निसर्ग सौंदर्य हिरवाई कविता ३६




    🌳हिरवाई🌳

निसर्गाचे हिरवं लेणं
डोंगरकुशीचं रुप देखणं
आभाळ भरून आले
वर्षावाला सजग झाले ||

 सोनकीचा ताटवा बहरला
 वाऱ्यासंगं नाचू लागला
 फुलपाखरांनी ताल धरला
आनंदाने फुलू लागला ||

घनदाट जंगल वनराई
देवाचीअसते देवराई
तृण लतावृक्षांची हिरवाई
शोभे मनमोहक नवलाई||

सोनकीच्या फुलांची आरास
दिसे भंडाऱ्याची उधळण
कमळगडाच्या डोंगरकुशीत
निसर्ग सौंदर्यांची मुक्त उधळण||


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३६

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड