दीप पूजन कविता ३५




उजळूया दीप
    आषाढ अमावस्या
🪔 दिप पूजन  🪔

देवघर उजळणारा लामणदीप
घरात प्रकाशणारा  नंदादीप
तमेची काजळी झटकतो
नवचेतनेची ऊर्जा देतो ||

मंद ज्योत तेवते देव्हारी
औक्षण ,पुजेची मानकरी
लख्ख चकाचक सजति दिवे
आवसेला पूजति सारे  दिवे||

पणती,निरांजन, समई नंदादीप
देव्हाऱ्यात तेेजाने जळती दीप
जाणून घेऊया दिव्यांची दिव्यता
स्वजलनाने इतरांना उजळविता||

चिमणी,सुंद्री,कंदिल ,बत्ती
सगळं घरं प्रकाशमान करती
गुलूप,बलप,ट्यूबची नवलाई
घराची होते विद्युत रोषणाई||

 वीजेची काटकसर  करुया
गरजेनुसार साधने वापरुया
सोलर,पवन ऊर्जा संचित करुया
अक्षय ऊर्जेची साधने वापरुया ||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प ३५

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड