निसर्ग सौंदर्य रानवाटा कविता ४४
🌱रानवाटा🌱
निसर्गाचे दर्शन कराया
शाळेची सहल चालली
गवताच्या संगतीची ही
वाट दऱ्याखोऱ्यातली |
झाडं वेली तरु पाहूया
पानांची सळसळ ऐकूया
पक्ष्यांचा कोलाहल ऐकूया
भुंग्यांची गुंजारव ऐकूया |
सृष्टीचे पुस्तक वाचूया
ओळख नजरेत साठवूया
धरतीचा गालिचा पाहूया
आनंदाने खेळू बागडूया|
आपलाच परिसर फिरुया
संगतीने ,साथीने चालूया
वेगळेपण जाणून घेवूया
कृतीशील अनुभव घेवूया|
झाडांचे दातृत्व
धरणीचे मातृत्व
सृष्टीचे मित्रत्व
वेलींचे ममत्व|
परिसर भेटी करुया
निसर्ग नाती जपूया
पर्यावरणाचे रक्षण करुया
झाडवेलींचे संवर्धन करुया|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ४४
Comments
Post a Comment