निसर्ग सौंदर्य निसर्ग माझा गुरु कविता २०





       सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 गुरुने दिला ज्ञानरुपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा.....
   माझी भटकंती बहुतांशी निसर्ग सहवासात झाली आहे...त्या निसर्गरुपी गुरुला त्रिवार  वंदन....

       निसर्ग आपला  गुरु
      त्याची भटकंती करु
       जंगलवाटेने फिरु
        आनंदाने फेर धरु |

 गड डोंगररांगा चढू
कडे कपारी उतरु
धबधबे,ओहळ नदी पाहू
 जल,वाऱ्यासंगे न्हावू |

 वनचरे जलचरे ओळखू
 झाडे वेलींची तोरणं पाहू
 गडकिल्ल्यांना भेटी देवू
 गगनभेदी शिखरी जावू |

निसर्ग सौंदर्याची 
उधळण पाहू
मनातल्या कुपीत 
साठवून ठेवू |

निसर्ग आपला गुरु
तयाला वंदन करु.
तोची आपला श्र्वास
तयाचे नमन करु.|

         प्रतिक्रिया

माननीय रवींद्र सर गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा निसर्ग माझा गुरु खूप सुंदर कविता गुरुची रूपे निसर्गात ही आढळतात याचे वर्णन आपल्या कवितेत दिसते धन्यवाद!
श्री रमेश जावीर सर
काष्ठय शिल्पकार,सांगली


बिनभिंतीची उघडी शाळा
लाखो गुरूंचा स्नेहमेळा!👌💐💐💐
श्री महादेव भोकरे सर खटाव



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड