निसर्ग सौंदर्य फणस कविता २४




      कोकणचा मेवा

नारळी पोफळीच्या बागेत
वेलींना घेतले झाडांनी कवेत
दरवळणाऱ्या गंधाने पाय  ओढले
भिरभिरत्या नजरेने झाड शोधले !

फणसाच्या सुगंधाने केले  स्वागत
फणसाचा स्पर्श झाला अवगत
झाडाच्या खोडाला लगडलेत फणस
कोकणचा मेवा खायला सरस !

निसर्ग सौंदर्याच्या खाणी
सागराची गाज गाते गाणी
कोकणची माणसं गऱ्यावाणी
माया,प्रेम अन् मिठ्ठास वाणी !

रुबाब देखणा फणसाचा
क्षण झाला आनंदाचा
बागेसंगे हौस सेल्फिची
आठवण राही आगराची !

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड