निसर्ग सौंदर्य जंगलवाटा भीमाशंकर कविता क्र.२७




       जंगल वाट
वनातील कातळवाट जाते कड्यावरी
निबीड वृक्षांच्या छायेत वावरी !
तीच पावसाळी ओहळ
जल प्रवाहित दिसे ओंजळ !
कधी ठळकशी तर कधी अस्पष्ट
निसर्गाच्या पाऊलखुणा स्पष्ट!
पवन फिरे स्वच्छंदी गुंज कानी येते
ही जंगलवाट भ्रमंती घडविते !

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्यपुष्प २७

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड