माझी भटकंती अजमेर भाग .क्र.९३








🛕🍀🛕🍀🛕🍀🛕🍀🛕🍀
माझी भटकंती
     🤝मैत्री टूर🚘
क्रमशः भाग-९३

सन १९९७पाचवा दिवस

   🍁 अजमेर🥀           
🥀♾️♾️♾️♾️♾️♾️             
            मुक्कामी थांबलेल्या पंपावर  येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असल्याने निवांतपणे झोप लागलीनाही. अधूनमधून जाग यायची.
सहाच्या दरम्यान फ्रेश झालो.पंपाशेजारील छोट्याशा हॉटेलमध्ये चहा घेऊन पुढील प्रवासाला लागलो.वाटेतच एका  पाण्याच्या ठिकाणी बावडीजवळ अंघोळी उरकल्या. ताजेतवाने आणि फ्रेश वाटले. रमतगमत प्रवास सुरू होता.सकाळची न्याहारी व चहापान  एका धाब्यावर करून मार्गस्थझालो.वाळवंटी प्रदेश मारवाड सुरूझालाहोता.उंट,उंटगाड्याअधून मधून दिसत होत्या.उन्हाची झळा जाणवत होत्या.खजूराचीझाडं,
झुडूपासारख्या वनस्पती जागोजागी आढळत होत्या. राजस्थानी मिट्टीआणि झाडं पहात अंतर कापत होतो.अकराच्या सुमाराला आम्ही अजमेरला पोहोचलो.
         शौर्य आणि महापराक्रमी राजा सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या कार्याचा इतिहासदर्शविणाऱ्या राजधानीचे ऐतिहासिक शहर.
राजपुताना संस्थानची राजधानी. अरावली पर्वताच्या डोंगररांगेच्या सभोवती हे शहर आहे.गाडीतून बाहेर आल्यावर ऊन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत होत्या.रखरखतं ऊन सगळीकडे दिसत होते.अरावली पर्वतावर तारागड किल्ला आहे.तिथं राजपूत कालखंडातील चित्रे व कलाकृती पहायला मिळतात. त्याशिवाय प्रसिद्ध मुस्लिम सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या पवित्र दर्गा आहे.तिथं दरवर्षी ऊरुस भरतो.त्या ठिकाणीही आम्ही गेलो होतो.दर्शन घेतले.ते मुस्लिम धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ आहे.अजमेर जून्या इमारती साठीही प्रसिद्ध आहे. अनासागर आणि सुभाष बाग ही सौंदर्य स्थळे पाहून अकरा किमीवरील पुष्कर या ठिकाणी फिरायला निघालो.
 पुष्कर हिंदूंचे पवित्र धार्मिक तीर्थक्षेत्र आहे.इथंले सरोवर  तीर्थस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे त्याला अनेक घाट बांधलेले आहेत.पुष्कर येथील मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे भारतातील एकमेव ब्रम्हदेवाचे मंदिर इथं आहे.ते संगमरवरी दगडात बांधलेले पुरातन मंदिर आहे. पायऱ्या चढून गेलो की सभामंडप लागतो.मंडपातील खांबावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेते. मंदिरातून जावून देवदर्शन केले.मंदिरात ब्रम्हाजींची मुर्ती आहे.
एकमेव ब्रम्हदेवाच्या मंदिराचे कुतूहल वाटते. मंदिर बघून समाधान वाटले.इथं दरवर्षी प्रसिध्द उंटबाजार भरतो.
तदनंतर माघारी अजमेरला येवून पिंक सिटी जयपूरला निघालो. पुष्कर ते जयपूर सुमारे १५५ किलोमीटर अंतर असेल.पुन्हा अजमेरलाआलो.
भूक चांगलीच लागली होती.रस्त्यालाच धाब्यावर जेवण केले.चार-पाच दिवसात आजच उन्हाने अंगाची लाहीलाही झाली.चांगलच तापमान जाणवत होतं.रस्त्याला रहदारी बऱ्यापैकी होती.नेहमीसारखाच प्रवास सुरू होता.आता आम्ही राजस्थानच्या राजधानीचे शहर फिरायला निघालो होतो.सकाळी शहर फिरायचे आणि राजमंदिर थिएटर मध्ये सिनेमा बघायला जायचं असं ठरवलेलं होतं.त्यानुसार जयपूरच्या अलिकडे थांबून सकाळीच शहराकडे जायचं यावर  संवाद बोलणं सुरू होते. तिन्हीसांज होत आली होती. अवकाशात तांबूसरंग गडदफिक्कट दिसत होता.भारीच दृश्य दिसत होते..आज सलग प्रवासच चालला होता..टेपवरील कधीलावण्या तर कधी हिंदी सिनेमातील गाजलेली गाणी ऐकत होतो.मस्तच प्रवास चालला होता.हळूहळू अंधाराची दाटछटा जाणवू लागली.
     रात्रीचे जेवण एका पंजाबी धाब्यावर केले.बऱ्यापैकी वाहनं तिथं पार्क केली होती.विशेषत: मालवाहू ट्रक होते.बरेचसे चालक व क्लिनर  ट्रकजवळ बसून जेवण बनवत होते.पाण्याचीही चांगली सोय होती. सहज मनात विचार आला पुढं जाऊन पंपावर थांबण्यापेक्षा इथंच आराम करुया, पाण्याचीही सोय आहे.हो ना करता करता.शेवटी एकमत झाले.चला आज धाब्यावर वाहनांच्या सहवासात मुक्काम करुया.मग तिथंच काहींनी योग्य जागा बघून वळकटी अंथरली.काहीजण गाडीत झोपले... आकाशातील तारे मोजत..वहानांचा आवाज ऐकत. ऐकत झोपी गेलो.
शुभ रात्री.....

भेटूया उद्या पिंक सिटी जयपूर फिरायला ....

क्रमशः भाग-९३

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

https://raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड