माझी भटकंती गोकर्ण महाबळेश्वर भाग क्र.१०२
☘️🚩☘️🚩☘️🚩☘️🚩
माझी भटकंती
क्रमशः भाग-- १०२
🛕गोकर्ण महाबळेश्वर🛕
सन-२००५
🔅➖🔅➖🔅➖🔅
कुटूंब व नातेवाईकासमवेत गोव्याचा मस्तपैकी पाहुणचार घेऊन आम्ही गोवा ते केरळ कोस्टल रोडने नारळी पोफळीच्या बागा बघत बघत
, सह्याद्रीच्या डोंगररांगेच्या पायथ्याने आणि समुद्र किनाऱ्याच्या कडेकडेने निसर्गरम्य परिसराचे विहंगम दृश्ये बघत बघत निघालो होतो.साधारणपणे चार तासांचा प्रवास असेल.
वाटेतच एका ठिकाणी मस्तपैकी नाष्टा केला आणि मजल दरमजल करीत गोकर्ण महाबळेश्वरला निघालो.
कारवार,आमदल्ली व हारवाडा करत करत आम्ही मदतगिरी फाट्यावरून हायवे सोडून आता गोकर्ण महाबळेश्वर शहराकडे प्रस्थान केले. साडेअकराच्या दरम्यान गोकर्णला पोहोचलो.गोकर्णमध्ये महाबलेश्वर, महागणपती पापमोचनी तीर्थकुंड आणि मनपसंद समुद्रकिनारा अशी प्रेक्षणिय स्थळं आहेत. प्रथम आम्ही तीर्थकुंडावर स्नान करण्या साठी गेलो.भर उन्हाची भाविकांची रीघ लागली होती. भक्तिभावाने आबाल- वृद्ध कुंडात स्नान करुन पावित्र्य मिळवित होते. आम्हीही सगळेजण स्नान करायला कुंडात उतरलो.
स्नान केले.पांढरे सोवळे नेसून दर्शनासाठी महा-बलेश्वर मंदिराकडे मुखाने ओम् नमः शिवाय! जपाचे नामस्मरण करीत निघालो होतो.प्रवेशद्वारआमच्यापासून ५०ते ६० फुटावर असतानाच गर्भागृहातील दर्शन बंद झाल्याचे समजले. नाराज झालो ,सगळा हिरमूड झाला.फक्त मुखदर्शन घेऊन पुढे जावे लागेल.आत्मलिंगाचे दर्शन पाच वाजता सुरू होईल.काय करायचं यासाठी इतरांशी चर्चा केली.इतक्या लांब आलोय तर मनोभावे दर्शन घेऊनच जाऊया ,असा एकच विचार सगळ्यांचा झाला.मग तसेच सगळेजण फिरायला समुद्रकिनारी गेलो. समुद्रात मस्तपैकी पोहलो. लाटांची गंमत बघत , इतरांच्या अंगावर पाणी शिंपडत समुद्रस्नानाचा आनंद घेतला तो "ओम् " समुद्र किनारा नावाप्रमाणेच त्याचा आकार आहे.तदनंतर रुपरी वाळू, शंख शिंपल्यांचे सौंदर्य बघत होतो.आमच्या लहान मुलांनी सागराचा नजराणा शंखशिंपले संकलित करायला सुरुवात केली.
मऊशार ओल्या वाळूत घर रचायला व बांधायला मुले रममाण झाली होती. आमचाही वेळ मजेत चालला होता.चार पर्यंत तिथंच रेंगाळत थांबायला लागणार होतं.समुद्र स्नानानंतर तीर्थ कुंडावर येऊन पुन्हा डुबकी मारत स्नान केले. तिकडच्या सारखे पांढरं सोवळं मी,रवी , प्रकाश ,पिंटू मामा आणि राजूने नेसले होते.कपाळी व हाताला भस्म लावले.
सगळयांचे आवरल्या वर जवळच्या एका हॉटेलमध्ये छानपैकी स्वादिष्ट शाकाहारी राईसप्लेटचा आस्वाद घेतला.
तिथंच थोडीशी जेवणा नंतरची वामकुक्षी घेतली.
तदनंतर मंदिर परिसरात आलो.देवपूजेच्या साहित्याची खरेदी केली.एव्हाना चार वाजत आले होते.उघड्या अंगाने सोवळ्यातच मंदिरा कडे निघालो.हातपाय स्वच्छ करून दर्शन रांगेत उभे राहिलो.पाच वाजण्याची वाट बघत होतो..
गोकर्ण म्हणजे गायीचा कान , कर्नाटकची देवभूमी आहे. प्राचीन काळातील भगवान शंकराचे मंदिर 'महाबळेश्वर ' या नावाने परिचित आहे.हिंदू धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र आणि जोडीला निसर्गरम्य शांत समुद्रकिनारा आहे.दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गायीच्या कानाच्या आकाराचे शहर आहे.
प्रवेशद्वारातून आत गेलो.सभामंडपातून रांगेने गर्भागृहात आलो.. भगवान शंकराचे आत्मलिंग पिंड स्वरुपातील पाहिले.मनभावे दर्शन घेतले.इतका वेळ थांबल्याचे सार्थक झाले. देवदर्शनाने आत्म समाधान लाभले.नंतर गणपतीचे दर्शन घेतले.आणि पुढील प्रवासाला धर्मस्थळ कडे निघालो...
क्रमशः भाग-१०२
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment