निसर्ग सौंदर्य शिवार कविता ३२



               शिवार

      शिवार


केंजळगडाची आभाळमाया
गर्द हिरवी वरदहस्त छाया
आम्र-फणसाचे तोरण झळकले
संजिवनीने  जीवन समृद्ध झाले

शिवारात बहरली शेतंभातं
साथीला माती बांधाचं नातं
भ्रमर किड्यांचे गुंजन होतं
एकतारी सुरात गाणं गातं
शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचं
पीक बरकती भुईमुगाचं
पडता पाऊस अन् उन्हाचं
स्वच्छ निर्धोक वातावरणाचं

वृक्षराजीने धरलीय पंगत
गवताच्या पात्यांची संगत
क्षुधेची आस ऊन, पाऊस
वारा-धरा भागवी हावूस

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३२


प्रतिक्रिया
माती आणि बांधाचं नातं
गोड गळ्यानं गाणं गातं
अशी वाटली कविता, लटिंगे सर!👌
श्री महादेव भोकरे सर खटाव

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड