निसर्ग सौंदर्य कविता ३३



      निसर्ग सौंदर्य

आभाळ भरून आले
ढगाळ  हवामान झाले
गगनी श्यामल घन दाटले
माचीवरुनी जावू लागले ||

वाऱ्याच्या संग ढग धावती
मन मोहक चित्र दिसती
झाडं वेली झळाळली
हिरवीगार शिवारं झाली ||

गवताची रजई भुईवर पसरली 
सगळीकडे हिरवळ दाटली 
वाऱ्यासंग पाती नाचली 
फुलपाखरं बागडू लागली ||

चिंब ओली झाली वसुंधरा
हिरव्या पैठणीत सजली धरा
क्षणात दिसतो नवा बदल
एकटं घर शोभे शुभ्रधवल ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३३

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड