निसर्ग सौंदर्य जलाशय कविता ४५
जलाशय
धरण शिगोशिग भरले
पाणी जमिनीकडे पसरले
जलाशयाचे दृश्य सजले
आभाळी मेघ बिलगले ❗
वाऱ्याने जल तरंग येती
जलावरी रांगोळी रेखाटती |
झुडूपांची टोकं नक्षी करती
वृक्षांचे ठिपके दिसती ❗
ढगाआड लपला रवी
रुप रेखाटे निसर्गकवी
जलाशयाचे दृश्य सजले
बिलोरी आरसे लावले❗
🍁श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४५
Comments
Post a Comment