निसर्ग सौंदर्य वाट कविता क्र.२६
वळणाची वाट
गाव वाटेचा मैदानी सहवास
मुलांचा सुरू पीटीचा तास
ठेक्यावर डुलतायत
कसरत करतायत
पायांचा ताल , हात कटेवरी
नाचता हसता,व्यायाम करी
हिरव्या गवताची रजई पाहूया
सोनेरी कोवळ्या उन्हात न्हावूया
पोपटी झालरची दुतर्फा झाडी
ही सडक जाते पाटीलवाडी
वृक्ष वेलींचे तोरण सजले
संगतीने खेळायला गवतही आतुरले
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
कविता २६
फोटो संग्रहित गत सालातील आहे....
प्रतिक्रिया
निसर्गातील अनुभवातून शिक्षण हेच खरे आनंददायी शिक्षण।।।।। कृपया नेहमी सुरू ठेवावे, अभिनंदन व जि प शिक्षण विभागाकडून आभार, कारण आपण सातारा जिल्हा शिक्षण विभागासाठी बहुमोल कार्य करून विद्यार्थ्याना चांगल्या प्रकारचे घडवत आहात।।।
श्री संमती देशमाने साहेब सातारा
Comments
Post a Comment