माझी भटकंती मैत्री टूर अहमदाबाद भाग क्र.८७
💫☘️💫☘️💫☘️💫☘️
माझी भटकंती
मैत्री टूर
क्रमशः भाग-८७
मैत्री टूर
क्रमशः भाग-८७
तिसरा दिवस सन १९९७
➖➖➖➖➖➖➖
🛣️अहमदाबाद व गांधीनगर🚘
➖➖➖➖➖➖➖➖
पहाटेच अहमदाबादकडे जायला निघालो होतो.
सहाच्या दरम्यान आम्ही साबरमती नदीकडील गांधी आश्रमाजवळ पोहोचलो.सकाळची नित्यकर्मे आश्रमातीलच उपलब्ध सोईमध्ये कसेबसे उरकले.नंतर तयार झाल्यावर जवळील हॉटेलमध्ये नाष्टा आणि चहापान केला आणि साबरमती नदीच्या काठी गेलो.नदीचे विस्तीर्ण पात्र दिसले.
सकाळच्या प्रसन्न आणि शांत वातावरणात नदीकाठी फिरताना मस्त वाटत होते. अहमदाबादची जीवनदायी नदी साबरमती ,नदीच्या जलाशयाचे विहंगम दृश्य नजरेस पडत होते.नेहमीप्रमाणे भेटीची आठवण रहावी म्हणून कॅमेऱ्याने दृश्ये टिपली.आमचेही विविध पोजमध्ये फोटो काढले.तदनंतर पायऱ्या चढून आम्ही गांधीआश्रम पहायला आलो.
अहिंसेचे पूजारी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वांतत्र्य चळवळीतील प्रमुख केंद्र असलेला साबरमती आश्रम पहाताना स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची आठवण आली.जनतेला स्वावलंबी जीवन कसे जगावे याची माहिती देणारे स्वदेशी केंद्र म्हणजे आश्रम.बापूंच्या सार्वजनिक जीवनातील कुटीर,परिसर, विविध नित्योपयोगी वस्तू,त्यांची पुस्तके,चित्र स्वरुपातील चरित्र,पत्रप्रपंच इत्यादींचे प्रदर्शनिय संग्रहालय पाहिले.स्वातंत्र्य संग्रामाची नव्याने माहिती मिळाली.त्यांच्या कुटी मध्ये आम्ही सगळेजण शांतपणे बसलो.विचाराला श्रमाची जोड कशी द्यावी.
आचरण कसे असावेइत्यादी विचार स्मरणातठेवून महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन केले व पुढील प्रवासाला गांधीनगर कडे निघालो.
__________________@__________________________________
🥀गांधीनगर
गांधीनगर गुजरातच्या राजधानीचे शहर आखीव रेखीव आहे.प्रशस्त रस्ते अन् दुतर्फा झाडं आहेत. गांधीनगर मधील धार्मिक संप्रदायातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.अक्षरधाम मंदिर आल्यावर गाडी थांबवून मंदिर पहायला निघालो.गेटवर चेकिंग झाले.तिथंकॅमेरे अलाउड नव्हते.प्रवेशद्वारातून जाताना समोरची मनमोहक दृश्ये बघायला मिळत होती. स्वच्छ सुंदर रस्ता, आकर्षकबागेतील हिरवीगार वृक्षवेलींची रचना,
मध्येच थुईथुई नाचणारी कारंजे, फुलझाडे पाहून मन हरखून गेले अन् प्रसन्न झाले.अक्षरधाम भगवान स्वामी नारायण मंदिर.नक्षीदार आणि लाल दगडातील स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट शैलीतील मंदिर आहे.. इथं सांस्कृतिक आणिधार्मिक संप्रदाय यांचा कलासंगम पहायला मिळतो.
भक्ती,कलाकृती व संस्कृतीचे दर्शन होते.भगवान स्वामी नारायण यांच्या जीवनावरील संग्राह्य वस्तू व प्रसंगाचे यथार्थ दर्शन घडते. खूपच प्रेक्षणियधार्मिक स्थळ आहे. भेटीने धार्मिक सांप्रदायिक संस्कृतीचे दर्शन घडले.मौलिक माहिती मिळाली.तदनंतर आम्ही पुढील माऊंट आबू या राजस्थान मधील निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी मार्गस्थ झालो..
क्रमशः भाग---८७
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
https://raviprema.blogspot.com
प्रतिक्रिया
[7/10, 9:58 AM] dipak magar:
विना थांबा...
वाई एक्सप्रेस...✒️
श्री दीपक मगर लेखकमित्र पाटण
[7/10, 10:05 AM] Sharad Potdar:
कलकत्ता ते लंडन अशी बससेवा होती हे वाचल्यावर आश्चर्य वाटले होते..
तशी ही एक्सप्रेस शंभरी सहज पार करणार असे वाटतयं...
मनस्वी शुभेच्छा...
श्री शरद पोतदार सर बावधन
Comments
Post a Comment