निसर्ग सौंदर्य गांव २८



हिरवंगार शिवार,बागायतीचं
गावच्या समृद्धीच्या आनंदाचं
आखीव रेखीव दिसे हिरवी शेती
मशागतीने झाली पिकाऊ माती ||
डोस पाजतो अमृताचा
 मेहनतीच्या मशागतीचा
पिकाला अभिषेक घामाचा 
दरवळतो सुगंध कष्टाचा ||

पोरासारखी करतो माया
पशुपाखरा देतो छाया
पीकाचा बहरतो फाया
शेतकरी  पडतो पाया||

कृषीपंढरी ही अन्नदात्याची
समृध्द ग्राम तिथं नांदती
शिवारातली डुलती पाती
डोंगर जपतो निसर्ग नाती ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्यपुष्प २८
छायाचित्र शिवनेरी परिसर 

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड