निसर्ग सौंदर्य बहाव्याची बहार कविता २३
बहावा
बहाव्याचा फुलोरा बहारदार
पुष्पगुच्छ दिसे दिमाखदार
वसंत ऋतूतील सोनेरी फुले
पाहूनी तयाला मन मोहरले !!
नाजूक,मुलायम साज शृंगार
वाऱ्या संगती दिसे डौलदार
पिवळा धमक भंडारा
आसमंती जणू गजरा!!
हिरवाई नटली पितांबरी
पैठणी शोभे भरजरी
झाडाच्या छायेत नवरानवरी
हळदीनं माखलेत लयभारी!!
उन्हाळ्यातल्या काहिलीला
नेत्रसुखद थंडाई गारवा....
लयभारी मस्त फुललाय
पिवळ्या झुंबरात बहावा ....!!
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
प्रतिक्रिया
असा काही फुललाय,
नवरदेव जणू काय
हळद लावून बसलाय!☺😊
लटिंगे सर, रमणीय काव्यशैली!👌👌👌👌
श्री महादेव भोकरे सर
मस्त पिवळं झाडं शोभिवंत दिसतय
ReplyDelete