिळतो.शेवटचा रेल्वेप्रवासातील एका डब्याचा सीन तर अफलातून दिसतो.प्रत्यक्ष आपण रेल्वेत प्रवास करतोय असं दृश्य नवतंत्राने पहाताना अनुभव घेताना नवतंत्राचा आणि तंत्रज्ञ यांचा दृश्याविष्कार पाहून अभिमान वाटतो.अप्रतिम प्रेक्षणिय संग्रहालय आहे.बाहेरील परिसरही प्रेक्षणिय व नयनरम्य आहे.तिथं पवनचक्की,प्रशस्त गार्डन ,कॅनॉल आणि ब्रीजही प्रेक्षणिय आहे.
    तदनंतर आम्ही गांधीनगर मधील प्रसिद्ध अक्षरधाम मंदिर बघायला गेलो.( अक्षरधामची भेट यापूर्वीच्या भाग क्र.८७ मध्ये आहे. )
क्रमशः भाग-१००
भेटूया उद्या कण्हेरी मठ कोल्हापूर येथील भटकंती करायला, तोपर्यंत नमस्कार...
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड