साठवणीतल्या आठवणी कारगील विजय दिन









🍁🎖️🍁🎖️🍁🎖️🍁🍁*
साठवणीतल्या आठवणी*
👮🏻‍♂️कारगील विजय दिन 👮🏻‍♂️
      २६ जुलै
 🪔भावपूर्ण श्रद्धांजली🪔
 शहीद वीरांना विनम्र अभिवादन❗आणि देशाच्या सीमेवर संरक्षण करण्यासाठी तैनात असणाऱ्या समस्त सैनिकांना मानाचा सलाम 
➖➖➖➖➖➖➖
*भारत माता की जय!*
*भारतमातेच्या संरक्षणासाठी* *होैतात्म्य पत्करुन देशाला कारगील* *युध्दात विजय मिळवून देणाऱ्या* *समस्त सैनिकांना त्रिवार वंदन अन्* *सलाम..
आणि भारतभूमीच्या रक्षणासाठी सदैव तैनात असणाऱ्या समस्त सैनिकांना मानाचा सलाम !
कारगील युध्दाच्या दररोज बातम्या टि.व्ही.आणि विविध वृत्तपत्रात फोटोंसह प्रसिद्ध व्हायच्या. त्या बातम्या वाचताना त्यांनी केलेल्या शौर्याचा अभिमान वाटायचा. आनंदाने ऊर भरून यायचा.ज्वलंत आणि रोमांचक क्षणांचे लेख वाचताना अंगावर शहारे यायचे. काहीवेळा नकळत डोळेही पाणवायचे.
मी त्यावेळी माझ्या गावातील जायगुडेवाडी शाळेत होतो. दररोज परिपाठ झाला, की वर्तमानपत्रातील ठळक बातम्या मुले वाचायची. तदनंतर कारगील युध्दावर मुलांशी हितगुज करायचो. त्यांना युध्द , सैनिक, भारतमाता, शस्त्र,
तोफा, विमानं यांचं कुतूहल वाटायचे. मग त्यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरुपात चर्चा घडायची.
एके दिवशी वर्तमानपत्रातील बातम्या वाचन करताना सहज मनात एक विचार आला. आपण या बातम्यांचे संकलन करून ठेवूया. वीर जवानांची गौरवगाथा तयार करुया. येणाऱ्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छोटेखानी बातम्यांचे प्रदर्शन भरवूया. मग परिपाठाला या उपक्रमाची सूचना दिली. नंतर विद्यार्थ्यांच्या मदतीने
भित्तीपत्रके बनवायला सुरुवात केली. मुलांचा प्रतिसाद चांगला होता. काही मुले त्यांच्या घरातील बातम्या संकलित करून आणायचे, कोणी चित्रं आणायची. आमचा कला कार्यानुभव तास अशा रीतीने कृतीयुक्त सुरू झाला.
काही दिवसांनी आमची भित्तीपत्रके तयार झाली. स्वातंत्र्यदिनाला आम्ही शाळेत "कारगील विजय दिन" गौरव गाथा भित्तीपत्रक प्रदर्शन भरविले.
भारतमातेच्या संरक्षणासाठी होैतात्म्य पत्करणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. पालकांचा छान प्रतिसाद लाभला. मुलांचे कौतुकही झाले.

तदनंतर दिनांक २६ जुलै २००३ साली माझ्या गावी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तीन दिवस ओझर्डे ग्रामपंचायत कार्यालयात प्रदर्शन भरविले होते. त्यावेळीही प्राथमिक शाळा, हायस्कूल मधील मुले, गावातील तरुण मुले आणि ग्रामस्थ यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. याची दखल पंचायत समितीने घेतली.  समारोपप्रसंगी तत्कालीन गटविकास अधिकारी मा. विजयराव धुमाळ साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. राजेन्द्र बाबर साहेब, रोपवन अधिकारी मा. श्रीकांत कुलकर्णी, श्री. हणमंतराव पिसाळ (नाना), सरपंच सौ. सुरेखाताई शेलार, उपसरपंच श्री. मनोहर कामटे, पत्रकार श्री. दौलतराव पिसाळ आणि इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत समारोप संपन्न झाला. मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतीने गौरव केला होता. दैनिक 'सकाळ' या वर्तमानपत्रातही बातमी आली होती.

*भित्तीपत्रकाचे प्रदर्शन भरवून शहीद* *वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा*
*अल्पसा प्रयत्न केला होता.*

*त्रिवार वंदन! जय हिंद!!*

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड